प्रत्येक नात्याचा शेवट हा गोड असेलच असे नाही.रिलेशनशिप मध्ये ब्रेक-अप झाल्यास खूप त्रास होतो. जीवन कंटाळवाणे व निरस वाटू लागते.पण पुढे जाऊन अधिक त्रास होण्यापेक्षा आधीच एकमेकांच्या संमतीने वेगळे होण्यातच खरा शहाणपणा असू शकतो. योग्य वेळी ब्रेकअपचा निर्णय घेण्यासाठी हा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या. मानसोपचार तज्ञ डॉ.अंजली छाब्रिया यांच्या मते,जीवनातील चांगल्या अथवा वाईट परिस्थितीत नात्यामध्ये सुरक्षित वाटण्यासाठी जोडीदारांचा एकमेंकावर विश्वास असणे ही एक महत्वाची गोष्ट असते.
या 10 कारणांमुळे ब्रेक अपचा निर्णय घ्यावा लागतो -
संवादाचा अभाव-
सुदृढ नातेसंबधाचा मुळ पाया हा संवाद असतो.संवादाचा अभाव असल्यास नातेसंबधामध्ये हळूहळू दरी निर्माण होते.त्यामुळे डॉ.अंजली यांच्या मते जोडीदार कामामुळे अथवा मित्रमैत्रिणींमुळे दूर राहू लागल्यास व दोघांमध्ये सुसंवाद नसल्यास नाते तुटण्यास वेळ लागत नाही.
खोटे बोलणे-
जोडीदारासोबत खोटे बोलल्यामुळे जोडीदाराचा तुमच्यावरचा विश्वास तर कमी होतोच पण तुमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर देखील नाही हे स्पष्ट होते.डॉ.अंजली यांच्या मते जेव्हा जोडीदार कामाच्या वेळेबाबत,मेसेजेस,फोन कॉल्स बाबत तुमच्यासोबत खोटे बोलू लागतो तेव्हा त्याच्या तुमच्या नात्यातील गोडवा कमी झाला अाहे असे ओळखा. ( नक्की वाचा: व्हॉट्स अॅपवरीलया’10′चूकानात्यासठरतातमारक!)
सतत भांडणे-
जर जोडपी सतत भांडत अथवा वादविवाद करीत असतील तर त्यामुळे त्यांचे नाते लवकर तुटण्याची दाट शक्यता असते.
आदर कमी होणे-
जोडीदारांना एकमेकांबद्द्ल आदर नसेल व ते सतत एकमेंकाबाबत गैरसमज करुन घेत असतील तर ते भावनिक दृष्ट्या मनाने वेगळे होऊ लागतात.
खूप बंधणं लादणे-
कोणालाही सतत बंधनात जखडून राहणे आवडत नाही.जर तुमच्यावर सतत बंधन घातले गेले तर तुम्हाला त्या नात्याचा कंटाळा येतो.त्यामुळे डॉ.छाब्रिया यांच्या मते जेव्हा जोडीदार तुमच्या बाबत ओव्हर पजेसिव्ह असतो अथवा तुम्हाला सतत बंधनात ठेवतो तेव्हा ते तुमच्या ब्रेक-अपचे एक लक्षण असू शकते. नक्की ब्रेकअपनंतर मैत्रिणीला सावरताना या ’6′ गोष्टींचे भान ठेवा !
स्वत:चा विचार करणे-
नात्यामध्ये दुस-याचा विचार करणे व त्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.जेव्हा तुम्ही फक्त स्वत:चाच विचार करता तेव्हा दुस-याला तुमच्यापासून दूर जावे असे वाटू लागते.
प्रेमासाठी वेळ न देणे-
शारीरिक जवळीक नसणे हे देखील नाते तुटण्यामागचे एक कारण असू शकते.शारीरिक जवळीक असल्यामुळे नाते टिकून राहते यासाठी जोडप्यांनी काही काळ जाणिवपूर्वक एकत्र घालवणे आवश्यक आहे. जाणून घ्या ब्रेकअपनंतर फेसबूक, व्हॉट्सअॅप वापरताना या ’5′ गोष्टींचे भान ठेवा !
फसवणे-
एकमेकांना फसवल्यामुळे देखील तुमचे नाते संपू शकते.कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला फसवता तेव्हा तुम्हाला नाते टिकवायचे नाही असा संकेत मिळतो.
छळ करणे-
शारीरिक अथवा सेक्शुअल छळ करणे हे देखील नाते तो़डण्याचे एक लक्षण असू शकते.त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या जीवलगांना छळण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही.जर तुमच्याबाबत असे होत असेल तर त्यांच्यापासून दूर जाण्याची हीच वेळ आहे हे त्वरीत ओळखा.
गरज नसणे-
डॉ.अंजली यांच्या मते जोडीदारांना एकमेंकाची गरज असायला हवी तसे नसल्यास तुमचे नाते लवकरच तुटण्याची शक्यता आहे हे ओळखा.
नातेसंबध टिकण्यासाठी या गोष्टींची खूप गरज असते-
- विश्वास
- प्रेम
- आदर
- एकमेंकावर अवलंबून असणे
- सुसंगता
- तडजोड
- निष्ठा
- बांधिलकी
- आनंद
- जवळीक
कधीकधी नातेसंबध बिघडल्यावर देखील जोडपी एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात.पण असे केल्याने त्यांना भावनिक व मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो व त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.खुप दिवस असा त्रास सहन करत राहील्याने समस्या अधिकच वाढतात.त्यामुळे तज्ञ अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना वेगळे होण्याचा सल्ला देतात.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock