IDF (International Diabetes Federation) च्या अहवालानुसार जगभरात भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. आणि २०३० पर्यंत देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास ९% लोक मधुमेहाने ग्रासलेली असतील.
म्हणूनच ब्लड ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः बाळाचा विचार करत असलेल्यांनी ब्लड ग्लुकोजचे योग्य प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. कारण मधुमेहाचा तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो. गर्भारपणात होणाऱ्या मधुमेहाला gestational diabetes म्हणतात. त्यामुळे आई व बाळ या दोघांनाही भविष्यात मधुमेह होण्याचा धोका असतो. परंतु, ब्लड ग्लुकोजचे अतिरिक्त प्रमाण पुरुषांमध्ये वंधत्व आणते. Shantah IVF Centre च्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशालिस्ट डॉ. अनुभा सिंग यांनी मधुमेहामुळे पुरुषांमध्ये वंधत्व कसे येते यावर मार्गदर्शन केले.
मधुमेहामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व कसे येते?
मधुमेह असणाऱ्या पुरुषांकडून स्त्री मध्ये गर्भधारणा होण्यास अधिक वेळ लागतो. पण हे बऱ्याचजणांना माहीत नाही. मधुमेहाचा परिणाम पुरुषाच्या फर्टिलिटीवर होतो. आणि याचा परिणाम स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या फर्टिलिटीवर अधिक होतो. या सहज सोप्या उपायाने वाढवा शुक्राणूची संख्या !
कारण अतिरिक्त ग्लुकोजमुळे oxidative stress येतो. ज्यामुळे स्पर्म्समधील DNA ची क्षमता कमी होते. कमी क्षमतेच्या DNA मुळे पेशी नैसर्गिकरित्या नष्ट होतात. आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडथळे येतात. फक्त इतकंच नाही तर मधुमेहाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तवाहिन्या, नस यावर परिणाम होऊन शिश्नाची ताठरता येण्यास अडचणी येतात. त्याचबरोबर वाढलेल्या ग्लुकोजचा परिणाम सेक्सची इच्छा उत्पन्न करणाऱ्या testosterone हार्मोनवर होतो. नवीन वर्षात मधुमेहींनी या ८ गोष्टींंची काळजी घेतलीच पाहिजे !
जर स्त्रीला टाईप १ किंवा टाईप २ चा मधुमेह असेल तर गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. gestational diabetes असलेल्या महिलांची बाळ मृत जन्मण्याची किंवा कुपोषित राहण्याची शक्यता असते. गर्भारपणात झालेला मधुमेह कसा नियंत्रित ठेवाल?
मधुमेह आपण नियंत्रित ठेवू शकतो का?
स्वादुपिंडातून पुरेसं इन्सुलिन तयार न झाल्यास किंवा शरीराच्या पेशींचा इन्सुलिनवर समाधानकारक परिणाम न झाल्यास मधुमेहासारखा गंभीर आजार होतो. परंतु जीवनशैलीत काही आवश्यक बदल केल्यास म्हणजेच नियमित व्यायाम व संतुलित आहारामुळे मधुमेहाचे प्रमाण आपण नियंत्रित ठेऊ शकतो. याचा सेक्स लाईफवर परिणाम होवून वंध्यत्व येण्याआधी ब्लड ग्लुकोजचे प्रमाण आटोक्यात ठेवणे योग्य ठरेल. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !
शिश्नाची ताठरता येण्याच्या समस्येवर औषधांनी परिणाम दिसून येईल. कारण औषधांमुळे शिश्नाजवळचा रक्तप्रवाह सुधारेल आणि ताठरता येण्यास मदत होईल. परंतु, या सगळ्यावर उपचार करण्याआधी मधुमेहाची लक्षणं जाणून घेणे आणि तो नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुमचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुमचे वजन अधिक असेल किंवा कुटूंबात पूर्वी कोणाला मधुमेह असेल तर समस्या गंभीर होण्यापूर्वीच म्हणजे वंध्यत्व येण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock