Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

वजन घटवायचयं ? मग जेवणाआधी खा हे ’3′पदार्थ !

$
0
0

वजनावर नियंत्रण नसल्याने तुमचं सौंदर्य तर धोक्यात येतेच पण त्याचबरोबर शरीरात अनेक गुंतागुंतीचे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यावर ताबा ठेवा, नियमित व्यायाम करा आणि या काही आरोग्यदायी सवयींचा नक्की तुमच्या दिनक्रमात नक्की समावेश करा.

1) जेवणापूर्वी पाणी प्या  - 

पाणी शरीरातील मेटॅबॉलिझम वाढवण्यास तसेच कॅलरीज कमी करण्यास मदत करतात. कारण पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते परिणामी तुमचे वजन घटते. पण जेवणापूर्वी किमान 1 तास अगोदर ग्लासभर पाणी प्यावे. यामुळे पोट भरलेले राहते.तसेच पाण्याऐवजी काही साखरयुक्त पेयं / सॉफ्ट्ड्रिंक्स प्यायल्यास विनाकारण शरीरात सुमारे 100 कॅलरीज वाढण्याची शक्यता असते. पण हेच पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायल्यास तुम्हांला अधिक फायदा होऊ शकतो. वजन घटवण्यासोबत तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 7 फायदे तुम्ही नक्की जाणून घ्या.

नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जर्नल ऑफ ओबेसिटी’च्या अभ्यासानुसार संशोधकांनी हा  3महिने काही लठठ लोकांवर एक प्रयोग केला. त्यानुसार लो-कॅलरी डाएट असणार्‍या  निम्म्या लोकांना जेवणापूर्वी ग्लासभर पाणी प्यायला दिले.  परिणामी त्या लोकांचे सुमारे 7 किलो वजन कमी झाले.[1].

तर  ‘जर्नल ऑफ ओबेसिटी’च्या  आणखी एका अभ्यासानुसार जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास काही लोकांमध्ये 13% कॅलरीजची घट होण्यास मदत झाली. [2]

पण जेवताना पाणी पिणे टाळण्याची ही ’5′ कारणं तुम्ही नक्की जाणून घ्या.

2)  पाणीदार फळं - 

जेवणापूर्वी पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असल्यास पाण्याचा अधिक अंश असलेली फळं खावीत. जेवणापूर्वी केळं खाणं हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे.

3) ग्रीन टी -

पाण्याऐवजी तुम्ही ग्रीन टीचा वापर करू शकता. ग्रीन टी मध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स  अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरातील मेटॅबॉलिक रेट वाढण्यास मदत होते.

Reference:

[1] Dennis EA, Dengo AL, Comber DL, Flack KD, Savla J, Davy KP, Davy BM. Waterconsumption increases weight loss during a hypocaloric diet intervention inmiddle-aged and older adults. Obesity (Silver Spring). 2010 Feb;18(2):300-7. doi:10.1038/oby.2009.235. Epub 2009 Aug 6. PubMed PMID: 19661958; PubMed Central
PMCID: PMC2859815.

[2] Davy BM, Dennis EA, Dengo AL, Wilson KL, Davy KP. Water consumption reduces energy intake at a breakfast meal in obese older adults. J Am Diet Assoc. 2008Jul;108(7):1236-9. doi: 10.1016/j.jada.2008.04.013. PubMed PMID: 18589036; PubMedCentral PMCID: PMC2743119.

Translated By  -  Dipali  Nevarekar

Source - drink-water-before-meals


छायाचित्र सौजन्य – shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>