Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

यंदा व्हॅलेंटाईन डे ला सोशल मीडियावर या ‘६’चुका करू नका !

$
0
0

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो.  या महिन्यात येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे मुळे तो प्रेमी युगुलांसाठी खास असतो. व्हॅलेंटाईन डे आठवडाभरावर असताना एखाद्या फ्रेंड्सला चिडवणे, त्रास देणे असे प्रकार करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की आपले काही फ्रेंड्स, फॉलोवर्स कमी होऊ नयेत तर सोशल मिडियावरील काही चूका कटाक्षाने टाळायला हव्यात.

  1. स्वतःबद्दल खूप माहिती देऊ नका: व्हॅलेंटाईन डे चा तुमचा प्लॅन सोशल मिडियावर शेअर करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. त्यात चुकीचे काहीच नाही. पण तुमच्या प्रेमाचा बहर तुमच्या दोघांपर्यंत मर्यादीत ठेवा. सोशल मिडिया त्याचा अतिरेक करणे टाळा. तुम्ही किती मस्त वेळ घालवला याच्या सतत पोस्ट करणे शक्यतो टाळा. असे केल्याने तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्ण वेळ देण्याऐवजी पोस्ट करण्यात व्यस्त रहाल. तुम्ही किती मस्त वेळ घालवताय, हे सगळ्यांना दाखवण्यासाठी पोस्ट करणे टाळा. त्याऐवजी तुमचं सेलिब्रेशन वैयक्तिक स्वरूपात ठेवा आणि कमीत कमी पोस्ट करा.
  2. प्रेमीयुगलांची चेष्टा करणे: एकीकडे प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा पाऊस सोशल मिडियावर पडत असतो. तर दुसरीकडे सिंगल लोक त्याची खिल्ली उडवतात, चेष्टा करतात. प्रेमाबद्दलचे त्यांचे कटू अनुभव, मत विनाकारण मांडतात. ते प्रेमात असलेल्या तुमच्या फेंड्सना चांगले वाटत नाही. अपयशी प्रेमही शिकवते या ’8′ गोष्टी !
  3. स्वतःवर दया करू नका, एन्जॉय करा: अजून एक गोष्ट सिंगल मुलामुलींनी टाळावी. ती म्हणजे सोशल मिडियावर त्यांच्या एकटेपणाच्या पोस्ट करणे, ट्विट करणे. तुमच्या एकटेपणाची प्रदर्शन करण्यापेक्षा तुमच्या फेंड्स, फॅमिलीसोबत वेळ घालवा आणि त्या पोस्ट सोशल मिडियावर करा. स्वतःबद्दल मनात द्या न बाळगता मस्त एन्जॉय करा. सिंगल मुलींनो ! या ’6′ डेटिंग टीप्स टाळाच
  4. तुमच्या महागड्या गिफ्ट्सच्या बढाया मारू नका: तुमच्या पार्टनरने तुम्हाला महागडे गिफ्ट दिले तर स्वाभाविकच तुम्ही एक्ससाईटेड असणार. फुलांचा बुके, चॉकलेट बॉक्स अशा गिफ्ट्सचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट करणे हे देखील पूर्णपणे स्वाभाविक आहे. पण एखादं महागडं गिफ्ट किंवा फोन गिफ्ट म्हणून मिळाला तर अशा गोष्टी खाजगीच ठेवा. अशा पोस्टमुळे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा फॉलोवर्सना मत्सर आणि जलसी वाटण्यास प्रवृत्त करता.
  5. प्रपोज करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर: प्रपोज करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर अजिबात करू नका. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला अवघडल्यासारखे व लाजिरवाणे वाटू शकते. मुलींनी पुढाकार घेऊन प्रपोज केल्यास होतील हे ’9′ फायदे !
  6. पार्टनरसाठी मेजेस लिहिताना, पोस्ट शेअर करताना पार्टनरला टॅग करू नका: तुम्हाला तुमच्या पार्टनरला स्पेशल ट्रीट म्हणून काही मेजेस लिहायचा असेल किंवा एखादी पोस्ट करायची असेल तर ते करताना इतर फ्रेंड्सना टॅग करू नका. मेजेस करताना पर्सनल मेसेज द्वारा करा.  इतर नातेवाईक ही फ्रेंडलिस्ट मध्ये असल्याने विनाकारण काही समस्या येऊ नये म्हणून तुमच्या पार्टनरला ही टॅग करण्यापूर्वी विचारा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>