योगसाधना करताना शरीराची अनेक प्रकारे हालचाल होते. पण त्याचबरोबर शरीर-मनावरील ताण हलका होऊन शांत वाटते. एखादे सोपे, प्राथमिक योगासन केल्याने तुम्ही इतर विचारांपासून दूर होऊन रिलॅक्स व्हाल. त्याचं नाव आहे अधोमुख श्वानासन. जर तुमचे हॅमस्ट्रिंग मसल्स काहीसे कडक असतील तर हे आसन करणे तुमच्यासाठी थोडे आव्हानात्मक ठरेल. कारण या आसनाचा परिणाम पाठीऐवजी हॅमस्ट्रिंग मसल्सवर अधिक होतो. पण तसं यात अवघड काहीच नाही. योगा एक्स्पर्ट प्रग्या भट यांनी या आसनाचे इतर फायदे आणि ते करण्याची योग्य पद्धत सांगितली. जाणून घ्या: योगा आणि स्ट्रेचिंगमध्ये नेमका काय फरक असतो ?
फायदे:
शरीरावरील ताण घालवून शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी हे आसन अतिशय उत्तम आहे. यामुळे खांदे, हात, पाय यांना स्ट्रेच मिळतो. मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर आणि मोनोपॉजच्या लक्षणांवर हे आसन फार उपयुक्त आहे. तसंच sciatica आणि sinusitis यासाठी हे आसन उपचारात्मक आहे. जरूर वाचा: शरीरातील शीण घालवणारे ‘शवासन’
आसन करण्याचे टप्पे:
- वज्रासनातून सरळ गुडघ्यांवर उभे रहा. नंतर समोर झुकत दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवा. मग पायाची बोटे जमिनीवर टेकवा. आता गुडघे वर उचला. या स्थितीत स्थिर झाल्यानंतर गुडघे काहीसे दुमडा. आणि तुमच्या टाचा आकाशाच्या दिशेने असतील.
- पोट काहीसे आत ओढून घ्या आणि पाठीचा कणा मानेपासून माकडहाडापर्यंत (टेलबोनपर्यंत) अधिक स्ट्रेच करा. काही श्वास या आसनात स्थिर रहा.
- हळूहळू गुडघे सरळ करून पूर्वस्थितीत या. पूर्व स्थितीत येताना तुम्ही हस्तपादासनातून वर येऊ शकता. किंवा सावकाश सरळ उभे रहा. या ‘५’ कारणांमुळे ऑनलाईन ट्युटोरिअलपेक्षा योगा क्लासला जाणे ठरते फायदेशीर !
प्रेग्नसीमध्ये हे आसन करताना करायचे काही बदल:
- प्रेग्नसीमध्ये हे आसन करताना पायात काहीसे अंतर ठेवा म्हणजे तुमचे पोट योग्य स्थितीत राहील. आणि तुम्हाला शक्य असेल तर काही श्वास या आसनात रहा.
हे आसन कोणासाठी वर्ज्य आहे?
- जर तुम्हाला पाठ, खांदे यांना काही दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. तसंच उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे आसन करणे टाळावे. योगसाधनेतून करा पाठदुखीला अलविदा !
- या आसनात शरीराचा भार हातावर येत असल्याने मनगट दुखत असल्यास किंवा त्यास कोणतीही दुखापत झाली असल्यास हे आसन करू नका. जाणून घ्या: अतिलठ्ठ लोकांनी कशी कराल योगाभ्यासाला सुरवात ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock