पुरुष दाढीमुळे रुबाबदार दिसतात.आजकाल बाजारात पुरुषांना ग्रुमिंग करण्यासाठी अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात.पुरुषांना त्यांची पांढरी दाढी लपवण्यासाठी डाय करणे हा एक चांगला पर्याय उपलब्ध असतो.काही जण तर अगदी दाढीला हिरव्या,लाल व जांभळ्या या बोल्ड रंगाचे डाय देखील करतात.
दिल्लीच्या स्टार सलॉन अॅन्ड स्पाचे ओनर अशमीन मुंजाल यांच्या कडून जाणून घेऊयात दाढी डाय व कलर करण्याबाबत ही महत्वाची माहिती. देखण्या नवरदेवासाठी 8 ‘ग्रुमिंग टीप्स’ ! जरुर वाचा
तुमच्या दाढीला डाय करताना योग्य कलर निवडा-
दाढीला डाय करणे तसे अवघड असू शकते.जर तुम्ही दाढीला चुकीच्या रंगाचे डाय केले तर तुम्हाला सर्वासमोर जाणे लाजिरवाणे वाटू शकते.यासाठई दाढी डाय करण्यासाठी तुमच्या डोक्यावरील केसांचा व भूवयांच्या केसांचा रंग निवडा.केस व भुवयांच्या रंगासोबत मिळता जुळता रंग देखील तुम्हाला खुलून दिसू शकतो.तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या रंगाशी साधर्म्य असलेला रंग देखील यासाठी नक्कीच निवडू शकता.
तुमच्या केसांच्या रंगापेक्षा एक शेड फिकट असलेला रंग तुम्ही निवडल्यास तो योग्य ठरेल.पण एखादा वेगळा अथवा खुप गढद रंग लावल्यास तो खूपच अनैसर्गिक दिसू शकतो.यासाठी जर तुम्ही पहिल्यांदाच दाढी डाय करणार असाल तर प्रथम एखाद्या चांगल्या सलॉन मध्ये जा व तिथल्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.कारण असे न करता चुकीच्या रंगाचा डाय केल्यास तो काढून टाकण्यासाठी तुम्हाला कमीतकमी एक आठवडा थांबावे लागेल अथवा तुम्हाला दाढी काढूनच टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.त्यामुळे हे टाळण्यासाठी आधीच योग्य ती दक्षता बाळगा.
दाढीला डाय करण्याआधी व नंतर काय काळजी घ्याल-
आपल्या चेह-याची त्वचा ही खुपच संवेदनशील असते.जर तुमच्या त्वचेला एखादी जखम झाली असेल तर ती बरी होईपर्यंत दाढी डाय करु नका.तसेच केसांप्रमाणे दाढीला देखील पॅच टेस्ट जरुर करा.जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करणे खुप आवश्यक आहे.
डाय केल्यानंतर त्वचा मॉश्चराईज होण्यासाठी एखादे चांगले मॉश्चराईजर अथवा अॅलोवेरा जेल लावा. अशमीन यांच्या मते जर तुम्ही तुमच्या दाढीवर नियमित अॅलोवेरा जेल लावले तर तुमच्या दाढीचे केस मऊ व लवचिक होतात.त्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा देखील मिळू शकतो. दाढींचे ’5′ सेलिब्रिटी पण हटके पर्याय !
दाढी डाय करण्यापुर्वी या गोष्टी लक्षात ठेवा-
कलर केसांवर नीट लागण्यासाठी दाढी डाय करण्यापुर्वी कमीतकमी एक दिवस आधी दाढीला शॅम्पू अथवा कंडीशनींग करु नका.त्याचप्रमाणे डाय करताना दाढीच्या आजूबाजूच्या,मानेच्या,कानांच्या व चेह-याच्या त्वचेवर पेट्रोलियम जेलीचा एक पातळ थर लावा.त्यामुळे तुमच्या त्वचेवर डायचे डाग लागणार नाहीत.
एखाद्या कार्यक्रमासाठी दाढी डाय करताना त्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी डाय करा.त्यामुळे दाढीच्या आतील त्वचेला लागलेले डाग कमी होऊन तुमचा लूक नॅचरल वाटू लागेल.त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुम्ही दाढीला केलेला डायचा रंग आवडला नाही तर त्यावर उपाय करण्यासाठी तुमच्याकडे काही दिवस हातात असतील. रुबाबदार दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय नक्की आजमावून पहा.
हेअर कलर दाढी डाय करण्यासाठी लावता येऊ शकतो का?
नक्कीच तुम्ही केसांना डाय करण्यासाठी वापरण्यात येणारा कलर दाढी डाय करण्यासाठी वापरु शकता.मात्र त्यासाठी वापरण्यात येणारे घटक मात्र जरा सौम्य वापरा.म्हणजे तर तुम्ही केसांसाठी ३० किंवा २० वॉल्यूम डेवलपर घेत असाल तर दाढीसाठी १० वॉल्यूम डेवलपर वापरा म्हणजे तुमचा लूक नॅचरल वाटेल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock