8-10 तास काम करणं,त्याचा ताण,दिवसभर घेतलेला चुकीचा आहार यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच अडथळा येतो.जर तुम्ही दिवसाचे १० तास काम करत असाल तर तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ काढणे कठीण जाते.पण जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला व्यायामासाठी ठराविक वेळ काढणे,घरचे पौष्टिक जेवण जेवणे व पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक अाहे. जिरं आणि केळं- वजन कमी करण्याचा घरगुती उपाय !
व्यस्त जीवनशैलीत वजन कमी करण्यासाठी या टीप्स जरुर आजमावून पहा -
स्वत:कडे पुरेसे लक्ष द्या-
प्रथम स्वत:कडे एक महत्वाची व्यक्ती या दृष्टीने पहा.जर तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य दिलेत तर तुम्हाला शांत झोप व व्यायामासाठी पुरेसा वेळ काढणे सहज शक्य आहे.यासाठी ज्या गोष्टींकडे आता त्वरीत लक्ष देणे गरजेचे नाही अशा गोष्टी सध्या बाजूला ठेवा व जीम अथवा धावण्यासाठी थोडासा वेळ काढा. नक्की वाचा ‘बिझी’ यंगब्रिगेडसाठी खास वजन घटवण्याच्या टीप्स !!
दोन्हीवेळचा स्वयंपाक एकत्रच करुन ठेवा-
दिवसभर काम केल्यावर थकून घरी जाऊन स्वयंपाक करणे कंटाळवाणे होते.यामुळेच अनेक जण इन्संट फूड अथवा बाहेरुन जेवण मागवणे हे पर्याय निवडतात.यावर सोपा उपाय म्हणजे दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदाच करुन ठेवा.कारण घरी जेवण तयार असेल तर सहाजिकच बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय कमी होईल.वजन घटवा या 5 पिवळ्या पदार्थांनी !
स्वत:वर नियंत्रण ठेवा-
तुम्ही तुमच्या कामाची वेळ कमी करु शकत नाही पण घरातून जेवणाचा व स्नॅक्सचा डबा नेणे तुमच्या हातात नक्कीच आहे.त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ देखील जरुर काढू शकता.यासाठी प्रथम तुमच्या गरजाचे व्यवस्थित नियोजन करा.घरी आल्यावर टिव्ही अथवा मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आराम करा ज्यामुळे तुम्हाला ७ ते ८ तासांची शांत झोप मिळेल.वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना
बाहेर खाताना पोषक आहारच घ्या-
कामानिमित्त बाहेर केले जाणारे लंच,डिनर,बर्थडे ट्रीट हा तुमच्या कामाचाच एक भाग असतो.प्रत्येक वेळी अशा गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकत नाहीत.मात्र असे असले तरी अशा वेळी पौष्टिक पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा.
वजन कमी करण्यासाठी कमी वेळात पूर्ण करता येतील असे छोटी ध्येय निश्चित करा-
लॉर्ग टर्म गोल्स पूर्ण करणे कदाचित तुम्हाला कठीण जाऊ शकते.यासाठी शॉर्ट टर्म गोल्स सेट करा.तुम्ही पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्ही किती वजन कमी करु शकता याचा विचार करा.जर तुम्हाला ३ किलो वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी महिनाभर योगाक्लास किंवा जीममध्ये नित्यनेमाने जा.असे करता करता तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याचे मोठे ध्येय नक्कीच गाठता येईल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock