बाळाच्या रडण्यामागची कारणे समजणे तुम्हाला कधीकधी कठीण जाते.पण लक्षात ठेवा तुमचे बाळ रडणे हे ते निरोगी असण्याचे एक लक्षण आहे.बाळाच्या गरजा व इच्छा तुम्हाला समजण्याचा तो एक संकेत असू शकतो.
मुंबईतील अश्विनी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पिडीआट्रिशियन डॉ.गीतांजली शाह यांच्या मते बाळाच्या रडण्यामुळे आईला बाळाला काय हवे आहे ते समजणे सोपे जाते.तसेच यामुळे बाळाचे व आईचे नाते अधिक दृढ होते.बाळ रडत असेल तर त्याला प्रेमाने व मायेने जवळ घेण्याची आवश्यक्ता असते.
यासाठी जाणून घेऊयात बाळाच्या रडण्याची ही ५ चांगली कारणे-
बाळाचे पहीले रडू खुप महत्वाचे असते-
बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या रडण्यामुळे त्याचा जन्म सुखरुप झाल्याची आनंदवार्ता तुम्हाला समजते.त्याचप्रमाणे बाळाचे पहिले रडू त्याच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचे असते.डॉ.शाह यांच्या मते जेव्हा बाळ जन्मानंतर प्रथम रडते तेव्हापासून आईच्या गर्भाबाहेर श्वास घेण्यासाठी त्याची फुफ्फुसे कार्यरत होतात.पण हे फक्त बाळाच्या पहिल्या रडण्यामुळेच होते त्यानंतर बाळ रडल्यामुळे त्याची फुफ्फुसे सक्षम होतात हा एक गैरसमज आहे.त्यामुळे पुढे बाळाचे रडणे त्याला एखादा त्रास होत असल्याचे एक लक्षण देखील असू शकते.बाळ जन्मानंतर लगेच रडू लागल्यास काळजी करु नका हे त्याचे आरोग्य उत्तम असल्याचे एक लक्षण असू शकते. जाणून घ्या या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !
बाळाला संवाद साधणे सोपे जाते-
जर तुम्ही जवळ नसताना तुमचे बाळ रडत असेल तर त्याला तुमची गरज अाहे हे समजून घ्या.डॉ.शाह यांच्या मते बाळ रडण्यामागची अनेक कारणे असू शकतात.मात्र कारण कोणतेही असले तरी तुमच्या बाळाला आता तुमची गरज आहे हे प्रथम ओळखा.प्रत्येक नवमातेला बाळाच्या रडण्याचे संकेत हळूहळू समजू लागतात.त्यामुळे तुमचे बाळ रडत असेल तर प्रथम त्याला जवळ घ्या.त्याला भूक लागली आहे का,डायपर चेंज करण्याची वेळ झाली आहे का,थंड अथवा गरम होत अाहे का,त्याला काही हवे आहे का, किंवा त्याला तुमची गरज आहे का हे तपासा.त्यामुळे तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी बाळ रडू शकते हे लक्षात ठेवा.
जेव्हा तुम्ही बाळाला प्रेमाने जवळ घेता तेव्हा ते एकटे नाही ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होते.डॉ.शाह याच्या मते काही मोठी माणसे जेव्हा बाळाला शिस्त लावण्यासाठी त्याला एकटे ठेवतात.पण नवजात बाळाला शिस्तीपेक्षा तुमच्या प्रेमाची व काळजीची अधिक गरज असते.त्यामुळे तुमच्या बाळाला अधिक सुरक्षित वाटते.असे प्रेम भरपुर मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रेमळ व्यक्तिमत्व विकसित होते.या विरुद्ध दुर्लक्ष केलेल्या मुलांचा मानसिक विकास कमी होतो.कधीकधी तर अशा मुलांची मानसिक वाढ खुपच कमी होते. जरुर वाचा या 6 प्रकारांनी बाळाला लवकर बोलायला शिकवा !
बाळाच्या रडण्यामुळे त्याच्या स्नायूंना आराम मिळतो-
बाळ रडताना त्याच्या शरीरातील सर्व स्नायू ताणले जातात.पण सतत बाळाने असे रडून स्नायू ताणणे योग्य नाही.यासाठी तुमचे बाळ कोणतीही आरोग्य समस्या नसताना सतत रडत असेल तर याबाबत सावध असणे गरजेचे आहे. नक्की वाचा बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय
रडणे भावना प्रगट करण्याचे एक माध्यम असते-
मोठ्यांप्रमाणे लहान मुलांनापण भावना व्यक्त करण्यासाठी रडण्याची मदत होते.जेव्हा तुमचे मुल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करते व तुम्ही त्या हट्टाला नकार देता सहाजिकच ते रडू लागते.असे असल्यास लगेच चिडू नका तुमचे बाळ त्याच्या रडण्यातून मनातील भावना व्यक्त करत असते हे लक्षात ठेवा.डॉ.शाह यांच्या मते बाळ रडू लागल्यास त्याच्या गरजा व इच्छा समजून घ्या.मग त्यांच्या हट्टापासून त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करा.हा हट्टी मुलांना समजवण्याचा व त्यांच्या भावनांमध्ये समतोल राखण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.
Read this in English
Translated by R.Prameela
छायाचित्र सौजन्य: Shutterstock