जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे टाळत असाल तर हे खूप चुकीचे आहे.कारण तज्ञांच्या मते दात घासल्यामुळे फक्त तोंडाची दुर्गंधी जाते असे नाही तर दात घासल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.दात न घासल्यामुळे हिरड्यांच्या समस्या,दात पडणे व दातांमध्ये जंतू निर्माण होणे अशा समस्यांचा धोका वाढतो.
मानेसर येथील व्हीपीएस रॉकलॅन्ड हॉस्पिटलचे सिनीयर डेंटल कन्सल्टंट,बी.डी.एस,एम.डी.एस.(
1. दोन वेळा दात न घासल्यास हिरड्यांच्या समस्यांंचा धोका वाढतो
तोंडामध्ये जंतू निर्माण झाल्यामुळे इनफेक्शन होऊन हिरड्यांच्या समस्या निर्माण होतात.दोन वेळ दात न घासणा-या लोकांमध्ये ही समस्या अधिक आढळते.जेव्हा आपण जेवतो तेव्हा तोंडात एक पातळ थर जमा होतो ज्यामध्ये अन्नपदार्थ व जीवाणू असतात.हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते.जेव्हा तुम्ही नियमित दात घासत नाही तेव्हा हा थर तुमच्या दातांवर जमा होत राहतो.यामुळे तुमच्या हिरड्यांना इनफेक्शन होऊन दाह होतो अथवा हिरड्यांमधून रक्त येऊ लागते.या समस्येमुळे हिरड्यांमध्ये सूज देखील येते.या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास हिरड्यांचे व हिरड्यांच्या हाडांचे नुकसान होऊ शकतो.पुढे यामुळे तोंडाची हालचाल करणे कठीण होते,दुर्गंध येतो,दात किडतात व हिरड्यांमधील समस्या वाढून दात व हिरड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. ब्रश करताना या ’7′ चुका टाळा
2. वेड लागण्याचा व दात दोन वेळा घासण्याचा काय संबंध असू शकतो.
दात नियमित स्वच्छ केल्यामुळे उतारवयात मन व तन दोन्ही निरोगी राहते.दात नियमित स्वच्छ न केल्यामुळे वेड लागणे व अल्झायमर हे विकार होऊ शकतात.कधीकधी यामुळे स्मृती जाणे,घटना विसरणे,नाव व दिवसांमध्ये गोंधळ होणे तसेच मूडस्वींग अशा समस्या निर्माण होतात.जगभरात केलेल्या काही संशोधनानूसार दिवसभरात दोनदा अथवा तीनदा दात घासणा-या लोकांना वेड लागण्याचा धोका कमी असल्याचे आढळून आले आहे.
3.दिवसभरात एकदाच दात घासल्यास तोंडामध्ये दुर्गंध येण्याची समस्या निर्माण होतेे.
तोंडातून दुर्गंध येणे हे तुमच्या तोंडामध्ये आरोग्य समस्या असल्याचे एक लक्षण आहे.याचा तुमच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो.अनेक लोकांना तोंडांतून दुर्गंध येण्याची समस्या असते.यामुळे तुम्हाला कोणाशी बोलताना लाज वाटू शकते.नियमित दात न घासल्यामुळे तोंडात जंतू साठतात व त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.तुमचे सुंदर हास्य व तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी नियमित दात घासणे खुप आवश्यक आहे.टुथपेस्ट मधील घटक दातांवर साठलेले अन्नकण काढून दात स्वच्छ करतात.कारण टुथपेस्टमध्ये कॅल्शियम कार्बोनेट,अॅल्युमिनीयम ऑक्साईड,डिहायड्रेट सीलीका जेल,फॉस्फरेट सॉल्ट असतात.
4. दात स्वच्छ न केल्यास मधूमेहाचा धोका वाढतो.
डेंंटिस्टच्या मते मधूमेह असणे हे तोंडाच्या विकारांमध्ये धोकादायक असू शकते पण काही संशोधनानूसार तोंडाचे आरोग्य न जपल्यास देखील प्री-डायबिटीस व डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.तर काही संशोधनानूसार दोन्ही विकार असलेल्या रुग्णांचा मधूमेह नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे असे देखील आढळले आहे.
5.तोंडाचे आरोग्य न जपल्यास गरोदरपणात समस्या निर्माण होतात.
गरोदरपणात दातांच्या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकतात.गरोदरपणात हॉर्मोनमध्ये होणा-या बदलामुळे ५० ते ६० टक्के महिलांना दातांच्या समस्येला तोंड द्यावे लागते.याचा गरोदर स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होतो.हिरड्यांच्या समस्येमुळे प्रिमॅच्युअर बाळ अथवा कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते.बाळामध्ये दिसणे व ऐकणे यासारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात.प्रिमॅच्युअर डिलीव्हरी झालेल्या १५ ते २० टक्के महीलांना दातांच्या समस्या असतात.जर तुम्ही गरोदरपणी दातांची योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या तोंडात जंतु निर्माण होऊन ते तुमच्या बाळाच्या रक्तप्रवाहात मिसळू शकतात.अशा अर्भकांना फार लवकर दात किडण्याच्या समस्या निर्माण होतात.तोंडातील जंतू गर्भनाळेमध्ये गेल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
6. तोंडातील जंतूंमुळे अल्सर देखील होऊ शकतो.
तोंडाच्या अस्वच्छतेमुळे तोंडात जंतू निर्माण होऊन तुम्हाला Helicobacter pylori होण्याची शक्यता असते ज्यामुळे पोटात अल्सर निर्माण होतात.Helicobacter pylori चा संसंर्ग तोंडावाटे होतो.या विकारामुळे पोटाचा कर्करोग देखील होण्याची शक्यता असते.यामध्ये अनेक संशोधकांची अनेक मते आढळतात.पण तोंडाच्या अस्वच्छतेमुळे होणारा हा जंतुसंसर्ग वाढण्याचा धोका अधिक असतो हे मात्र नक्की. तोंडाचेआरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !
7. दिवसभरात दोन वेळा दात घासल्याने हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका कमी होतो.
तोंडाच्या अस्वच्छतेमुळे कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसिस निर्माण होऊ शकतात.तोंडांत अस्वच्छता असल्यास तोंडात मोठ्या प्रमाणावर जंतू निर्माण होतात व हे जंतू रक्तात मिसळतात.त्यामुळे ह्रदयाच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात व ह्रदयामध्ये दाह निर्माण होतो.पुढे या समस्येमुळे हार्टअटॅक अथवा स्ट्रोक होण्याची शक्यता असते.दिवसातून दोन वेळा दात घासल्याने संपूर्ण शरीराचे आरोग्य निरोगी राहते.
रात्री झापण्यापुर्वी दात घासण्यासाठी काही सोप्या टीप्स-
- बेडच्या शेजारी असलेल्या टेबलावर टूथब्रश व फ्लॉस ठेवा.रात्री झोपण्यापुर्वी टूथपेस्ट न लावता ड्राय ब्रश देखील तुम्ही करु शकता.बेडवरुनच तुम्ही फ्लॉस करु शकता अथवा साध्या पाण्याने चूळ भरा.
- पुढचे व मागचे सर्व दात जीभेचा स्पर्श करुन स्वच्छ करा.
- कोमट पाण्याने चुळ भरा व तुमच्या अनामिकेने दातांच्या हिरड्यांवर हलक्या हाताने दोन मिनीट मसाज करा.यामुळे तुमच्या हिरड्या मजबूत राहतील.
- दिवसभरात दोन वेळा तीन मिनीटे दात घासून तुम्ही तुमचे आरोग्य निरोगी व जीवन आनंदी करु शकता.कारण दात किडल्यास अनेक समस्या निर्माण होतात.आपण आपल्या आरोग्यासाठी ऐवढी काळजी नक्कीच घेऊ शकतो. दातांचे आरोग्य सांभाळायचयं ? मग हे पदार्थ टाळा
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock