अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने सार्यांची या असुराच्या त्रासातून सुटका केली. परंतू त्यामुळे त्याच्या अंगाची होणारी लाही कमी करण्यासाठी दुर्वांचा अभिषेक करून त्याला शांत करण्यात आले. म्हणूनच गणेशपूजनात प्रामुख्याने वापरली जाणारी दुर्वा आरोग्याच्या दृष्टीनेदेखील किफायतशीर आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का ? दुर्वामध्ये कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन यांचा मुबलक साठा आहे. म्हणूनच या ’9′ समस्यांवर दुर्वा नक्कीच फायदेशीर ठरते. (या ’4′ कारणांसाठी यंदा तुम्ही ‘इको फ्रेंडली’ गणपतीच आणा !)
- रक्तातील साखरेचे प्रमाण राखते – दुर्वामध्ये ‘हायपोग्लायस्मिक इफेक्ट’ असतो असे काही संशोधनातून सामोरी आले आहे.त्यामुळे मधूमेहींनी दुर्वाचा रस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे मधूमेहातून वाढणार्या गुंतागुतीच्या समस्या कमी होतात. (मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय)
- रोगप्रतिकारशक्ती वाढते - आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी तुम्हांला उत्तम रोगप्रतिकारशक्तीची साथ असणे गरजेचे आहे. दुर्वा शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते. त्यामुळे अनेक आजारांपासून सक्षमपणे लढण्याची क्षमता वाढते.
- स्त्रियांचे आरोग्य सुधारते – युरिनरी ट्रॅक इंन्फेकशनची समस्या पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आढळते. दुर्वा दह्यासोबत घेतल्यास मूळव्याध तसेच अंगावरून पांढरे जाण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. (युरिन इंन्फेक्शनवर परिणामकारक ‘दुधी भोपळ्याचा’ रस!)
- पचन सुधारते - खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे आजकाल पचनाचे विकार वाढले आहेत. मात्र नियमित दुर्वांचा रस प्यायल्यास पचनमार्गाचे कार्य सुधारते, पोट साफ राहण्यास मदत होते तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करणे शक्य होते. नियमित दुर्वांचा रस घेतल्यास पित्ताचा त्रासही कमी होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या डीटॉक्स होते.
- दात आणि तोंडाचे आरोग्य सुधारते – दुर्वांमध्ये ‘फ्लॅवोनाईड्स’ या अतिशय पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे अल्सरचा त्रास होण्याचा धोका कमी होतो.हिरड्या सुधारतात तसेच तोंडाला येणारी दुर्गंधीसुद्धा कमी होण्यास मदत होते.
- त्वचेच्या आजारांपासून सुटका होते – खाज येणे, रॅश येणे अशा त्वचाविकारांवर दुर्वा उपयुक्त आहे. त्यातील दाहशामक व अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असे आजार कमी करतात. यासाठी दुर्वाची पेस्ट हळदीत मिसळून त्वचेवर लावावी. कुष्ठरोगासारख्या गंभीर त्वचारोगामध्येदेखील हा नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतो.
- रक्त शुद्ध करते - दुर्वा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते. तसेच त्यामध्ये अल्कॅनिटीचे संतुलन ठेवण्यास मदत करते. यामुळे इजा, जखम झाल्यास किंवा मासिकपाळीतही अतिरिक्त प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही. दुर्वा शरीरात लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात परिणामी शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे अॅनिमियावर मात करणे शक्य होते.
- हृद्याचे आरोग्य सुधारते - दुर्वामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण व सोबतच कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात राहते तसेच ह्द्याचेही कार्य सुधारते. (कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !)
- शरीर फीट अॅन्ड फाईन ठेवते - दुर्वांचा रस प्यायल्याने तुम्हांला उर्जा मिळते. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी दुर्वा उपयुक्त आहे. तसेच दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी दुर्वा मदत करते.या रसामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते तसेच मज्जासंस्थेवरील ताणही कमी होतो. म्हणूनच मानसिक आणि शारिरिक ताण-तणाव हलका करण्यासाठी दुर्वांचा रस घेणे फायदेशीर आहे.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Top 9 health benefits of durva grass
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.