Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मिसकॅरेज टाळण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय !

गर्भारपण हे प्रत्येक नवमातेसाठी सुखद व आव्हानात्मक असे दोन्हीही असू शकते.मात्र कधीकधी ही सुखद व गोड बातमी अचानक झालेल्या मिसकॅरेज मुळे तुमच्या जीवनातील दु:खद घटना होऊ शकते.अशा वेळी हे दु:ख पचविणे त्या स्त्रीला खुप कठीण जाते.अशा घटनांमुळे स्त्रीया गर्भारपणाचा इतका धसका घेतात की त्यामुळे त्या पुढे पुन्हा लवकर आई होऊ शकत नाहीत.खरेतर मिसकॅरेज हा एक अपघात असतो त्यामुळे तुमच्या पुढील जीवनावर काहीही परिणाम होत नाही.त्यामुळे यासाठी तुम्ही बाळासाठी प्रयत्न करणे अजिबात सोडू नका.आयुर्वेदिक तज्ञ संगीता जाधव यांच्या कडून जाणून घेऊयात मिसकॅरेज झालेल्या स्त्रीयांनी हा धोका पुन्हा तुमच्या आयुष्यात निर्माण होऊ नये यासाठी काय करावे.या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता

शरीर डिटॉक्सिफीकेशन करुन गर्भधारणेसाठी पुन्हा तयार व्हा-

डॉ.जाधव यांच्यामते आजकालची जोडपी फर्टिलीटी उपचारांसाठी फक्त लॅब टेस्ट व त्याचे परिणाम यावरच अधिक भर देतात.खरेतर त्यांनी गर्भधारणा या विषयाकडे व्यापक व सकारात्मक दृष्टीकोनातून पहायला हवे.

प्रत्येक जो़़डप्यानेे बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी प्रथम एखाद्या उत्तम आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घेऊन ‘संशोधन’ अथवा ‘डिटॉक्सीफिकेशन’ द्वारे आपली शरीरप्रकृती व त्यामधील त्रिदोष समजून घ्यायला हवेत.गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना त्यांनी पंचकर्म उपचार घेऊन शरीरात निर्माण झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकणे खुप गरजेचे असते.या उपचारांमुळे गर्भधारणा व गर्भारपण दोन्हीही सुखरुप होते. हे नक्की वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

सात्विक खा-

यशस्वी गर्भधारणेसाठी चांगल्या व पोषक सतुंलित आहारासोबत स्त्रीने सात्विक आहार घेणे खुप गरजेचे आहे.सात्विक आहार म्हणजे फक्त शाकाहारी आहार असे नाही तर सात्विक आहार म्हणजे असा आहार जो आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी,आनंददायी वाटते व पोटाला आराम मिळतो.सात्विक आहार म्हणजे तो आहार जो राजसी आहाराप्रमाणे अती तेलकट,तिखट व तामसी आहारासारखा जड नसतो.स्त्रीने अन्न वेळेवर खाणे हे देखील खुप महत्वाचे आहे.त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्लानूसार गर्भवती स्त्रीने दोन जीवांसाठी म्हणून भरपूर खाऊ नये.तर त्याऐवजी थोडे थोडे अन्न वेळेवर खावे. जाणून घ्या हे ’5′ पदार्थ हेल्दी असले तरीही गरोदरपणात खाताना काळजी घ्या !

धावपळ करु नका-

गर्भधारणेसाठी तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित रहाण्यासाठी अशा वेळी तुम्ही घरातून ऑफिसचे काम करण्यासारखा एखादा पर्याय निवडा.त्यामुळे तुमचा कामावरचा ताण कमी होईल.डॉ.जाधव यांच्यामते नाईट शिफ्ट अथवा रात्री उशीरापर्यंत घराबाहेर काम केल्याने स्त्रीच्या शरीरामध्ये अयोग्य बदल होतात.अशामध्ये जर तीला जोडीदाराची साथ नसेल तर घर व नोकरी सांभाळण्यामुळे तिचा ताण अधिकच वाढू शकतो.गर्भधारणे दरम्यान स्त्रीची मानसिक स्थिती चांगली असण्यासाठी स्त्रीच्या शरीरातील पित्तप्रकृती देखील उत्तम असणे गरजेचे आहे.यासाठी बाळासाठी प्रयत्न करीत असाल तर वेळेवर झोपा व श्वासाचे व्यायाम,मेडीटेशन करा ज्यामुळे तुम्ही आनंदी रहाल.

स्वत:कडे अधिक लक्ष द्या-

गर्भधारणेसाठी प्रयत्न करणा-या स्त्रीने तिच्या दररोजच्या कामाेच योग्य नियोजन करणे खुप गरजेचे आहे.डॉक्टरांच्या मते यासाठी तुम्ही वेळेवर झोपता का व तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते का याकडे नीट लक्ष द्या.त्याचप्रमाणे या स्रीने तीच्या पोटाच्या समस्यांकडे देखील वेळेवर लक्ष द्यावे.यासाठी पंचकर्म उपचार सुरु असताना तुमच्या समस्या तुमच्या डॉक्टरांना जरुर सांगा.आयुर्वेदीक डिटॉक्स डाएटने कसे कराल शरीर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी !

व्यायाम करण्यास विसरु नका-

डॉक्टरांच्या मते या दरम्यान काही हलके व्यायाम करा.यासाठी ४५ मिनीटे चालणे,५ ते १० मिनीटे योगासने करणे असे व्यायाम तुम्ही नक्कीच करु शकता.यामुळे तुमच्या शरीरात लवकरच सकारात्मक परिणाम दिसू लागतील.पवनमुक्तासन,वज्रासन व पर्वतासन अशा योगासनांमुळे स्त्रीचे शरीर सुखरुप गर्भधारणा व सुलभ प्रसुती साठी तयार होते.योगाभ्यासामुळे तुमचे शरीर निरोगी व मन निवांत होते.त्यामुळे तुमच्या मनातील बाळाच्या जन्माविषयी असलेली चिंता व काळजी आपोआप दूर होते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>