Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अगरबत्ती जाळण्यापूर्वी ’7′वेळा विचार करा !

$
0
0

पुजाअर्चा, सण- समारंभ म्हटले की भारतीय घरा-घरात उद्बत्तीचा मंद  सुगंध दरवळतो.  अगरबत्ती लावल्याशिवाय पूजा संपन्न झाल्यासारखे वाटतच नाही.  पण अतिप्रमाणात किंवा काही विशिष्ट लोकांना अगरबत्तीचा त्रास होऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?  म्हणूनच या ’7′ समस्यांपासून दूर राहण्यासाठी अगरबत्ती  जाळण्यापूर्वी नक्की विचार करा. (या ’4′ कारणांसाठी यंदा तुम्ही ‘इको फ्रेंडली’ गणपतीच आणा !)

  • श्वास घेण्यास त्रास होणे - 

आजकाल बाजारात मिळणार्‍या अगरबत्त्या त्रासदायक ठरू शकतात. कारण त्या घरात जाळल्याने कार्बन मोनोक्साईड पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील प्रदूषकांमुळे फुफ्फुसांच्या पेशींचे नुकसान झाल्याने श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता असते. म्हणूनच उद्बत्तीचा धूर असह्य झाल्यास अनेकदा काहीजण सतत शिंकतात किंवा खोकतात.

  • अस्थमाचा त्रास होतो -

जळणार्‍या अगरबत्तीमधून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन अशी प्रदुषक श्वासनलिकेच्या मार्फत तुमच्या फुफ्फुसात जातात. सतत असा दूर श्वासनलिकेतून फुफ्फुसात गेल्यास अस्थमाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही रुग्णांमध्ये अगरबत्तीचा धूर सिगारेटइतकाच त्रासदायक असतो.

  • त्वचाविकार होतात - 

दीर्घकाळ अगरबत्तीचा धूर श्वसनाच्या मार्गातून फुफ्फुसात गेल्यास त्वचेसोबतच डोळेदेखील चुरचुरण्याची शक्यता लहान मुलांमध्ये व वयोवृद्धांमध्ये आढळते. सरोज सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सचे प्रमुख त्वचारोगतज्ञ डॉ.अनील गांजो यांच्या मते, अगरबत्तीमुळे नाक, पापण्या,अशा नाजूक त्वचा असलेल्या भागांवर अ‍ॅलर्जी दिसण्याची शक्यता अधिक असते. अगरबत्तीच्या धूरामुळे अशा ठिकाणि खाज येणे, अ‍ॅलर्जी उठणे दिसून येते.

  • मज्जासंस्थेचे कार्य बिघडते –  

अगरबत्तीच्या धुराचा तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, एकाग्रता न होणे, विसरभोळेपणा वाढणे अशा समस्या  वाढतात. अगरबत्तीमुळे घरात प्रदूषण वाढते.अनेक घातक प्रदूषकांमुळे मेंदूचे कार्य प्रभावित होण्याची शक्यता असते.

  • श्वसनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते - 

अगरबत्तीमुळे कर्करोग होऊ शकतो. हा विचार तुम्ही केलात का? जर्नल ऑफ अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, दीर्घकाळ अगरबत्तीच्या धुरात राहिल्यास अप्पर रेस्परेटरी ट्रॅकचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक बळावते.

  • शरीरात विषारी घटकांचा समावेश होण्याची शक्यता वाढते –  

अगरबत्ती जाळल्यानंतर  त्यातून विषारी धूर बाहेर पडतो. ज्यामध्ये लेड, आयर्न, मॅग्नॅशियम अशा विषारी घटकांचा समावेश असतो. अशा घटकांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास त्याचा किडनीवर भार येतो. परिणामी किडनीचे विकार वाढतात. अगरबत्तीच्या धूरामुळे रक्तातील इम्प्युरिटिज वाढण्याची शक्यता आहे. ( शरीर नैसर्गिकरित्या डीटॉक्स करण्याचे उपाय )

  • हृद्याचे कार्य कमजोर होते - 

अगरबत्तीचा तुमच्या ह्र्द्यावर  दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. कारण अगरबत्तीच्या धूरातून बाहेर पडणारे घटक रक्ताधमण्यांचे आरोग्य धोक्यात आणू शकतात. यामुळे रक्त प्रवाहामध्ये अडथळा येण्याची, दाह निर्माण होण्याची शक्यता वाढते. (हृद्याचे आरोग्य सुधारतात ही ’7′ फळं)

संबंधित दुवे 

‘दुर्वां’चे ’9′ आरोग्यदायी फायदे !

नैवेद्याच्या मोदकाची हेल्दी रेसिपी


 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  side-effects-agarbattis-incense-sticks

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>