आपण सगळेच जाणतो की मधुमेहाचा परिणाम डोळे, किडनी, रक्तवाहिन्या, हृद्यावर होतो. तसंच त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व जखम, आजार बरं करण्याची प्रक्रिया देखील मंदावते. परंतु, तुम्हाला हे माहीत नसेल की मधुमेहाचा परिणाम दात, हिरड्या, तोंडाच्या आरोग्यावर सुद्धा होतो. काही वेळेस तोंडाचे आरोग्य बिघडणे हे मधुमेहाचे पहिले लक्षण असू शकते आणि त्यामुळे मधुमेहाचे निदान होण्यास मदत होते.
वारंवार हिरड्यांना सूज येणे, त्यातून पू येणे, कमी कालावधीत हाडांची झीज होणे तसंच सामान्य ट्रीटमेंट नंतरही हिरड्यांचे आजार बरे न होणे ही सगळी लक्षणे मधुमेहाचा संकेत देतात. मधुमेहामुळे वारंवार हिरड्यांचे आजार उद्भवतात आणि ते बरे होण्यासाठी खूप वेळ लागतो. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
मधुमेहामुळे सामान्यपणे होणारे तोंडाचे आजार:
- दात किडण्याचे प्रमाण वाढणे: तोंडातील बॅक्टरीयाचा स्ट्राच आणि अन्नातील साखरेशी संबंध आल्याने दातांवर प्लाग जमा होतो. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे दात किडण्याचा धोका देखील वाढतो. जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे
- हिरड्यांच्या आजाराची तीव्रता वाढते: ज्या बॅक्टरीयांमुळे प्लाग तयार होतो, हिरड्याचे आजार होतात, दात किडतात त्या बॅक्टरीयांशी लढण्याची क्षमता आपल्या शरीरात असते. परंतु, मधुमेहामुळे शरीराची इम्म्युनिटी कमी होते व त्यामुळे प्लाग तयार होण्याचे प्रमाण वाढते. प्लाग मध्ये असलेल्या बॅक्टरीयामुळे हिरड्यांना सूज येते, त्या लाल होतात आणि परिणामी त्यातून रक्त येते. दात घासूनही प्लाग न निघाल्यास तो अधिक कठीण होऊन periodontitis सारखे हिरड्यांचे आजार होतात. ज्यामध्ये दाताला आधार देणारे सॉफ्ट टिशू आणि हाड नष्ट होतं. त्यामुळे दात तुटतो. या ’7′ समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश कराच !
- तोंड कोरडे होणे: तोंड कोरडे होणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे mucus membranes कोरडे होते. पुरेसे पाणी न पिण्यामुळे आणि diabetic neuropathy मुळे salivary glands (लाळग्रंथीचे) कार्य मंदावते. त्यामुळे लाळेची निर्मिती कमी प्रमाणात होते. तोंड कोरडे राहिल्यामुळे अल्सर, इन्फेकशन आणि दात किडण्याचे प्रमाण वाढते. या ‘५’ नैसर्गिक तेलांनी दात होतील मजबूत !
- फंगल इन्फेकशन: रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण सलाईव्हाला Candida सारखे फंगसची निर्मिती करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे oral thrush सारखे इन्फेकशन होते. thrush मुळे तोंडात सफेद किंवा लाल रंगाचे ग्लॉसी पॅचेस येतात. ते अतिशय वेदनादायक असतात. तर काही वेळेस ते अल्सर असू शकते. जिभेवर आलेले thrush वेदनादायक असून त्याची जळजळ होते. त्यामुळे तोंडाची चव जाते व अन्न गिळण्यास त्रास होतो. हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर ’6′ घरगुती उपाय !
- इन्फेकशन व आजार बरा होण्यास वेळ लागणे: इन्फेकशनला प्रतिकार करण्याची क्षमता मधुमेहामुळे कमी होते. तसंच तोंडाचे आजार बरे होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे हिरड्यांचे आजार गंभीर होवून सर्जरीची आवश्यकता भासते. सर्जरी नंतर देखील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे कठीण होते. सर्जरीपूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण चेक करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही वेळेस जर ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित नसल्यास सर्जरी पुढे ढकलण्यात येते. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !
यावरून तुमच्या लक्षात आले असेल की मधुमेहमुळे तोंडाच्या आरोग्यावर होणारे परिणाम गंभीर असतात. पण त्याबद्दल जागरूक राहिल्यास आणि काही प्रतिबंधात्मक गोष्टी केल्यास दीर्घ काळापर्यंत तोंडाचे आरोग्य जपण्यास व आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होईल.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock