Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

घरगुती तेलाच्या मिश्रणाने दूर करा अकाली पांढर्‍या केसांची समस्या !

$
0
0

पांढर्‍या केसांना लपवण्यासाठी तुम्ही मेहंदी किंवा हेअर कलर वापरत असाल. पण यापेक्षा काही सुरक्षित आणि घरगुती उपायांनी देखील पांढर्‍या केसांची समस्या दूर करता येते. कढीपत्त्याची पानं खोबरेल तेलात मिसळून लावल्यास केसगळतीसोबत केस पांढरे होण्याची समस्यादेखील दूर करण्यास मद्त होते. मग पहा कसा कराल हा घरगुती उपाय -

का आहे हे मिश्रण फायदेशीर ? 

कढीपत्त्याच्या पानाचे अनेक फायदे आहेत. पण त्यापैकी एक प्रमुख म्हणजे केसांचे आरोग्य राखणे. कढीपत्त्यामुळे केसांना चकाकी मिळते व त्याची वाढ सुधारते. तसेच त्यामध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असल्याने केस मजबूत होतात. यामुळे तुमच्या टाळूचे पोषण होते तसेच केसातील कोंडा दूर करण्यास मदत होते. कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन व प्रोटीन देखील मुबलक प्रमाणात आढळत असल्याने केस गळण्याची तसेच दाटपणा कमी होण्याच्या समस्येपासून बचाव होतो.  (घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !)

साहित्य -: 

  • ताजी कढीपत्त्याची पानं
  • खोबरेल तेल
  • सूती कापड
  • तेल गरम करायला लहानसे पातेले
  • बरणी ( तेल साठवून ठेवायला)

कृती - 

  • अंदाजे 100 ग्रॅम  कढीपत्त्याची पानं खुडून, स्वच्छ धुवून घ्यावीत.
  • गरजेनुसार खोबरेल तेल पातेल्यात काढून गरम करावे.
  • तेलात कढीपत्त्याची पानं घालून ते थोड्या मंद आचेवर गरम करून घ्यावीत.
  • हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. नंतर सूती कापडातून गाळून  काचेच्या बरणीत भरावे.

कसे वापराल हे तेलाचे मिश्रण ?

रोज रात्री या तेलाचा केसांमध्ये हलकासा मसाज करावा.

संबंधित दुवे -

‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय

केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !

 केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - No more grey hair or hair loss with this DIY oil mix!

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>