पुरुषांना ही स्त्रियांप्रमाणे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा उत्तम राहण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची, त्वचेचे पोषण करण्याची गरज पुरुषांना देखील आहे. आजकाल बाजारात खास पुरुषांसाठी वेगळे ब्युटी प्रॉडक्स उपलब्ध आहेत. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे स्त्रियांसाठी असणारे ब्युटी प्रॉडक्टस आपण वापरावेत की नाहीत? असा प्रश्न पुरुषांना स्वाभाविकपणे पडत होता. आता ही त्याबद्दल फारशी जागरूकता आहे असे नाही. पण काळ्या केसात काही पांढरे केस दिसू लागले की पुरुषांना ही स्त्रियांप्रमाणे वाईट वाटते. त्यामुळे केस रंगवण्याचा उपाय ते आजमावतात. याचमुळे पुरुषांकडूनही हेअर डाय आणि कलर्सला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. पुरुषांसाठी हेअर कलर्स आणि डायचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण खरंच याची गरज आहे का? पुरुष स्त्रियांचे हेअर कलर्स आणि डाय वापरू शकत नाहीत का? हे प्रश्न आम्ही दिल्लीच्या स्टार सलोन आणि स्पा च्या ब्युटी एक्स्पर्ट Aashmeen Munjal यांना विचारले असता त्यांनी अशाप्रकारे उत्तर दिले. नक्की वाचा: घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !
त्यांच्या सल्ल्यानुसार स्त्रियांचे हेअर कलर्स पुरुषांनी वापरणे सुरक्षित आहे. कारण दोन्ही प्रॉडक्ट मध्ये असणारे केमिकल्सचे प्रमाण सारखेच असते. दोन्ही प्रॉडक्स मध्ये वापरली जाणारे घटक आणि त्याचे प्रमाण सारखेच असते. त्यामुळे त्याचा परिणाम आणि तो टिकून राहण्याचा कालावधी ही सारखाच असतो. कलर्स आणि त्यातील केमिकल्स मुळे होणारे केसांचे नुकसान यात देखील स्त्री आणि पुरुष असा भेद नाही. दोघांचे ही होणारे नुकसान समानच असते. जरूर वाचा: एक पांढरा केस उपटल्याने अधिक पांढरे केस उगवतात का ?
फरक फक्त कलर शेड्स मध्ये असतो. स्त्रियांसाठी विविध कलर शेड्स उपलब्ध आहेत. तर पुरुषांना बेसिक शेड्स मध्ये समाधान मानावे लागते. म्हणून जर तुम्ही नेहमीच्याच काळ्या रंगाने केस रंगवत असाल तर चेंग म्हणून स्त्रियांसाठी असलेल्या ब्रँड मधून एखादा हेअर कलर नक्कीच निवडू शकता. स्त्रियांना व्हायब्रण्ट कलर्स आवडतात. तर पुरुष सौम्य रंग पसंद करतात. या ‘७’ एक्स्पर्ट टीप्सने सहज लपवा पांढरे केस!
पुरुषांनी ही वेगवेगळे कलर्स शेड्स ट्राय करायला हवेत. स्त्रियांच्या कलर रेंज मध्ये एखादी शेड आवडल्यास, तुम्हाला सूट करेल असे वाटल्यास ती शेड नक्की ट्राय करा. पण त्यामुळे तुमचे केस वाढणार नाहीत किंवा मुलायम देखील होणार नाहीत. फक्त पांढरे केस कलर होतील. घरगुती तेलाच्या मिश्रणाने दूर करा अकाली पांढर्या केसांची समस्या !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock