Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साबुदाण्याचे ‘७’आरोग्यदायी फायदे !

$
0
0

आषाढी एकादशी अवघ्या ५-६ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात. उपवास म्हटले की, साबुदाण्याची खिचडी आली. कसाव्हाच्या झाडापासून मिळणाऱ्या स्टार्चपासून साबुदाणे तयार केले जातात. भारताप्रमाणेच सर्व जगभर हेच साबुदाणे उपवासासाठी वापरले जातात. साबुदाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

स्नायूंचा विकास होण्यास मदत होते –

प्रोटिन्स मिळवण्यासाठी हा एक उत्तम शाकाहारी पर्याय आहे. साबुदाण्याचा आहारात समावेश केल्याने तुमच्या शरीराला प्रोटिन्सचा पुरवठा होऊन स्नायूंची वाढ होऊन ते मजबूत होतात. तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

हाडे निरोगी राहतात –

साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न व ‘व्हिटॅमिन के’ मुबलक प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत होते. तसेच यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा कमी होऊन उत्साह वाढण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो –

साबुदाण्याचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यातील पोटॅशियममुळे रक्तप्रवाह सुधारून रक्तवाहिन्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते.

ऊर्जेची पातळी वाढते –

तुम्हांला दिवसभर काम करून अधिक थकवा जाणवत असल्यास आहारात साबुदाण्याचा समावेश करावा. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच साबुदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्याने हा ऊर्जा मिळवण्याचा जलद आणि आरोग्यदायी मार्ग आहे.

वजन वाढण्यास मदत होते –

वजन वाढवण्यासाठी साबुदाणा अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स असल्याने लवकर वजन वाढते. खाण्यासंबंधीचे विकार असलेल्या किंवा वजन वाढवणाऱ्यांसाठी साबुदाणे हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. साबुदाणे लवकर शिजतात व बाजारात मिळणारे इतर कोणतेही कृत्रिम पदार्थ खाण्यापेक्षा हा आरोग्यदायी पर्याय आहे.

जन्मदोषांपासून संरक्षण होते –

साबुदाण्यामध्ये फोलिक अॅसिड आणि ‘व्हिटॅमिन बी’ असल्याने अर्भकाची योग्य वाढ होते व इतर मज्जासंस्थेसंबंधीच्या दोषांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारते –

साबुदाण्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि वात यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच साबुदाण्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

साबुदाण्याच्या खिचडीऐवजी यंदा उपवासासाठी ही हेल्दी कंदमुळांची टिक्की करूनही खाऊ शकता.

संबंधीत दुवे –

कांद्याचे ५ आरोग्यदायी फायदे 

टेस्टी पनीरचे ’5′ हेल्दी फायदे !

भेंडी खा आणि निरोगी रहा !!!

Translated by – Lina Bhalke

Source – 7 health benefits of sabudana or tapioca

छायाचित्र सौजन्य – Getty Images

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>