मधूमेह जडला की त्यातून अनेक गुंतागुंतीचे त्रास वाढतात. मधूमेह नियंत्रणात आणणे खूप कठीण असते. मधुमेहामुळे काचबिंदू,किडनी विकार व स्ट्रोक सारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.काही संशोधनात मधूमेह व उच्च इन्सुलीन च्या पातळीमुळे काही प्रकारचे कर्करोग देखील विकसित होण्याचा धोका असतो असे आढळून आले आहे. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
भारती हॉस्पिटल कर्नाल चे कन्सल्टंट इन्डोक्रोनोलॉजीस्ट व साऊथ एशियन फेडरेशन ऑफ इन्डोक्रीन सोसायटीचे व्हाईस प्रेसीडंट डॉ.संजय कर्ला यांच्या कडून जाणून घेऊयात मधूमेहामुळे कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो का ?
एका संशोधनानुसार डायबेटीस अथवा प्री-डायबेटीस असलेल्या रुग्णांंमध्ये काही प्रकारच्या कर्करोगाची वाढ होऊ शकते.अमेरिकन इनस्टिट्युट फॉर कॅन्सर रिसर्च नूसार मधुमेहींमध्ये किडनी,स्वादूपिंड व कोलोरेक्टल कॅन्सर विकसित होण्याचा धोका अधिक असतो.याशिवाय महिलांमध्ये यकृत,स्वादूपिंड,स्तन,इन्डोमेट्
डॉ.संजय कर्ला यांच्या मते कर्करोग विकसित होण्यामागे रक्तातील ग्लूकोजची नेमकी भुमिका स्पष्ट झाली नसली तरी त्याचा कर्करोगाशी संबध असतो हे नाकारता येत नाही.कॅन्सर प्रोटेक्टीव्ह भुमिका असलेल्या Metformin या औषधाबद्दल देखील आज अधिक संशोधन करण्याची गरज आहे.चिकित्सकांनी देखील असा धोका असणा-या रुग्णांना अॅन्टी-हायपरग्लायकेमीक औषधे घेण्याचा सल्ला देताना खुप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.या विकारासाठी लठ्ठपणा कारणीभूत असल्याने रुग्णाने त्याबाबत अधिक काळजी घेत तो नियंत्रणात आणण्यासाठी उपचार घेण्याची आवश्यक्ता आहे.तसेच मधूमेही रुग्णांना या विकाराच्या शक्यतेबाबत अधिक जागरुक करणे ही आज काळाची गरज आहे.मधुमेहावर उपचार घेणा-या रुग्णांनी नियमित कॅन्सर स्क्रीनींग करणे व प्रतिबंधनात्मक जीवनशैली अवलंबणे देखील खुप गरजेचे आहे. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !
थोडक्यात मधुमेहींनी कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी डायबेटीस व प्री-डायबेटीस या समस्यांना नियंत्रणात ठेवले पाहिजे.
संदर्भ-
2. Anjana RM, Pradeepa R, Deepa M, Datta M, Sudha V, Unnikrishnan R, Bhansali A, Joshi SR, Joshi PP, Yajnik CS, Dhandhania VK, Nath LM, Das AK, Rao PV, Madhu SV, Shukla DK, Kaur T, Priya M, Nirmal E, Parvathi SJ, Subhashini S, Subashini R, Ali MK, Mohan V; ICMR–INDIAB Collaborative Study Group. Prevalence of diabetes and prediabetes (impaired fasting glucose and/or impaired glucose tolerance) in urban and rural India: phase I results of the Indian Council of Medical Research-INdia DIABetes (ICMR-INDIAB) study. Diabetologia. 2011 Dec; 54(12):3022-7. doi: 10.1007/s00125-011-2291-5. PubMed PMID: 21959957
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock