Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

महाराष्ट्रात ‘उत्पादित’तंबाखूवरही बंदी, एफडीएचा निर्णय

$
0
0

महाराष्ट्रात गुटखा, तंबाखूवर गेल्या 2 वर्षांपासून बंदी घालण्यात आली होती.  मात्र आता केशर, मेंथॉल अशा स्वादयुक्त पदार्थ मिश्रित तंबाखूवरही बंदी घालण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी २० जुलै पासून वर्षभरासाठी केली जाणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे.

तंबाखूचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता गुटखा/ पानमसाला, स्वादिष्ट /सुगंधित तंबाखू, सुपारी तसेच चघळण्याचा तंबाखू, खर्रा, मावा अशा पदार्थांच्या उत्पादन, विक्री व साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे.

तंबाखूच्या सेवनामुळे अनेक  गंभीर आजार जडण्याची शक्यता असते. यामध्ये हृदयविकार, श्वसनाचे विकार याचबरोबर पोटाचा, तोंडाचा , अन्ननलिकेचा कर्करोग, प्रजननक्षमतेवर होणरा दुष्परिणाम, घटणारा मेटॅबॉलिक रेट आदींचा समावेश आहे.  त्यामुळे  मानवी आरोग्याचे हित लक्षात घेता प्रक्रिया न केलेल्या व चखळण्याच्या स्वरुपात उपलब्ध असलेल्या तंबाखूची, सुपारीची विक्री, साठवणूक व उत्पादन करणे आता तुम्हांला शिक्षेस पात्र ठरवू शकते.

संबंधित दुवे

धुम्रपानामुळे होतात सेक्सलाईफवर गंभीर परिणाम ! 


मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>