चेहर्यावरचे डाग, अॅक्ने, ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ब्युटीपार्लरमध्ये काही ट्रीटमेंट्स घेतल्या असतील. पण काही घरगुती उपायांनी अगदी सुरक्षितरित्या तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. असाच एक उपाय म्हणजे ‘धणे’ !
- फायदेशीर उपाय -
धण्याचं (कोथिंबीरीच्या बिया) पाणी आणि हळद एकत्र करून चेहर्याला लावावे. यामधील अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवर पिंपल्सची निर्मिती करणार्या बॅक्टेरियांचा नाश करतात. कोथिंबीरीमध्ये 86.3% मॉईश्चर असते. यामुळे त्वचा रिहायड्रेट होण्यास मदत होते. यामुळे चेहर्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. हळद आणि कोथिंबीर या दोन्हींमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन्सचा मुबलक साठा असल्याने त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.
- साहित्य -
दोन चमचे धणे
चमचाभर हळद
ग्लासभर पाणी
- कसे बनवाल मिश्रण
ग्लासभर पाण्यात धन्याचे दाणे टाकून पाणी उकळा. पाण्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा . मिश्रण थंड झाल्यानंतर पाणी गाळून घ्या.
या पाण्यात थोडी हळद मिसळून पेस्ट बनवा. मात्र अतिप्रमाणात हळद वापरू नका.अन्यथा चेहरा पिवळा होईल.
रात्री हे मिश्रण चेहर्याला लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवावे.
सतत तीन- चार रात्री हा प्रयोग केल्यास तुमच्या चेहर्यावरील डाग, अॅक्ने कमी होण्यास मदत होईल.
- संबंधित दुवे -
पिंपल्स गेले पण स्कार्स कसे हटवाल ?
‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !
घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Use coriander juice to fight acne, blackheads and dry skin
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.