मधूमेह म्हटला की सगळ्यात जास्त बंधन ही त्यांच्या खाण्यावर येतात. प्रामुख्याने भात खाऊ नका असा सल्ला दिला जातो. भात अतिप्रमाणात खाल्ल्यास शरीरात ब्लड ग्लुकोज म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. मात्र भाताशिवाय जेवण अपुरं वाटत असल्यास काही जणं ब्राऊन राईसचा समावेश करतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र त्याऐवजी लाल तांदूळ खाणं अधिक फायदेशीर ठरतं. लाल तांदळामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते. असा सल्ला Fitness First India च्या आहारतज्ञ रिना बालीगा देतात.
- कसा ठरतो लाल तांदूळ फायदेशीर
पदार्थामधील ग्ल्यायस्मिक इंडेक्स जितका जास्त तितकी त्या पदार्थाच्या सेवनाने रक्तातील साखर वाढण्याचा धोका अधिक आहे. कारण ग्ल्यायस्मिक इंडेक्स अधिक असल्याने ते अधिक लवकर पचतात परिणामी त्यामधून रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक लवकर वाढते. पण ब्राऊन राईस प्रमाणे लाल तांदळामध्ये ग्ल्यायसिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे पांढर्या भातापेक्षा लाल तांदूळ खाणं अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे लाल तांदळाचा भात पचायला अधिक वेळ लागतो परिणामी त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाणही झटकन वाढत नाही. लाल तांदूळ की ब्राउन राईस कोणता अधिक पौष्टिक आहे?
मात्र लाल तांदळाचा आहारात समावेश करताना त्याचा दर्जा उत्तम असणं गरजेचे आहे. तुमच्या नियमित आहारात कार्बोहायड्रेटमधून मिळणार्या कॅलरीजचे प्रमाण 50-55% ठेवा. हे प्रौढांप्रमाणेच लहान मुलांच्या / मधूमेही रुग्णांच्या आहारात असणं फायदेशीर ठरते.लाल तांदळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचायला अधिक वेळ लागतो. तसेच पोट साफ होण्यासाठीही मदत होते. कार्बोहायड्रेसचा आहारातील समावेश वाढवण्यासाठी तुम्हांला केवळ गव्हावर अवलंबून रहावे लागत नाही. तर लाल तांदूळ हा गव्हाला एक उत्तम पर्याय आहे .मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
- लाल तांदळाची निवड कशी कराल ?
लाल तांदळाची निवड दुकानातून किंवा अगदी ऑनलाईन शॉपिंग करत असाल तरीही काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे. ब्राऊन राईसप्रमाणेच लाल तांदळाच्या टरफलांमध्येही नॅचरल ऑईल असते. रिफाईन्ड तांदळाच्या तुलनेत त्याची टिकाऊ क्षमता कमी असते. लाल तांदूळ सुमारे सहा महिने टिकतो. मात्र फ्रीजमध्ये साठवल्यास त्याचा टिकाऊपणा थोडा अधिक वाढवता येतो.त्यामुळे तांदूळ विकत घेण्यापूर्वी त्यावरील तारीख तपासून पहा. गरजेपेक्षा भरपूर आणि एकाचवेळी तांदूळ भरणे टाळा. मात्र तसे करायचे असल्यास ते योग्यप्रकारे साठवण्याची सोय करा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock