अनेकदा सकाळच्या वेळेस घाई असते म्हणून किंवा रात्री दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आंघोळ करण्याची सवय असते. मात्र झोपण्यापूर्वी आंघोळ करू नका असा सल्ला घरातील वडीलधारी व्यक्ती देतात. ओले केस ठेऊन झोपल्याने सकाळी उठल्यावर ते अधिक गुंतण्याची शक्यता असते. पण या सोबतच ओले केस घेऊन झोपल्याने डोकं जड होण्याची किंवा सर्दी होण्याची भीतीही अनेकांना असते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का ? उन्हाळ्यातही ओले केस त्रासदायक ठरू शकतात का ? या तुमच्या मनातील प्रश्नाला फोर्टीस हॉस्पिटल्स, बॅंगलोरचे Consultant Internal Medicine, डॉ. अंबना गौडा यांनी उत्तरं दिली आहेत.
शरीरात व्हायरसचा प्रवेश झाल्यानंतर सामान्य सर्दी होते. त्यामुळे rhino virus च्या संपर्कात आल्यानंतर सर्दीचा त्रास होतो. साधारण थंड प्रदेशात, वातावरणात rhino virus ची वाढ होते. त्यामुळे ओल्या केसांमुळे थेट सर्दी होण्याची शक्यता कमी असते. हा एक गैरसमज आहे. नक्की वाचा : भिजलेल्या केसांचे नुकसान टाळतील या 6 टिप्स
वातावरण अतिशय थंड असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. वातावरण खूप थंड असेल तर केस टॉवेलने पुरेसे कोरडे करा. केस ओले असताना झोपल्याने सर्दी होत नाही. मात्र अशावेळी तुम्ही सर्दी असलेल्या व्यक्तीच्या आसपास असाल तर नक्कीच तुम्हांला सर्दी होण्याची शक्यता अधिक असते. तसेच थंड वातावरणात ओले केस घेऊन बाहेर पडल्याने त्रास होणार नाही. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास होणार नाही. जर तुमच्या आसपासच्या लोकांना सर्दी- खोकल्याचा त्रास असेल तर सर्वसाधारण काळजी घ्या. स्वच्छता पाळा. यामुळे तुम्हांला इन्फेक्शन होण्याचा त्रास कमी होतो. नक्की वाचा : घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock