Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शुगर फ्री ड्रिंक्समुळे खरंच वजन कमी होते ?

$
0
0

वजन कमी करण्यासाठी आपण सॉफ्ट ड्रिंक्स पिणे बंद करतो. जर तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम करत असाल तर याचा फायदा नक्कीच होतो.  वजन कमी करण्यासाठी कार्बोनेटेड आणि साखरयुक्त पदार्थांऐवजी शुगर फ्री ड्रिंक्स घेणे कदाचित योग्य ठरणार नाही. परंतु, शुगर फ्री ड्रिंक्समुळे वजन न वाढण्यास मदत होते. याचा अर्थ असा नाही की त्यामुळे तुमचे अतिरिक्त फॅट्स कमी होतात. तसंच कोणत्याही संशोधनातून हे सिद्ध झालेले नाही की शुगर फ्री ड्रिंक्स घेतल्याने वजन कमी होते.

Wockhardt Hospital चे Senior Bariatric Surgeon आणि Director-Center of Bariatric आणि Metabolic Surgery डॉ. रमण गोएल यांनी सांगितले की जेव्हा तुम्ही शुगरी ड्रिंक्स घेत नाही तेव्हा तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित असते. त्यामुळे वजन वाढत नाही.  परंतु यामुळे वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची आवश्यकता असते. तसंच जीवनशैलीतही विशेष बदल करावे लागतात. The Journal of the Academy of Nutrition and Dietetics यांच्या अहवालानुसार जे लोक शुगर फ्री ड्रिंक्स घेतात त्यांना असे वाटते की त्यांना कमी कॅलरीज मिळाल्या आहेत. त्या कॅलरीज भरून काढण्यासाठी ते लोक साखर, सोडियम, फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थ अधिक घेतात. त्यामुळे कालांतराने त्यांचे वजन वाढते. तसंच artificially-sweetened पदार्थ जे लो कॅलरीज आहेत असे समजले जाते असे पदार्थ खाल्याने मेंदूमधील sweet receptors ना चालना मिळते आणि त्यामुळे कॅलरीजची पूर्तता करण्यासाठी अधिक गोड़ खाण्यास मनुष्य प्रवृत्त होतो. जिरं आणि केळं- वजन कमी करण्याचा घरगुती उपाय !

शुगर फ्री ड्रिंक्स बद्दल दोन गैरसमज अगदी प्रचलित आहेत. ते म्हणजे शुगर फ्री ड्रिंक्स हेल्दी असून वजन कमी करण्यास त्यांची मदत होते. परंतु, हे खरे नाही. याला कोणत्याही संशोधनाचा आधार नाही. याउलट यात कृत्रिम स्वीटनर्स असल्याने वजन वाढते. तसंच तुमच्या शरीरातील पोषक घटक नाहीसे करून स्थूलपणा आणि टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. म्हणून आहारात शुगरी आणि कार्बोनेटेड पदार्थ घेणे टाळा आणि त्याऐवजी हंगामी फळे खा. त्यामुळे पोषक घटक मिळून वजन नियंत्रित राहते. झटपट वजन कमी करण्याचे 5 सुपरहिट फंडे !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>