मी ४० वर्षांचा असून माझा फील्ड जॉब आहे. मी बारीक आहे आणि माझे काम बैठे नसल्यामुळे शारीरिक हालचाल बरीच होते. तरीही माझे कोलेस्ट्रॉल ३०० mg/dl इतके आहे. हा ह्रद्यरोग वाढत असल्याचा संकेत आहे का? बारीक असलेल्या आणि शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला ही हार्ट अॅटॅक येऊ शकतो का? कृपया याबाबत सल्ला द्यावा.
या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या Asian Heart Institute (AHI) च्या Cardiac Electro Physiologist Dr. Santosh Kumar Dora यांनी दिले.
Dr. Dora यांच्या सल्ल्यानुसार कोणत्याही व्यक्तीला हार्ट अॅटॅक येऊ शकतो. हार्ट अॅटॅक येणे हे फक्त कोलेस्ट्रॉल किंवा बॉडी मास यावर अवलंबून नसून त्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. या ’4′ लक्षणांनी ओळखा तुम्हांला हार्ट अटॅक आलाय हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर या 8 गोष्टींची मदत पटकन करा !
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असेल तर हृदयविकाराचा धोका अधिक असतो. त्याचबरोबर अनेक गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका असतो. मधुमेह, हायपरटेन्शन हे सामान्यपणे हृदयविकार होण्यास कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर जर तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तुमच्या घरात आनुवंशिक असा काही त्रास असेल तर तुम्हाला हार्ट अॅटॅक येण्याचा धोका वाढतो. तसंच वयोमानामुळे देखील हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. तुम्ही बारीक आहात, तुमचे वय ४० आहे म्हणजे तुम्हाला हृदयविकार होणार नाही असे नाही. जर तुम्हाला मधुमेह, हायपरटेन्शन असेल किंवा स्मोकिंग, वय, आनुवंशिकता, कोलेस्ट्रॉल या सर्व घटकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्हाला इतर काहीही नाही पण कोलेस्ट्रॉल अधिक आहे तरी हृदयविकाराचा धोका कायम राहतो. हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर या 8 गोष्टींची मदत पटकन करा !
कारण अधिक प्रमाणातील कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांत जमा होतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होतात आणि हार्ट अॅटॅक येतो. पण हे प्रमाण व्यक्तिपरत्वे बदलते. कारण त्यासाठी इतर अनेक घटक जबाबदार असतात. म्हणजेच हाय कोलेस्ट्रॉलचे १०० पेशंट असतील तर त्यापैकी १५ पेशंटला हार्ट अॅटॅकचा धोका असतो. Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′ संकेत !
१५% हे प्रमाण कमी नाही. म्हणून कोणतीही हयगय न करता डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्या. आणि नियमित चेकअप करा. त्याचबरोबर आहारात काही बदल करा. रेड मीट, चीज, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ इत्यादी खाणे टाळा. नियमित व्यायाम करा. ते शक्य नसल्यास आठवड्यातून ५ वेळा तरी व्यायाम करा. त्यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका कमी होईल. लसूण, दाणे, कांदा, ओट्स, आळशी असे कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर तुमच्या कॅलरी घेण्यावर नियंत्रण ठेवा. हार्ट अटॅक व्यतिरिक्त या ’5′ समस्यांमुळेही छातीत दुखू शकते !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock