मधूमेह हा एक असा विकार आहे ज्यावर फक्त उपचार केले जातात कारण तो विकार पुर्ण बरा करता येऊ शकत नाही.मात्र जीवनशैलीमध्ये काही विशेष बदल करुन मधूमेही रुग्ण निरोगी व दीर्घ अायुष्य नक्कीच जगू शकतो.घरातील एखाद्या व्यक्तीला मधूमेह झाल्यास कुटूंबियांच्या सहकार्याने या विकारावर नियंत्रिण मिळवणे सोपे जाऊ शकते.अशा वेळी तुमच्या प्रियजनांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे हे कदाचित तुमच्यासाठी एक आव्हान असू शकते. यासाठी जाणून घ्या घरातील मधूमेहींची काळजी कशी घ्यावी.
मधूमेह विकाराचे पुरेसे ज्ञान मिळवा-
तुम्ही तुमच्या घरातील मधूमेही व्यक्तीची तेव्हाच काळजी घेऊ शकता जेव्हा तुम्हाला या विकाराबाबत पुरेसे ज्ञान असते.त्यामुळे प्रथम मधूमेहाविषयी संपुर्ण ज्ञान मिळवा.जास्तीत जास्त या विकाराविषयी माहिती मिळवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकेल.लक्षात ठेवा निरोगी रहाण्यासाठी तुमच्या घरातील मधूमेहींनी प्रथम रक्तातील साखरेला नियंत्रित करणे शिकणे गरजेचे आहे.
त्यांच्या आहारावर लक्ष द्या-
मधूमेहींनी योग्य व वेळेत आहार घेणे आवश्यक असते.मधूमेहींनी कमीतकमी दिवसभरात तीन वेळा व्यवस्थित जेवणे गरजेचे आहे.यासाठी त्यांच्या आहार व निरोगी जीवनशैलीकडे पुरेसे लक्ष द्या. मधूमेंही निरनिराळे निरोगी पदार्थ खाण्यास प्रवृत्त करा.ते कमी तेलकट,कमी साखरेचे व कमी मीठ असलेले पदार्थ खातील याची काळजी घ्या.त्यांच्या आहारात भाज्या,फळे,तृणधान्ये व कडधान्ये असे भरपुर फायबरयुक्त पदार्थ समाविष्ठ करा.महत्वाचे म्हणजे जंकफूड खाणार नाही याची विशेष दक्षता घ्या.
मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
त्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन द्या-
रक्तातील साखर व वजन नियंत्रित करण्यासाठी शारीरिक कसरतीची त्यांना खुप मदत होऊ शकते.यासाठी नियमित व्यायाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.चालणे,धावणे,नाचणे व पोहणे असे व्यायाम त्यांच्यासाठी उत्तम असू शकतात.तुम्ही देखील त्यांच्या सोबत या उपक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी त्यांना मदत करा-
दररोज त्यांची रक्तातील साखर वेळेवर तपासण्यासाठी त्यांना मदत करा.त्याचप्रमाणे ते मधूमेहावरील औषधे वेळेवर घेत आहेत याची काळजी घ्या.दर तीन महीन्यांनी त्यांना डॉक्टरांकडे जाऊन A1C टेस्ट करण्याची आठवण करा.यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचा मधूमेह किती नियंत्रित झाला आहे हे तुम्हाला समजेल.
काही इमरजन्सी असल्यास काय करावे ते समजून घ्या-
यासाठी प्रथम मधूमेहामध्ये होणा-या त्रासदायक समस्या जाणून घ्या.मधूमेहामध्ये होणा-या १.शूगर कमी होणे(hypoglycaemia),२.शूगर वाढणे(diabetic ketoacidosis) व ३.शूगर अती वाढणे(hyperosmolar non-ketotic coma या स्थितीत शूगर ६००युनिट पेक्षा अधिक वाढते) या तीन समस्यांचा नीट अभ्यास करा.जर तुमच्या घरातील मधूमेहींच्या साखरेचे वाढलेले प्रमाण मध्यम असेल तर त्यांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढवा.किंवा जर त्यांच्या रक्तातील साखर कमी होण्याची समस्या असल्यास त्या रुग्णाला थोडी साखर किंवा मध द्या ज्यामुळे त्याची त्वरीत साखर वाढेल व लगेच त्यांना डॉक्टरकडे न्या.लक्षात ठेवा या तिन्हीही स्थितीतील रुग्णाला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक असते.
त्यांच्या डॉक्टरच्या अपॉईंटमेंट्स वेेळेवर घ्या-
घरातील मधूमेही व्यक्तीच्या डॉक्टरांशी ओळख करुन घ्या व तुम्ही स्वत:च डॉक्टरची अपॉईंटमेंट घेत जा.डॉक्टरांनी सांगितलेले औषध-उपचार वेळेवर समजून घ्या.तसेच एखादी इमरजन्सी असेल त्यावेळी नेमके काय करावे हे देखील डॉक्टरांना विचारा.
मानसिक आधार द्या-
मधूमेहाचा सामना करणे तसे खुप कठीण असते.मधूमेहामुळे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असते.तुमच्या प्रियजनांना या विकारामध्ये तुमच्या भावनिक आधाराची खुप गरज असू शकते.त्यामुळे त्यांना भावनिक आधार द्या.
मधूमेही मुलांची विशेष काळजी घ्या-
जर तुमच्या लहान मुलांना मधूमेह असेल तर तुमची जबाबदारी अधिकच वाढते.या विकाराला नियंत्रित ठेवण्याची कला प्रथम तुम्ही शिकणे महत्वाचे आहे.मुलांचा आहार,ब्लडशूगर वेळेवर तपासणे,वेळेवर इन्शूलीन देणे,विकारातील काही लक्षणे तपासणे हे तुमच्यासाठी खुप मोठे आव्हान असू शकते.मुलांच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर त्यांच्यामध्ये विकारामुळे होणारे बदल आधीच समजून घ्या.कदाचित या विकारामुळे तुमच्या मुलांच्या शाळेतील स्पोर्टस अॅक्टीव्हीटीवर परिणाम होऊ शकतो.यासाठी आधीच त्यांच्या शिक्षक व इतर मंडळींना या विषयी कल्पना द्या.त्यामुळे तुमच्या मुलांना शाळेतून सहकार्य मिळेल.तसेच मुले एकटी असताना त्यांना एखादी इमरजन्सी अाली तर ती परिस्थिती कशी हाताळावी याचे पुरेसे ज्ञान द्या.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock