Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अॅन्टासिडचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ?

$
0
0

बरेच लोक अॅसिडीटी झाल्यास कोणताही विचार न करता अॅन्टासिड घेतात.अॅसिडीटीवर कधीतरी एखादी गोळी घेणे ठीक आहे पण सतत असे अॅन्टासिड घेत राहील्यास याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

मुंबईच्या होलिस्टिक न्यूट्रीशनिस्ट अॅन्‍ड इंटरग्रेटीव्ह अॅन्ड लाईफस्टाईल मेडिसिन एक्सपर्ट Luke Coutinho यांनी फेसबूक लाईव्हवरुन दिलेल्या त्यांच्या सल्लानूसार जाणून घेऊयात अॅन्टासिड तुमच्या शरीरावर काय परिणाम करते व तुम्ही अॅन्टासिड घेतल्यावर शरीरात नेमके काय घडते.

अॅन्टासिड कसे कार्य करते?

पोटातील पीएच मुळे पोट नैसर्गिक रित्या अॅसिडीक असते.तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे या पीएचमुळे कार्बोहायड्रेट,प्रोटीन व फॅट्समध्ये विभाजन होते.त्यांनतर अन्नाचे पचन होण्यासाठी ते अन्न स्वादुपिंडातून आतड्यांकडे ढकलले जाते.ज्या प्रोसेसमध्ये पीएच थोड्याप्रमाणात अल्कधर्मी होते.या स्थितीत अन्नातील पोषक घटक रक्तातून शरीरातील पेशींमध्ये शोषले जातात.

पण जर तुम्ही अॅन्टासिड घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या पोटातील आम्लावर व पर्यायाने तुमच्या पचनक्रियेवर होतो.जर पोटात योग्य प्रमाणात आम्ल निर्माण झाले नाही तर तुम्हाला पचन क्रियेत अडचणी येतात.त्यामुळे तुमचे पचन व्यवस्थित होत नाही व मोठे अन्नकण आतड्यांमध्ये गेल्यांमुळे आतड्याला दुखापत होते.यामुळे तुम्हाला आतड्यांमधून रक्तस्त्राव होणे अथवा आयबीएस अथवा ऑटोइम्युन डिसिस होऊ शकतात. जाणून घ्या अ‍ॅन्टासिड वरचेवर घेणे योग्य आहे का ?

जर तुम्ही अति प्रमाणात अॅन्टासिड घेतले तर काय होते ? 

तुम्हाला सतत अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास तुम्हाला अॅन्टासिड घेण्याची सवय लागते.मग अधिक बरे वाटण्यासाठी दुस-या वेळी तुम्ही एक तर जास्त प्रमाणात अॅन्टासिड घेता अथवा त्या अॅन्टासिडचा डोस अधिक तीव्र करता.अॅन्टासिडमध्ये अॅल्युमिनीयमचे घटक असतात.त्यामुळे सतत अॅन्टासिड घेतल्याने तुमच्या शरीरात अॅल्युमिनीयमचे प्रमाण वाढू लागते.असे अति प्रमाणात शरीरात अॅल्युमिनीयम साठल्याने तुम्हाला किडनीची समस्या,ओस्टिओपोरोसिस,अल्झामर हे विकार होऊ शकतात.अॅन्टासिडमध्ये मॅग्नेशियमचे घटक देखील असतात.याचा देखील तुमच्या किडनीवर दुष्परिणाम होतो.तसेच यामुळे तुम्हाला डायरियाचा देखील त्रास होऊ शकतो.सहाजिकच अॅन्टासिड घेतल्यामुळे तुम्हाला डायरिया किंवा बद्धकोष्ठतेवर देखील औषधे घ्यावी लागतात.त्यामुळे तुमचे औषध घेण्याचे प्रमाण वाढू लागते.अ‍ॅन्टासिड वरचेवर घेणे योग्य आहे का ?

अॅन्टासिड मुळे शरीराला लोह शोषण्यास अडथळा येतो.त्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन व फेरीटीन कमी होते.यामुळे तुम्हाला अधिक आयर्न सप्लीमेंट घ्यावी लागतात.आर्यन सप्लीमेंटच्या अतिसेवनाचा तुमच्या यकृताच्या कार्यावर दुष्परिणाम होतो.तुमच्या शरीरात फॅट्स वाढल्यामुळे तुम्हाला वजन कमी करणे कठीण जाते.सतत अॅन्टासिड घेतल्यामुळे तुमच्या यकृताला सूज देखील येऊ शकते.

या समस्येवर काय उपाय कराल?

या समस्येवर एकमेव उपाय हाच आहे की अॅन्टासिड घेणे त्वरीत बंद करा व योग्य आहार घेण्यास सुरुवात करा.त्याचप्रमाणे तुमच्या जीवनशैलीत काही विशेष बदल करुन देखील ही समस्या तुम्हाला सहज टाळता येऊ शकते.यासाठी प्रथम तुमचे पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न चाऊन खा,उपाशी पोटी,जेवणाआधी अथवा जेवणानंतर लगेच फळे खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.ताणात असताना खाऊ नका कारण तेव्हा शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढल्याने तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.दिवसभरात भरपूर पाणी प्या मात्र जेवताना पाणी कमी प्रमाणात पाणी प्या. अ‍ॅन्टासिडऐवजी ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी  !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>