मेष-
हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र ग्रहमान पाहता मधूमेहींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मध्यमवयीन लोकांनी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. आरोग्यास घातक अशा सवयी बदला. नियमित व्यायाम, ध्यानसाधना करा. म्हणजे तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारेल.
वृषभ -
या आठवड्यात तुम्हांला अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच ऋतूमानात होणार्या बदलांमुळे आजारी पडण्यापासून दूर रहा. मध्यमवयीन तसेच त्याहून अधिक वयोगटातील लोकांनी मधूमेह, रक्तदाबाच्या त्रासापासून दूर रहा. तसेच नियमित मेडीकल चेकअप करा.
मिथून -
या आठवड्यात तुम्हांला सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच पचनाच्या विकारामुळेदेखील तुम्हांला या आठवड्यांत त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यावर मात करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करा. आहारासोबत व्यायामाचेही पथ्य पाळा म्हणजे तुमचे स्वास्थ्य निरोगी राहील.
कर्क -
या आठवड्यात काही लहान आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्वसनाच्या विकारांकडे दूर्लक्ष करू नका. त्यामुळे तरुण आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांनी आहार आणि लाईफस्टाईलच्या बाबतीत दक्ष रहावे. मधूमेह, ब्लड प्रेशरचा त्रास असणार्यांनी औषधांच्या बाबतीत टाळाटाळ करू नका.
सिंह -
मध्यमवयीन आणि वृद्धांमध्ये ज्यांना काही जुनाट आजार आहेत. अशा लोकांनी योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. यासाठी काही अल्टरनेटिव उपचार पद्धती निवडा. जंकफूड खाणे टाळा.
कन्या -
या आठवड्यात आरोग्यासंबंधित कोणते आजार उद्भवण्याची शक्यता नाही. परंतू म्हणून आरोग्य गृहीत धरू नका. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी योगा आणि योगसाधना करा. काही जुन्या आजारांवर या आठवड्यात मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
तूळ -
या आठवड्यात तुमचे ग्रहमान आरोग्याच्यादृष्टीने चांगले राहील. गेले काही दिवस तुम्हांला त्रास देणारे आजार आता ठीक होण्याची लक्षणं आहेत. मात्र काहींना कफ, खोकला तसेच व्हायरल फिवरचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा आणि आजरपणं टाळा.
वृश्चिक -
या आठवड्यात ग्रहमान तुमच्यासाठी फारशी अनुकूल आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होईल. यामुळे बदलत्या ऋतूमानाचा तुमच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही त्रासदायक लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चेकअप करा.
धनू -
या आठवड्यात आरोग्याची चिंता करू नका. कोणते गंभीर दुख़णे डोके वर काढण्याची शक्यता नाही. मात्र पचनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित संतुलित आहार, व्यायाम, योगसाधना करा. यामुळे तुमचा फीटनेस वाढेल.
मकर -
जुने काही आजार नव्याने त्रास देणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याबाबत हलगर्जीपणा करू नका. या आठवड्यात पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी परिणामकारक औषध घ्या व या त्रासापासून सुटका मिळवा. मध्यमवयीन आणि वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायाम आणि योगसाधना करा.
कुंभ -
या आठवड्यात लहान-सहान आजारदेखील त्रासदायक ठरण्याची लक्षणं आहेत. पचनाचे विकार पुन्हा डोकं वर काढण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे याकडे दूर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्या. अन्यथा तुम्हांला घरीच काही दिवस आराम करावा लागेल. अन्यथा तुमचे आरोग्य ठीक राहील.
मीन -
या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. मात्र उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्रासदायक परिस्थिती टाळा. म्हणजे तुम्ही शांत रहाल. मधूमेहींनी तणावग्रस्त परिस्थिती टाळावी. मानसिक आणि शारिरीक संतुलन राखण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करावेत.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.