मळमळणे, उलटी होणे, प्रखर उजेडाचा आणि आवाजाचा त्रास होणे ही मायग्रेनची लक्षणे आहेत. मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तुमच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासाठी दिल्लीच्या डायटिशन डॉ. अनिता गुप्ता यांनी काही खास टीप्स दिल्या.
- पालक खा: पालकामध्ये फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन बी अधिक असल्यामुळे आहारात पालक अवश्य घ्या. The journal Headache च्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन बी याचे प्रमाण वाढवले त्यांना मायग्रेनची लक्षणे कमी प्रमाणात जाणवू लागली. म्हणून उकडलेला, शिजवलेला किंवा कच्चा पालक (सलाडमध्ये) अवश्य घ्या. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी युक्त अंडी आणि मशरूम या पदार्थांचा ही तुम्ही आहारात समावेश करू शकता. या ’10′ कारणांमुळे वाढतो मायग्रेनचा त्रास !
- स्नॅक्ससाठी ओट्स घ्या: रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मायग्रेनचा त्रास अधिक जाणवतो. म्हणून glycemic index कमी असलेले म्हणजेच steel-cut oatmeal आणि ओट ब्रानचे सेवन करा. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहील. आल्याचा काढा – मायग्रेनच्या त्रासावरील गुणकारी उपाय
- बदाम-काजू भरपूर खा: The journal Cephalagia च्या अभ्यासानुसार मॅग्नेशियममुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून भरपूर काजू-बदाम खा. तसंच भोपळ्याच्या बिया खाणे देखील फायदेशीर ठरेल.
- बांगडा आणि रावस सारखे मासे खा: The journal Headache अभ्यासानुसार आहारात ओमेगा थ्री फॅटी असिड अधिक आणि ओमेगा सिक्स फॅटी असिड कमी प्रमाणात घेतल्याने मायग्रेनचा त्रास व प्रमाण कमी होते. बांगडा आणि रावस यांसारख्या माशांमधून तुम्हाला पुरेसं ओमेगा थ्री फॅटी असिड मिळेल.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायग्रेनचे प्रमाण कमी करण्यासाठी नेहमी हायड्रेट रहा. भरपूर पाणी प्या. तसंच कलिंगड, काकडी, सफरचंद, पेर यांसारखी पाण्याचा अंश असणारी फळे अवश्य खा.
References:
[1] Menon S, Lea RA, Ingle S, Sutherland M, Wee S, Haupt LM, Palmer M, Griffiths LR. Effects of dietary folate intake on migraine disability and frequency. Headache. 2015 Feb;55(2):301-9. doi: 10.1111/head.12490. PubMed PMID: 25598270.
[2] : Peikert A, Wilimzig C, Köhne-Volland R. Prophylaxis of migraine with oral magnesium: results from a prospective, multi-center, placebo-controlled and double-blind randomized study. Cephalalgia. 1996 Jun;16(4):257-63. PubMed PMID: 8792038.
[3] Martin VT, Vij B. Diet and Headache: Part 2. Headache. 2016
Oct;56(9):1553-1562. doi: 10.1111/head.12952. PubMed PMID: 27699772.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock