ज्या वेळेस हृद्याला रक्तपुरवठा होण्याच्या कार्यामध्ये ब्लॉकेजेस किंवा इतर कारणांमुळे अडथळा येतो. तेव्हा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे 20शी आणि 30 शीतील तरुणांमध्येही कोणत्याही तत्सम संकेतांशिवाय हार्ट अटॅक येत असल्याचे चित्र आढळत आहे. मग अशावेळी अचानक हार्ट अटॅक आल्यास घाबरून न जाता त्याव्यक्तीला मदत करणे आवश्यक असते. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यास मदत होते. पण ही मदत कशाप्रकारची असावी याबाबतचा खास सल्ला विख्यात हृद्यरोगतज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी दिला आहे.
एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यास नेमकी कोणती मदत कराल ?
छातीत वेदना जाणवणं हे हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे. हृदयविकाराचा झटका आणि अॅसिडीटीमध्ये अनेकदा रुग्णाचा गोंधळ होतो. अशावेळेस रुग्णाच्या छातीत दुखत असल्यास त्याला आरामदायी स्थितीमध्ये ठेवा. कपडे सैलसर करा. तसेच खिडक्या उघड्या करा. त्यानंतर त्यांच्या जीभेखाली अॅस्प्रीनची गोळी ठेवा. मात्र अॅस्प्रीनसोबत पाणी देऊ नका. त्याऐवजी त्यांना गोळी चघळायला सांगा. अॅस्प्रीन ऐवजी तुम्ही sorbitrate ची गोळीदेखील देऊ शकता. गोळी रुग्णाच्या जीभेखाली ठेवा. साधारण 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये 3 sorbitrate गोळ्या देऊ शकता. अॅस्प्रीन आणि sorbitrate या दोन्ही गोळ्यांमध्ये anti-coagulant क्षमता असते. यामुळे रक्तातील गुठळ्या कमी होण्यास मदत होते. मात्र ज्या रुग्णांना खूप घाम असेल किंवा लो बीपीचा त्रास असेल त्यांना sorbitrateच्या गोळ्या देऊ नका.
डॉ. सुरासे यांच्या सल्ल्यानुसार, रुग्णाला जमिनीवर सरळ झोपवू नका. त्यांना खूर्चीवर बसवा किंवा सोफ्यावर त्यांना मागे रेटून बसवा. याऐवजी त्यांना खोकायला सांगा. यामुळे फुफ्फुसातील श्वसनमार्ग खुला होण्यास मदत होईल. Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे हे ’5′ संकेत मूळीच दुर्लक्षित करू नका.
रुग्णाला हार्ट अटॅक आल्याचे समजताच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची सोय करा. हृद्यविकाराच्या झटक्यानंतरचा एक तास हा golden hour गोल्डन आअर समजला जातो. झटक्यानंतर हार्ट पंप होण्याची क्रिया मंदावते. त्याचा परिणाम इतर अवयवांवर होऊ शकतो. स्ट्रोकप्रमाणेच हार्ट अटॅकच्या झटक्यानंतरही पुढील तासाभरातील प्रामुख्याने golden hour (गोल्डन आअर) दरम्यानची रिकव्हरी अधिक पटकन होते. नक्की वाचा :Heart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ?
हृद्यविकाराच्या रुग्णांकरिता खास टीप्स
- छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. हार्ट अटॅक व्यतिरिक्त या ’5′ समस्यांमुळेही छातीत दुखू शकते !
- रुग्णाला आरामदायी स्थितीत बसवा.
- रुग्णाला हवेशीर ठिकाणी बसवा.
- aspirin किंवा sorbitrate गोळ्या जवळ ठेवा.
- हार्ट अटॅक आल्यानंतर तासाभरात रुग्णाला वैद्यकीय मिळेल याची सोय करा. या ’4′ लक्षणांनी ओळखा तुम्हांला हार्ट अटॅक आलाय
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock