मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाय वळतात, पोटात दुखत, मूड स्विंग्स होतात. हे सगळं आपण प्रत्येक महिन्यात सहन करतो. त्यामुळे काही वेळेस मासिकपाळी आल्यानंतर आपली चिडचिड होते तर ते येण्यास उशीर झाला तर आपण चिंता करतो. खरंतर मासिक पाळीचे हे चक्र आपण तरुण, आरोग्यदायी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या फर्टिलिटीचे लक्षण आहे. मासिकपाळी दरम्यानच्या वेदना घालवण्याचा नैसर्गिक उपाय
परंतु आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेक स्त्रियांना खूप लवकर मोनोपॉजला सामोरे जावे लागते. योनीमार्गाचा कोरडेपणा, सेक्सची इच्छा कमी होणे किंवा मासिक पाळी न येणे या मेनोपॉजच्या लक्षणांचा काहींना ५०शीत तर काहींना ३०शी नंतर अनुभव येतो. मेनोपॉजमुळे इन्फेर्टिलिटी बरोबरच हाडं, हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. परिणामी osteoporosis आणि strokes होण्याची संभावना असते. मेनोपॉजच्या टप्प्यावर स्त्रियांमध्ये वाढतो या 5 गोष्टींमुळे ह्रदयविकाराचा धोका
धन्वंतरी केरला आयुर्वेदा च्या आर्युर्वेदिक फिजिशियन डॉ. नम्रता पवार यांच्या सल्ल्यानुसार या समस्येचा सामना करण्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीत काही खास बदल करण्याची गरज आहे. लवकर येणाऱ्या मेनोपॉजला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी या ५ गोष्टी सांगितल्या. मोनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये वाढतो या ’3′ समस्यांचा धोका
1. नृत्य करा: डॉ. पवार यांनी मासिकपाळीचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी अतिशय मस्त उपाय सांगितला. तो म्हणजे डान्स. आणि त्यासाठी नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची गरज नाही. मस्त गाणी लावा आणि तुम्हाला हवा तसा डान्स करा. रक्तप्रवाह सुधारण्याचा डान्स हा उत्तम पर्याय आहे. तसंच डान्समुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो.
2.व्यायाम: व्यायामाचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. त्यामुळे झोपेचा मोह जरा आवरता घ्या आणि लवकर उठा. चांगल्या आरोग्यासाठी अर्धा तास व्यायाम करा. तुम्ही squats, जॉगिंग करू शकता. किंवा नियमित योगासने करा. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
3. आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करा: डॉ. पवार यांच्या सल्ल्यानुसार स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव होण्यास तिळाच्या तेलाचा फायदा होतो. म्हणून तिळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. मासिक पाळीचे अनियमित चक्र सुरळीत करण्यासाठी तिळाचे तेल उपयुक्त ठरते. ४०शी नंतर स्त्रियांमध्ये वाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे oestrogen ची पातळी कमी होते. परिणामी हाडं कमकुवत होतात, त्वचा कोरडी होते आणि मेनोपॉज लवकर येतो. वात कमी करण्यासाठी तिळाचे तेल उत्तम आहे. तसेच त्यामुळे सांध्याचे आरोग्य राखण्यास मदत होते. असे डॉ. पवार यांनी सांगितले. तीळाच्या तेलाचे ’9′ आरोग्यवर्धक फायदे !
4. ताणमुक्त रहा: ताणामुळे आरोग्याच्या साध्या समस्यांना देखील गंभीर स्वरूप प्राप्त होते. काम करणाऱ्या स्त्रियांपासून गृहिणींपर्यंत सगळ्यांना कोणतीतरी चिंता, काळजी असतेच. डॉ. पवार यांच्या सल्ल्यानुसार यावर मात करण्यासाठी योगसाधना, प्राणायाम करणे योग्य ठरेल. वज्रासन, शवासन यांसारखी आसने आणि भ्रामरी, अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारखे ताणमुक्त करणारे प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. ताणमुक्त राहण्यासाठी करा अधो मुख श्वानासन !
5. संतुलित आहार: आहारात phytoestrogens ने युक्त अशा सोयाबीनचा समावेश करा. तसंच तीळ, अक्रोड चे सेवन करा. काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात रहा. शिमला मिरची, बीट, जांभळा कोबी, गाजर, टोमॅटो यांसारख्या अँटिऑक्सिडंटने युक्त अशा भाज्या आहारात समाविष्ट करा. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर या भाज्या देखील फायदेशीर आहेत. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली खाणं खरंच सार्यांंसाठी आरोग्यदायी आहे का ?
तुम्हाला देखील लवकर मेनोपॉज येण्याची भीती असेल तर तुमच्या दैनंदिन आयुष्यात हे लहानसे बदल नक्की करून बघा.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock