Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणातील लठ्ठपणा,मधूमेह व इतर आरोग्य समस्यांचा बाळावर होतो असा परिणाम !!

$
0
0

गरोदपणात तुम्ही तुमच्या पोटातील बाळाची व तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजचे असते.कारण तुम्हाला गरोदरपणा आधी असलेल्या आरोग्य समस्या जन्मानंतर तुमच्या मुलांमध्ये देखील येतात.यासाठीच गरोदरपणी तुम्ही तुमच्या व बाळाच्या आरोग्याची वेळीच काळजी घ्या.

गरोदर मातेने धुम्रपान अथवा मद्यपान केल्यामुळे तिच्या बाळाच्या वाढ विकासावर विपरित परिणाम होतो.याची कारणे जरी आजही अज्ञात असली तरी त्याचे परिणाम दिसणारे पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत.अनेक महीलांना मात्र ही गोष्ट माहीतच नसते.गर्भधारणे दरम्यान होणारा मधूमेह,हायपरटेंशन,लठ्ठपणा,अॅनिमीया अशा अनेक आरोग्य समस्यांचा गरोदरपणी तुमच्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

साऊथ एशियन फेडरेशन ऑफ इन्डोक्रीन सोसायटी चे वाईज प्रेसिडेंट आणि भारती हॉस्पिटल कर्नाल चे कन्सल्टंट इन्डोक्रीनॉलॉजीस्ट डॉ.संजय कर्ला यांच्या मते जाणून घेऊयात गरोदरपणातील आरोग्य समस्यांचा तुमच्या बाळावर कसा परिणाम होतो.

जेस्टशनल मधूमेह-

या समस्येमुळे ४.९ टक्के बालकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते तर ३२.३ टक्के बालकांना श्वसन समस्या निर्माण होते.ही समस्या असलेल्या महिलेच्या पोटी जन्मलेल्या मुलांना भविष्यामध्ये लठ्ठपणा,ह्रदयसमस्या,टाईप २ मधूमेह या समस्या होण्याचा धोका असतो.

अॅनिमिया-

गरोदर महिलेला लोह,फोल्वाइट,व्हिटामिन बी १२ आहारातून पुरेसे न मिळाल्यास तिला अशक्तपणा येतो.कारण गरोदरपणी पुढे लोहाची अधिक गरज भासू लागते.त्यामुळे  मधूमेह,मॅटर्नल अॅनिमिया हे विकार निर्माण होऊन बाळाच्या आरोग्य समस्या वाढतात. मॅटर्नल अॅनिमिया मुळे ६.५ टक्के लहान बाळ जन्माला येण्याचा व ११.५ टक्के अकाली प्रसुती वेदना येण्याचा धोका वाढतो.अॅनिमियामुळे नाळे मार्फत बाळाला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही.बाळाची वाढ व विकास कमी होतो.याचा परिणाम बाळाच्या अंत:स्त्रावी ग्रंथीच्या कार्यावर होतो.भारतामध्ये यासाठी लोह व hematopoietic व्हिटॅमिन सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देण्यात येतो.तसेच गरोदरपणाआधी हिमोग्लोबीनची पातळी देखील नियंत्रणात आणावी लागते. गरोदरपणाच्या काळात गर्भाचे योग्य वजन ठेवण्यासाठी ’5 खास टीप्स !

जेस्टेशनल हायपरटेंशन-

ही समस्या गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यानंतर निर्माण होऊ शकते.या समस्येमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यक्ता असते कारण त्यामुळे गर्भनाळेच्या रक्तवाहिन्या घट्ट होतात.सहाजिकच बाळाला ऑक्सिजन व पोषकमुल्यांचा पुरवठा कमी प्रमाणात होतो.या समस्येमुळे बाळाची गर्भाशयातील वाढ मंदावते,बाळ कमी वजनाचे जन्माला येते,बाळामध्ये लो शूगर व स्नायू बळकट नसण्याच्या समस्या निर्माण होतात.अशा अर्भकाला त्याच्या पौडांगवस्थेत हायपरटेंशनची समस्या निर्माण होऊ शकते.

मॅटर्नल ओबेसिटी-

मॅटर्नल लठ्ठपणा मुळे गर्भारपणातील मधूमेह होतो ज्यामुळे अकाली प्रसुतीवेदना निर्माण होतात.तसेच बाळामध्ये लठ्ठपणा व मधूमेह होण्याचा धोका वाढतो.ऐवढेच नाही तर थोड्याशा अपु-या पोषणामुळे देखील तुमच्या बाळाला आयुष्यभर विपरित परिणाम भोगावे लागू शकतात.

उदा.जर गरोदरपणी तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्यामुळे आईच्या हाडांची झीज होतेच पण आयुष्यभर तुमच्या मुलांच्या हाडांच्या विकासावर परिणाम होत राहतो.

डॉ.संजय कर्ला यांच्या मते जर आईला गरोदरपणात मधूमेह किंवा हायपरटेंशन ची समस्या असेल तर जन्मानंतर तिने तीचे बाळ वाढताना त्याच्या आरोग्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे.त्याच्या वाढ व विकासासाठी योग्य जीवनशैली व नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>