“मला दररोज हस्तमैथून केल्याशिवाय झोप येत नाही.त्याचप्रमाणे मी माझ्या पेनिसच्या आकाराबाबत समाधानी नाही.इतर व्यक्तीचा स्पर्श झाल्यास माझे लवकर स्खलन होते.या समस्ये बाबत मी नेमके काय करावे?त्याचप्रमाणे माझ्या हस्तमैथून करण्याच्या सवयीचा परिणाम माझ्या पिता होण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो का?
सेक्शूअल हेल्थ फिजीशियन अॅन्ड मेडीकल सेक्स थेरपीस्ट डॉ.विजयसारथी रामनाथन यांच्या सल्ल्यानुसार, हस्तमैथून हे सेक्सची ईच्छा पुर्ण करण्याचे एक माध्यम असते.हस्तमैथून करण्याची ईच्छा ही सेक्स प्रमाणे नैसर्गिक असते.सेक्स अॅक्टीव्हीटीज अथवा हस्तमैथून केल्यामुळे शरीरात विशिष्ट केमिकल्स रिलीज होतात त्यामुळे तुमच्या शरीर व मनाला आराम मिळतो.सहाजिकच त्यामुळे तुम्हाला चांगली झोप देखील लागू शकते.पण तुम्ही सध्या तुमच्या मनाचे असे प्रोगामिंग करुन घेतले आहे की फक्त हस्तमैथून केल्यावरच तुम्हाला आरामादायक झोप येऊ शकते.त्यामुळे मग हस्तमैथून न केल्यास तुम्हाला झोप देखील येत नाही.असे असले तरी अजिबात घाबरु नका कारण ही कोणतीही गंभीर समस्या नाही.शास्त्रीय पद्धतीने हे ब्रेन प्रोगामिंग बदलून व त्यात योग्य असा बदल तुम्हाला घडवून आणता येऊ शकतो. यासोबत पहा हस्तमैथून करण्याचे काही आरोग्यदायी फायदे
तसेच शिश्नाच्या आकाराबद्दल देखील तुमच्या मनात असलेला गैरसमज तुम्ही दूर करण्याची आवशक्यता आहे. यासाठी जाणून घ्या पुरुषांच्या शिश्नाबद्दल या ’5′ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
कधीकधी शिश्नाची लांबी सामान्य असली तरी त्याचा आकार कमी असण्या मागे अनेक कारणे असू शकतात.उदा.तुमचे पोट मोठे असू शकते.त्याचप्रमाणे स्खलन लवकर होण्यामागे देखील अनेक कारणे असू शकतात.पण सामान्यत: स्खलन लवकर होण्याचे प्रमुख कारण चिंता,ताण-तणाव,काळजी हे असते.या समस्ये बाबत योग्य औषधे व वागणूकीत महत्वाचे बदल केल्यास तुम्हाला याबाबत सकारात्मक बदल जाणवू शकतात.
त्याचप्रमाणे सेक्स करताना तुमचे स्खलन लवकर झाल्यास तुमच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.स्खलन लवकर झाल्याने प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होतो हा एक गैरसमज आहे.स्खलन लवकर होणे व प्रजनन क्षमता कमी असणे यांचा काहीच संबध नाही.पुरुषांमध्ये इनफर्टीलिटी असण्यामागे निराळी कारणे असू शकतात.यासाठी जाणून घ्या फर्टिलिटी बाबतचे ’9′ समज-गैरसमज !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock