Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फुफ्फुसाच्या कॅन्सरची ’8′लक्षणं

$
0
0

फुफ्फुसांचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. ब-याचदा हा कर्करोग ७० पेक्षा अधिक वयाच्या वृद्धांमध्ये आढळून येतो.चाळीशीच्या आतील तरुणांना या विकाराचा धोका जरी कमी असला तरी वाढत्या वयाप्रमाणे धोकाही वाढू शकतो. धुम्रपान  करणा-या लोकांमध्ये हा विकार होण्याची ९० टक्के शक्यता असते.पण कधीकधी धुम्रपान न करणा-या लोकांना देखील हा कर्करोग होऊ शकतो.

नॉएडा येथील जेपी हॉस्पिटलच्या रेस्पिरेटरी अॅन्ड क्रिटीकल केअर युनीटचे सिनियर कन्सल्टंट डॉ. ज्ञानेंद्र अग्रवाल  यांच्या मते फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीच्या काळात आढळून येत नाहीत.या रोगाचे निदान काही वर्षांनी होते.त्यामुळे जेव्हा या रोगाची लक्षणे दिसू लागतात तोपर्यंत हा विकार पुर्णपणे विकसित झालेला असतो व त्याची लागण शरीरातील इतर अवयवांना देखील झालेली असते.

यासाठी जाणून घेऊयात लंग कॅन्सरची लक्षणे-

१.तीव्र खोकला-

जर दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर एक ही गंभीर बाब असू शकते.या लक्षणामध्ये दीर्घकाळापासून असलेल्या खोकल्यामुळे खोकताना छातीतून वेदना देखील जाणवतात.

२.खोकताना रक्त येणे-

काही फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये खोकताना लालसर कफ अथवा रक्तासह कफ पडण्याची समस्या आढळते.त्यामुळे रक्तासह कफ पडणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे एक प्रमुख लक्षण आहे.

३.श्वास घेताना त्रास होणे-

श्वास घेताना धाप लागणे,घरघर होणे व छातीमध्ये वेदना होणे ही देखील फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असल्याची किंवा तो होणार असल्याचे संकेत देतात.

४.चेहरा व आवाजात बदल-

या समस्येमध्ये आवाजात बदल होतो.रुग्णाचा आवाज घोगरा अथवा कर्कश होतो.त्याचप्रमाणे चेहरा,हात व मानेवर सूज येते.अशी लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असू शकते.

५.सतत इनफेक्शन होते-

रोग प्रतिकारशक्ती व ऊर्जा कमी झाल्यामुळे रुग्ण या स्थितीत सतत आजारी पडतात.अशा रुग्णांमध्ये श्वसनमार्गाचे इनफेक्शन झाल्यामुळे ब्रॉकायटिस होण्याची शक्यता अधिक असते.त्याच प्रमाणे फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे छातीत कफ जमा झाल्याने न्युमोनिया होण्याची देखील शक्यता असते.अशा व्यक्तीला जर दीर्घकाळापासून अस्थमा अथवा फुफ्फुसांची समस्या असेल व रुग्णाला कावीळ किंवा फेफरे अशी लक्षणे आढळली तर ही फुफ्फुसाच्या कॅन्सरची देखील लक्षणे असू शकतात.

फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या प्रगत टप्पात ही लक्षणे आढळतात-

१.हाडांमध्ये वेदना-

पाठ व मांड्यामध्ये सांधेदुखी हे फुफ्फुसाचा कॅन्सर शरीरात विकसित होत असल्याचे एक लक्षण आहे.कोणताही अपघात न होता फॅक्चर होणे हे देखील या कर्करोगाचे एक लक्षण आहे.

२.न्यूरोलॉजीकल लक्षणे-

कर्करोगाच्या पेशींची मज्जासंस्थेला लागण झाल्यामुळे मज्जासंस्थेच्या कार्यात बदल होतो.त्यामुळे डोकेदुखी,चक्कर,फेफरे,तोल जाणे,हातापायांना मुंग्या येणे अशी लक्षणे आढळतात.

३.शरीराला सूज येणे-

या विकाराच्या शेवटच्या टप्प्यात कर्करोगाची लागण चेह-याकडे झाल्यामुळे मानेच्या भागातील कॉलर बोनवर गाठी दिसतात.त्यामुळे मान,चेहरा,हाताच्या वरचा भागावर सूज दिसून येते.असे असल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वरील ही सर्व लक्षणे फुफ्फुसांच्या कर्करोगाप्रमाणे इतर आरोग्य समस्यांमध्ये देखील आढळू शकतात.या लक्षणांमुळे वेळीच यो रोगाचे निदान झाल्यास त्वरीत उपचार करुन तुम्हाला निरोगी जीवन जगता येऊ शकते.त्यामुळे वेळीच या लक्षणांना ओळखा व त्वरीत उपचार करुन घ्या.

चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>