भारतात प्री-डायबिटीसचे सुमारे ८० दशलक्ष रुग्ण आहेत. प्री-डायबिटीस हा एक असा सायलेंट विकार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ब्लड शुगरपेक्षा थोडी जास्त असते पण ती मधूमेहाचे निदान करण्याइतपत अधिक नसते.या स्थितीत फास्टींग प्लाझमा ग्लूकोज १००-१२५ mg/dl इतकी असू शकते तर ओरल ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट १४०-१९९ mg/dl इतकी असते व HbA1C लेवल ५.७ ते ६.४ टक्के असते.
अॅक्टीव्हऑर्थोच्या मेटाबॉलिक बॅलन्स कोच व सिनीयर न्यूट्रीशिनीस्ट मिस.तरनजीत कौर यांच्या मते प्री-डायबिटीस हे शरीरात इन्सूलीनच्या निर्मितीचे प्रमाण कमी झालेल्या लोकांमध्ये आढळून येते.असे असले तरी रुग्णाला इन्सूलीन कमी निर्माण होत असल्यास लगेच टाईप २ मधूमेह होतो असे नाही.प्रथम शरीरातील बीटा सेल्स कडे अधिक इन्सूलीन निर्माण करण्यासाठी मागणी वाढते.अशा लोकांनी कार्बोहायड्रेटयुक्त आहार वाढवल्यास त्यांच्या शरीरात सहापट अधिक इन्सूलीन निर्माण होऊ शकते.मात्र हळूहळू या बीटा सेल्स पुरेसे इन्शूलीन निर्माण करण्यास अक्षम ठरतात.त्यामुळे रक्तातील साखर पुन्हा वाढण्यास सुरुवात होते व त्या रुग्णाला प्री-डायबेटीक रुग्ण असे म्हणतात.पुढे सतत होणा-या बीटा सेल्सच्या नुकसानामुळे त्या रुग्णाला टाईप २ मधूमेह होतो. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
इन्सूलीन या हॉर्मोनमुळे शरीरातील अनेक अवयवांचे मेटाबॉलिजम नियंत्रित राहते.या हॉर्मोनच्या अति उत्पादनामुळे मेटॅबॉलिजम असंंतुलित होते.यासाठी या स्थितीतील व्यक्तींनी स्वत:च्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
तरनजीत यांच्या मतानूसार एखाद्या व्यक्तीला प्री-डायबिटीस असल्यास पुढे त्याचे एक ते दोन वर्षाच्या कालावधीत पुर्ण मधूमेहामध्ये रुपांतर होते.जर पुरेसे लक्ष दिले नाही व रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवले नाही तर रुग्णाच्या शरीरातील अवयवांचे नुकसान होऊ शकते.यासाठी तज्ञांच्या सल्लानूसार जाणून घेऊयात प्री-डायबिटीसचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो.
ह्रदय-
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे ह्रदयाला रक्तपुरवठा करणा-या धमन्या कडक होतात व यामुळे तुमचे लिपीड प्रोफाईल असतुंलित होते.लिपीडची निर्मिती वाढते व रक्तवाहीन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.अति रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे नूकसान होते.त्यामुळे मधूमेह असणा-या लोकांना हार्टअटॅक येण्याचा धोका दुप्पट असू शकतो.
किडनी-
शरीरातील इतर रक्तवाहिन्यांच्या तुलनेत किडनी व डोळ्यांमधील रक्तवाहिन्या खुपच लहान असतात.त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास किडनीला रक्त शुद्ध करणे कठीण जाते.सतत वाढणा-या रक्तातील साखरेच्या पातळीमुळे किडनीमधील पेशी मृत होऊन पुढे किडनीचे गंभीर विकार होऊ शकतात. किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !
मेंदू-
ब-याच लोकांना हे माहीत नाही की सतत वाढणा-या रक्ताच्या साखरेतील पातळीमुळे तुमच्या स्मरणशक्ती व मज्जापेशींवर विपरित परिणाम होतो.यामुळे तुम्हाला अल्झामर हा विकार देखील होऊ शकतो.तसेच यामुळे रक्त पातळ झाल्यामुळे मेेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होतात व ब्लीडींग अथवा स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.
नसा-
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे नसांवर विपरित परिणाम होतो.यामुळे शरीरातील अवयव बधीर होतात व त्यांना मुंग्या येण्याचे प्रमाण वाढते.त्याचप्रमाणे न्युरोपॅथीनूसार यामुळे मज्जासंस्थेचे नुकसान झाल्यामुळे मेंदू व अवयव यामध्ये संंवाद साधणा-या प्रणालीचे देखील नुकसान होते.यामुळे अपचन,मूत्राशयाच्या समस्या,आतड्यांमधील हालचालीमध्ये समस्या,सेक्शूअल क्रियेत अडचणी अशा आरोग्य समस्या निर्माण होतात.
डोळे-
मगाशीच सांगितल्या प्रमाणे आपल्या डोळ्यांमधील रक्तवाहिन्या खुप छोट्या असतात त्यामुळे रक्तातील साखर वाढल्यामुळे त्यांच्यावर दाब येतो.त्यामुळे रॅटीनामधील छोट्या रक्तवाहिन्या कमजोर होतात व रॅटीनाचे नूकसान होते.जर यावर लगेच उपचार केले गेले नाहीत तर कायमस्वरुपी दृष्टीदोष निर्माण होतो.यामुळे काचबिंदू होऊ शकतो.तसेच नसांचे नूकसान झाल्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
तोंडाचे आरोग्य-
जर तुम्हाला मधूमेह असेल तर तुम्हाला हिरड्यांच्या समस्या किंवा हिरड्यांना इनफेक्शन अशा समस्या होऊ शकतात.कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास तोंडामध्ये अॅसिडीक वातावरण निर्माण होते व तोंडात जंतुच्या वाढीला चालना मिळते,इनफेक्शन होते.त्याचप्रमाणे या स्थितीमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते व या समस्या अधिक वाढू लागतात.
त्वचा-
मधूमेहामुळे मज्जासंस्थेचे नुकसान झाल्यामुळे शरीराच्या संवेदना कमी होतात त्यामुळे त्वचा समस्या निर्माण होतात.रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण वाढल्यामुळे विशेषत: मानेच्या भागाकडील त्वचा काळवंडते.तसेच काही लोकांना इनफेक्शनचा देखील त्रास झाल्यामुळे त्वचेला खाज येते व त्वचा लालसर होते.रक्तातील साखरेच्या अती प्रमाणामुळे लिपीड मेटाबॉलिजम असतुंलित होते व त्वचेवर टॅग येतात.
यकृत-
रक्तात ग्लूकोजचे प्रमाण वाढल्यामुळे यकृतामध्ये भरपूर ग्लूकोज शोषले जाते व त्यामुळे त्याची टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकण्याची क्षमता कमी होते.तसेच यकृतात फॅट्स साठल्यामुळे फॅटी लिव्हर डिसीस निर्माण होतात.
रिप्रोडक्टीव्ह ऑर्गंस -
शरीरातील इतर महत्वाच्या अवयवांप्रमाणेच रक्तातील वाढलेल्या साखरेचा परिणाम सेक्स अवयवांवर देखील होतो.इन्सूलीनच्या कमतरतेमुळे महिलांना ओव्हूलेशन प्रक्रियेमध्ये अडथळा येतो,त्यांची मासिक पाळी अनियमित होते,अंडाशयामध्ये सीस्ट येतात,पीसीओडी ही समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.तर पुरुषांमध्ये इन्सूलीनच्या वाढीमुळे टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन कमी प्रमाणात निर्माण होते.त्यामुळे त्यांच्या सेक्सलाईफवर याचा परिणाम होतो.त्याचप्रमाणे अति ग्लूकोजमुळे नसांचे नुकसान होऊन रक्त पातळ झाल्यामुळे प्रजनन त्यांच्या अवयवांच्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो.यामुळे पुरुषांमध्ये सेक्शूअल डिसफंक्शन किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन या समस्या निर्माण होतात.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock