मी ३९ वर्षांची महिला आहे. मला मासिक पाळी वयाच्या १४ व्या वर्षी आली आणि त्यानंतर कायम माझ्या मासिक पाळीचे चक्र ३० दिवसांचे राहीले. पण गेल्याच आठवड्यात मला तारखेच्या एक आठवडा आधीच पाळी आली. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते. म्हणून मला खूप काळजी वाटते आहे. मी २४-२८ दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्राविषयी ऐकलं आहे पण ते फार क्वचितच आढळून येतं. माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की मला polycystic ovarian syndrome असू शकतो. त्यामुळे मला लवकर पाळी आली का? म्हणजे याचा अर्थ मला हार्मोनल इम्बॅलन्स ची समस्या आहे का? यासाठी मला स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे का?
Nanavati Super Speciality Hospital च्या Consultant Obstetrician and Gynaecologist डॉ. माया लुल्ला यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.
मासिक पाळी लवकर येण्याची अनेक करणे आहेत. पण आता नेमके कारण सांगणे कठीण आहे. साधारणपणे मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण त्यापेक्षा अधिक किंवा कमी दिवसांचे मासिकपाळी चक्र देखील अनेकजणींमध्ये आढळून येते. हे चक्र कमीत कमी २१ दिवस व जास्तीत जास्त ३५ दिवसांचे असते. पाळी येण्यात ५-७ दिवसांचा फरक पडला तर काळजीचे करण्याचे काही कारण नाही. त्यापेक्षा अधिक दिवसांचा फरक पडला तर मात्र ते काळजीचे कारण ठरेल आणि त्यासाठी लवकरात लवकर स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दर महिन्याला मासिकपाळी लवकर येण्यामागील कारण काय ?
तसंच तुमची पाळीची तारीख लक्षात ठेवून पुढच्या वेळी पाळी किती दिवसांनी आली ते बघा. जर त्यात ७ दिवसांपेक्षा अधिक फरक नसेल तर चिंतेचे काही कारण नाही. मासिकपाळी पुढे ढकण्यासाठी गोळ्या घ्याव्यात का ?
मासिक पाळी लवकर येण्याची कारणे:
मासिक पाळी लवकर येण्याची PCOS व्यतिरिक्त अधिक कारणं असू शकतात. जर तुम्हाला घरी किंवा ऑफिस मध्ये काही ताण असेल तर त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. परिणामी पाळीचे चक्र बिघडते आणि पाळी लवकर किंवा उशिरा येते. तुम्ही जर भावनिकदृष्ट्या अशांत असाल तर त्याचा ही परिणाम हार्मोन्स वर होतो आणि पाळी अनियमित होते. चमचाभर अळशीच्या सेवनाने कमी करा PCOS चा त्रास !
गर्भनिरोधक गोळ्यांचा देखील मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. तुम्ही जर सेक्शुअली अॅक्टिव्ह असताना या गोळ्या घेत असाल तर त्यामुळे ही पाळी लवकर येण्याची शक्यता आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock