Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

#गणेशचतुर्थी विशेष –पंचखाद्यांचा हेल्दी प्रसाद

$
0
0

लवकरच घराघरात गणेशोत्सवाची धूम सुरू होईल. पण आबालवृद्धांना भुरळ घालणारे या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘प्रसाद’ ! फळांचे काप, लाडू, साखर फुटाणे असे  विविध प्रकार तुम्ही अनेकदा प्रसादामध्ये खाल्ले असतील. पण सारीकडे हाच प्रसाद खाऊन कंटाळा आलाय? मग यंदा त्याला द्या थोडा हेल्दी ट्विस्ट..

सणासुदीला प्रमाणापेक्षा अधिक आणि गोडाधोडाचे खाणे झाल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, मधूमेहींमध्ये रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रसादाला यंदा पंचवटी आयुर्वेदिक केंद्राच्या वैद्य अल्का ऋषीकेश वेशी यांनी सुचवला आहे पाच ‘ख़’ चा हेल्दी प्रसाद -

  • खोबरं –  गणपतीच्या मोदकापासून ते प्रसादापर्यंत सारीकडे  ‘खोबर्‍याचा’  वापर केला जातो. खोबर्‍यामुळे शरीरात स्निग्धता वाढते.
  • खसखस – सणासुदीच्या काळात खाण्याच्या बाबतीत थोडा ढिलेपणा येतो. परंतू त्यामुळे पचनाचे विकार वाढण्याची शक्यता असते. खसखस मात्र पाचक असल्याने पचन सुधारण्यास मदत करते.
  • खारीक – वर्षाऋतूत कमजोर झालेल्या पचनशक्तीला उभारी देण्यासाठी तसेच भूक वाढवण्यासाठी खारीक फायदेशीर ठरते.
  • खजूर – चवीला गोड असणारे खजूर शरीरात उर्जा आणि बळ वाढवण्यास मदत करते.
  • खडीसाखर  - घरात गणपतीचे आगमन झाल्यानंतर प्रत्येकवेळी वेळेवर जेवण होईल असे नाही. अशावेळी पित्त वाढण्याची शक्यता असते. अशावेळी खडीसाखर पित्त कमी करण्यास मदत करते.

म्हणूनच प्रसादाला खोबरं, खारीक, खजूराचे तुकडे व त्यात खडीसाखर आणि खसखस मिसळून तयार मिश्रण ठेवावे. आबालवृद्धांसाठी पोषक असा हा प्रसाद चविष्ट आणि हेल्दी आहे.

  • संबंधित दुवे - 

नैवेद्याच्या मोदकाची हेल्दी रेसिपी

या ’4′ कारणांसाठी यंदा तुम्ही ‘इको फ्रेंडली’ गणपतीच आणा !

 


 

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>