Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कॅन्सरवरील उपचारादरम्यान वजन का कमी होते ?

$
0
0

कर्करोगाची लक्षणंं,कर्करोगावरील उपचार,उपचारादरम्यान रुग्णांमध्ये आढळणारे बदल याबाबत प्रत्येकाने जागरुक असणे खुप महत्वाचे आहे.कर्करोगाचे निदान झाल्यावर त्यावर उपचार करण्यात येतात.कर्करोग कोणत्या टप्पावर आहे यानूसार हे उपचार केले जातात.मात्र कधीकधी कर्करोग ग्रस्त रुग्णाचे उपचार सुरु असताना अचानक वजन कमी होऊ लागते.असे रुग्णाचे अचानक खुप वजन कमी झाल्यास त्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे कर्करोगाच्या उपचारा दरम्यान रुग्णाचे वजन कमी झाल्यास याकडे दुर्लक्ष करु नका.अनेक जणांना हे देखील माहीत नसते की कर्करोगामुळे वजन कमी होऊ शकते.तसेच काही जणांना असे वाटते की केमोथेरपी अथवा रेडीएशन या उपचारांमुळे रुग्णाचे असे वजन कमी होत असावे.

मुलूंडच्या फोर्टीस हॉस्पिटलच्या Consultant Medical Oncologist व Hemato-Oncologist डॉ.तेजींदर सिंग यांच्याकडून कर्करोगामध्ये रुग्णाचे वजन कमी का होते याविषयी अधिक माहीती जाणून घेऊयात.

डॉ.सिंग यांच्यामते जर कोणत्याही कॅन्सर रुग्णाचे सहा महिन्यांमध्ये इतर कोणतेही कारण नसताना दर १० किलोपेक्षा अधिक वजन कमी झाले तर ते कर्करोग या विकारामुळेच कमी होण्याची अधिक शक्यता असते.अशा रुग्णांनी त्वरीत डॉक्टरकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे जर कर्करोगाच्या उपचारा दरम्यान रुग्णाचे वजन कमी झाले तर हे एक अयोग्य लक्षण असू शकते कारण याचा अर्थ रुग्णाचे शरीर उपचारांना योग्य तो प्रतिसाद देत नाही असा होतो.

कर्करोगाच्या रुग्णांचे केमोथेरपी अथवा रेडीएशन उपचारांमुळे वजन कमी होत नाही.कधीकधी तर कर्करोगाच्या रुग्णांवर हे उपचार सुरु केल्यावर त्यांचे वजन वाढू लागल्याचे आढळते.तसेच असे वजन वाढणे हे उपचार योग्य दिशेने सुरु असल्याचे देखील एक लक्षण असू शकते.

 केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार !

मात्र कधीकधी डोके व मानेचे कॅन्सर जसे की माऊथ कॅन्सर,ओरल कॅन्सर,जीभेचा कॅन्सर अशा कॅन्सर मध्ये वजन कमी होण्याची शक्यता असते.कधीकधी कॅन्सरच्या चौथ्या टप्पात उपचारांना रुग्णाचे शरीर प्रतिसाद देत नसल्यास वजन कमी होऊ शकते.कधीकधी कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळात देखील वजन कमी होते.काही वेळा केमोथेरपी व रेडीएशन मुळे माऊथ अल्सर बरे होताना त्रास झाल्यामुळे देखील असे वजन कमी होते.तसेच ८० ते ९० टक्के रुग्णांना केमोथेरपीमुळे तोंडाची चव जाण्याचा त्रास होतो.गिळताना त्रास झाल्यास एक ते दिड महिन्यात त्या रुग्णाचे ६ ते ७ किलो वजन कमी होते.असे असले तरी केमोथेरपीमुळे तोंडाची गेलेली चव काही काळाने व कुटूंबातील लोकांनी घेतलेल्या काळजीमुळे सुधारु शकते.त्यानंतर रुग्णाच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होते व वजन वाढण्यास सुरुवात होते तसेच पुन्हा वजन कमी होत नाही.जाणून घ्या या ’8 कारणांमुळे तोंडाला चवच जाणवत नाही

पॉझिटीव्ह विचारसरणी,योग्य आधार,डायटीशन व न्यूट्रीशियन यांचा अचूक सल्ला यामुळे रुग्णाचे वजन पुन्हा वाढते.उपचारांच्या दरम्यान वजन कमी होणे हे योग्य आरोग्य लक्षण नाही.यासाठी कर्करोग विकाराच्या कोणत्याही टप्पावर वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करु नका.त्वरीत डॉक्टरकडे जाऊन आरोग्य तपासणी करुन घ्या.तसेच चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

Read this in English

Translated by R.Prameela

छायाचित्र सौजन्य: Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>