Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

PCOS चा त्रास असणार्‍या स्त्रिया गरोदर राहू शकतात का ?

$
0
0

आजकाल पीसीओडी मुळे इन्फर्टिलिटी आणि co-morbidities चे प्रमाण वाढत आहे. विशेषतः सध्याच्या तरुणींमध्ये ही समस्या सामान्यपणे आढळून येते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४०% टीनएजर्स मध्ये ओपीडीएस आणि पीसीओएस ची समस्या दिसून येते. पीसीओएस मध्ये स्त्रियांच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. त्यामुळे गर्भधारणेची क्षमता कमी होते. PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !

पीसीओएस असताना प्रेग्नेंट कसे राहावे किंवा प्रेग्नेंट राहणे शक्य होईल का ? अशा चिंता डोक्यात असतील तर त्यावर मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटलचे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट डॉ. वाय. एस. नंदनवार यांनी मार्गदर्शन केले.

जर तुम्हाला पीसीओएस असेल तर प्रेग्नेंट राहणे कठीण आहे. कारण अशा परिस्थितीत ओव्यूलेशन (ovulation) अनियमित होते किंवा होतच नाही. म्हणजेच अंड्याची निर्मिती होत नाही. अंड्याची निर्मिती न झाल्याने ते फलित होऊन गर्भधारणा होण्याची शक्यताच नसते. याचा अर्थ असा नाही की ज्या स्त्रीला पीसीओएस आहे ती प्रेग्नेंट राहू शकत नाही. यासाठी अनेक ट्रीटमेंटस उपलब्ध आहेत. आई होण्याच्या प्रयत्नांमध्ये फायदेशीर ठरते ‘शतावरी’ !

ओव्यूलेशनसाठी औषधे आणि इंजेकशन्स घेणे ही सामान्यपणे वापरली जाणारी ट्रीटमेंट आहे. यासोबतच आहार, वजन आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या औषधांमध्ये असलेले हॉर्मोन्स अंडाशयाला एक किंवा अनेक अंड्यांची निर्मिती करण्यास प्रवृत्त करतात. म्हणून जर तुमच्यात ओव्यूलेशनची प्रक्रिया अनियमित होत असेल किंवा होतच नसेल तरीही तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता. काही वेळेस invitro fertilisation च्या मदतीने ही तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता. साधारणपणे जर शुक्राणू (sperm) आणि बीजांड (ovum) यांच्या मिलनात काही अडथळा येत असेल तर IVF (invitro fertilisation) ची आवश्यकता भासते. IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 70रीच्या वयात दलजिंदर कौर यांनी कसा दिला बाळाला जन्म?

जर तुम्हाला थायरॉईड, मधुमेह किंवा स्थूलता यांसारख्या गंभीर समस्या असतील तर त्या आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे यशस्वी गर्भधारणा होऊन सुदृढ बाळ होण्यास मदत होईल. म्हणून जर तुम्हाला थायरॉईड किंवा मधुमेह असेल तर ते आटोक्यात ठेवण्यासाठी त्यावर औषधं दिली जातात. परंतु, जर तुम्ही स्थूल असाल तर नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. चमचाभर अळशीच्या सेवनाने कमी करा PCOS चा त्रास !

परंतु, तुमचे आरोग्य आणि पीसीओडी असताना प्रेग्नेंट राहण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. गर्भधारणा होण्यासाठी काही वेळेस वजन नियंत्रित ठेवल्याने फायदा होतो तर काही वेळा औषधं-इंजेक्शनस घेण्याचा सल्ला दिला जातॊ. PCOS आणि PCODच्या समस्येवर नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात का ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>