ब-याचदा मधुमेहींना असे वाटत असते की त्यांनी फळे खाणे योग्य नाही.खरेतर मधुमेहींना त्यांचा आहाराबाबतच अनेक गैरसमज असतात.त्यापैकीच एक गैरसमज म्हणजे मधुमेहींनी फळे खाऊ नयेत.मधूमेह नियंत्रणात आणण्यासाठी खरेतर कोणताही पदार्थ पुर्ण वगळण्याची गरज नसते.तुम्ही तुमच्या आहाराला संतुलित ठेऊन मधुमेह नियंत्रणात ठेऊ शकता.यासाठी नामांकीत मधुमेह तज्ञ डॉ.प्रदीप गाडगे यांच्याकडून जाणून घेऊयात मधुमेहींनी फळे खाणे योग्य की अयोग्य.
- प्रश्न- मधुमेहींनी काही ठराविक फळेच खावीत का?
मुळीच नाही.मधुमेहींमध्ये खाण्याबाबत अनेक गैरसमज असतात.ज्या मधुमेही रुगणांमध्ये त्यांच्या रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रण असते तो रुग्ण सर्व प्रकारची फळे खाऊ शकताे फक्त त्यानी ती योग्य प्रमाणात खावीत.सर्व फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने ती गोड असतात हे जरी खरे असले तरी त्यासोबतच या फळांमध्ये व्हिटॅमिन,फायबर आणि अॅन्टीऑक्सिडंट असे अनेक पोषक घटक देखील असतात त्यामुळे मधुमेहींना फळे खाल्याचा फायदा होतो. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज …
- मधुमेहींनी फळे खाताना काळजी घेणे आवश्यक आहे का?
नाही.कारण मधुमेह या विकारात प्रत्येक रुग्णामध्ये निरनिराळ्या पद्धतीने उपचार केले जातात.त्यामुळे मधुमेहींसाठी विशिष्ठ प्रकारचा डाएट अथवा फळे खाण्याची गाईडलाईन्स देता येत नाही.
उदा.जर दोन मधुमेही रुग्ण असतील.समजा एक मुलगा ज्यामध्ये दोन महीन्यांपुर्वीच मधुमेहाचे निदान झाले आहे व त्याचे वडील ज्यांना १५ ते १६ वर्षांपासून मधुमेहाची समस्या आहे.या दोघांपैकी वडीलांनी एक केळे खाल्ले कर त्यांची लगेच ब्लडशूगर लेवल वाढू शकते पण त्यांच्या मुलाची मात्र केळे खाल्याने त्वरीत खुप प्रमाणात ब्लडशूगर वाढणार नाही.कारण त्या मुलाच्या स्वादुपिंडाचे कार्य अजून सुरळीत सुरु आहे मात्र वडीलांच्या स्वादुपिंडाच्या कार्यावर नियंत्रण नाही त्यामुळे त्यांची रक्तातील साखर वाढत आहे.सहाजिकच फळे खाणे हे त्या रुग्णाच्या मधुमेहाच्या स्थितीवर अवलंबून आहे.
मधुमेहींसाठी योग्य फळ कोणते?
मधुमेहींच्या नित्याच्या आहारामध्ये कमी ग्लायकेमिक इंडेक्स असलेली फळे योग्य ठरु शकतात.डॉ.गाडगे यांच्या मते साधारणपणे सफरचंद,संत्री,स्ट्रॉबेरी,लिंबू आणि प्लम ही फळे मधुमेही खाऊ शकतात.पण त्यांनी द्राक्ष,आंबा,केळी,चिकू,सीताफळ अशी फळे कमी प्रमाणात म्हणजे अगदी एक ते दोन फोडी अशा प्रमाणात खावीत. मधूमेहींनो ! जांभूळ खा आणि ब्लड-शुगर नियंत्रणात ठेवा
मधुमेहींनी फळांचा रस पिणे योग्य आहे का?
मधुमेहींनी फळांचा रस पिणे अजिबात योग्य नाही.बाजारात उपलब्ध असलेले पॅक शूगर-फ्री ज्यूसेस घेणे तर त्यांनी आवर्जुन टाळावे.फळांच्या रसाने रक्तातील साखर तीव्रतेने वाढू शकते.त्यापेक्षा फळे चाऊन खाल्याने रक्तातील साखर हळूहळू वाढू लागते.फळे चाऊन खाल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.पण फळाच्या रसामुळे तसे होत नाही त्यामुळे मधुमेहींनी फळाचा रस पिऊ नये.जाणून घ्या मध – लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म
मधुमेहींनी फळे कोणत्या वेळी खावीत?
मधुमेहींनी कधीही दोन्ही वेळच्या जेवणानंतर लगेच फळे खाऊ नयेत.कारण त्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.जेवणानंतर कमीतकमी २ तासांनी मधुमेहींनी फळे खावीत.मधुमेहींनी फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी ११ वा.आणि संध्या ५ वा. असू शकते.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock