Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

परफ्युम विकत घेताना तो बनावट नसल्याचे तपासण्यासाठी ’8′खास ट्रीक्स !

$
0
0

परफ्युम्स न आवडणाऱ्या व्यक्ती कमीच असतील. वेगवेगळे परफ्युम्स ट्राय करायला अनेकांना आवडते. त्यासाठी आपण भरपूर वेळ आणि पैसे खर्च करतो. पण तो परफ्युम फेक निघाला तर? वेळ आणि पैसे दोन्ही वाया. मग असं वाटतं त्यात थोडे अजून पैसे घातले असते तर ओरिजिनल परफ्युम मिळाला असता. ओरिजिनल परफ्युमचा सुगंध दीर्घ काळ टिकतो. त्यामुळे पैसे वाया गेल्याचे दुःख होत नाही. पण इतक्या सगळ्या परफ्युम्समधून नक्की ओरिजिनल कोणता हे ओळखणे कठीण असते. Perfumebooth.com चे founder and owner रोहित कुमार अग्रवाल यांनी ओरिजिनल परफ्युम ओळखण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत.

  1. ओरिजिनल परफ्युम्सची बॉटल स्मूथ असते तर बनावट परफ्युम्सची बॉटल थोडी रफ आणि दिसायला फारशी सुरेख नसते. काही वेळेस प्लास्टिक बॉटल्स वापरल्या जातात. उच्च प्रतीच्या परफ्युम्सच्या बॉटलचे झाकण घट्ट फिटिंगचे असून spill-proof असते. त्यावर डिझायनर लेबल असते. तसंच बॉटल हाताळायला फार सॉफ्ट असते. तर बनावट  परफ्युम्सच्या बॉटल्स रफ असतात किंवा त्याच्या कडा खडबडीत असतात. जरूर वाचा: घामाच्या दुर्गंधीला दुर ठेवा, घरगुती ‘बॉडी स्प्रे’ने!
  2. बनावट  परफ्युम्सचं पॅकिंग फार सुरेख, आखीव रेखीव असं नसतं. पॅकिंगसाठी वापरलेले मटेरियल फारसं चांगलं नसतं. पॅकिंग, त्यात वापरलेले जिन्नस यासाठी तुम्ही मॅनिफॅक्चरलची वेबसाईट चेक करू शकता. सील्ड बॉक्स शेक करून बघा. कारण ओरिजिनल परफुम्सची बॉटल हलणार नाही. आणि जर हलत असेल तर तो बनावट  परफ्युम असल्याचे ओळखावे.
  3. ओरिजिनल परफ्युम्सचा वास वेगळा आणि खास असतो. हे ओळखणे जरी कठीण असले तरी तुम्ही जर ओरिजिनल परफ्युम्सचा वास आधी घेतला असेल तर त्यातला फरक तुम्हाला नक्कीच कळेल.
  4. ओरिजिनल परफ्युम्स सेंटच्या तीन थरात बनलेला असतो. टॉप, मिडल आणि बेस नोट्स. टॉप नोट हा पहिला सुगंध असतो जो आपण घेतो. परफ्युम लावल्यानंतर त्याचा संबंध त्वचेशी आल्यावर येणारा सुगंध ही मिडल नोट असते. आणि बेसिक नोटचा अनुभव परफ्युम त्वचेत शोषला गेल्यानंतर येतो. बनावट  परफ्युमचा सुगंध असा बदल नाही. तो सुरवातीपासून लावेपर्यंत सारखाच असतो. काही वेळेस तर लावल्यानंतर काही तासातच तो गंध नाहीसा होतो.
  5. ओरिजिनल परफ्युमचा सुगंध नैसर्गिक आणि सिंथेटिक गोष्टीवर ही येतो. तर कमी प्रतीचे किंवा फेक परफ्युमचा सुगंध फक्त सिंथेटिक गोष्टीवर येतो. आणि हळूहळू वेगळाच गंध दरवळू लागतो. बनावट  परफ्युमच्या गंधात काही वेगळेपण नसते. तो गंध फार काळ टिकत नाही आणि त्यामुळे रिफ्रेशिंग देखील वाटत नाही. परफ्युम न वापरता घामाची दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा: काखेतील दुर्गंधी कमी करण्याचे ’5′ घरगुती उपाय !
  6. बनावट  परफ्युमचा सुगंध सुरवातीला चांगला वाटला तरी त्याचा परिणाम काही तासतच नाहीसा होतो किंवा कमी होतो. आणि परत परफ्युम लावण्याची गरज भासते. जर तुमच्या परफ्युमचा सुगंध शरीर किंवा कपड्यांवर ४-५ तासानंतरही सारखाच येत असेल तर तो ओरिजिनल परफ्युम आहे.
  7. ओरिजिनल परफ्युमची बॉटल एकदा उघडल्यानंतर त्याचा सुगंध ८ महिन्यापर्यंत तसाच राहतो. Citrus fragrances ६ महिन्यातच कमी व्हायला लागतात. तर floral आणि इतर फ्रेग्रेन्सेस जास्तीत जास्त १८ महिन्यापर्यंत टिकतात. बनावट  परफ्युमचा सुगंध बॉटल उघडल्यानंतर काही आठवड्यात किंवा काही महिन्यात उडून जातो.
  8. तुम्हाला जर परफ्युमची पॅकिंग किंवा त्याचे बाहेरील स्वरूप आवडले तर तो नक्की टेस्ट करा.बनावट  परफ्युममुळे अलर्जी होऊ शकते. किंवा रॅशेस येऊ शकतात. त्यामुळे कोणताच परफ्युम त्याची ओरिजिनॅलिटी चेक केल्याशिवाय ट्राय करू नका. परफ्युम टेस्ट करताना काही तास वाट पहा. म्हणजे त्याचा सुगंध किती वेळ राहतो किंवा त्यात वेगवेगळ्या नोट्स आहेत किंवा नाही हे तुम्हाला समजेल. जर तुम्हाला सेंटबद्दलची माहिती आणि खरा सुगंध यात साम्य आढळले नाही तर तो परफ्युम अजिबात खरेदी करू नका.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>