Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘४’चूकांंमुळे पोटाचे स्नायू टोन करण्याचे तुमचे प्रयत्न फसतात !

$
0
0

पोटाचे स्नायू टोन करण्यासाठी आणि पातळ पोट मिळवण्यासाठी विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे. त्यासाठी अनेक सल्लेही दिले जातात. पण त्यातील सगळीच माहिती किंवा सल्ले खरे असतातच असं नाही. म्हणून योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी फिटनेस एक्स्पर्ट रोशनी शहा यांनी मार्गदर्शन केले. तसेच पोटाचे स्नायू टोन होण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे देखील सांगितले.

1. अति प्रमाणात व्यायाम करू नका: व्यायामाची सुरुवात १० किमी धावून करू नका. अति प्रमाणात व्यायाम केल्याने ताण वाढतो. सुरुवातीला १० किमी पळण्याचा परिणाम तुम्हांला दिसेल पण त्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्याऐवजी इतर शारीरिक क्रियांमुळे तुमच्या कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण वाढेल. उदारणार्थ, जेवल्यानंतर थोडा वेळ चाला किंवा लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. पोटाची चरबी कमी करण्यात, ‘ कडूलिंबाची फुले’ गुणकारी !

2. Exclusive exercise करू नका: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सीट अप्स, क्रन्चेस करू नका. या व्यायाम प्रकारांमुळे पोटाचे स्नायू स्ट्रेच होतील पण तुम्हाला काही ठळक परिणाम दिसून येणार नाहीत. याउलट क्रन्चेस ( crunches) मुळे पाठीच्या कण्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याऐवजी मांड्या आणि पार्श्वभाग यावर आधारित कंपाऊंड एक्सरसाईझ करा. squats आणि lunges मुळे कॅलरीज बर्न होतात. तसंच हे व्यायामप्रकार कोणत्याही फिटनेस लेव्हलला योग्य अशा विविध स्वरूपात तुम्ही करू शकता. त्याचबरोबर चरबी कमी करण्यास स्पॉट ट्रेनिंगचा ही काही फायदा होणार नाही. हळूहळू वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी टोन करण्यासाठी तुमच्या एक्सरसाईझ रुटीनमध्ये काही वेट ट्रेनिंग एक्सरसाईझचा समावेश करा. जिरं आणि केळं- वजन कमी करण्याचा घरगुती उपाय !

3. Weight loss hacks पाळू नका: वजन कमी करण्यासाठी काही weight loss hacks ला बळी पडू नका. कारण वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. व्यायाम आणि आहाराबरोबरच तुम्हाला झोप आणि ताण या गोष्टींवर ही लक्ष द्यायला हवे. काळामिरी आणि पपई – वजन घटवण्याचा रामबाण उपाय

4. अतिशय कठीण डाएट प्लॅन पाळू नका: जे डाएट प्लॅन दिवसाला १२०० पेक्षा कमी कॅलरीज देतात, असे डाएट प्लॅन पाळू नका. संतुलित आहार घ्या आणि प्रत्येक जेवण वेळेवर घेण्याचा प्रयन्त करा. त्याचबरोबर सामान्यपणे असा गैरसमज आहे की लो फॅट्स फूडमुळे कमी कॅलरीज शरीरात जातात. परंतु लो फॅट फूडमध्ये साखर अति असल्याने कॅलरीज अधिकच मिळतात. फ्लॅट बेली मिळवण्यासाठी राईस ब्रान, ऑलिव्ह ऑइल यांसारख्या हेल्दी सॅच्युरेटेड फॅट्समध्ये अन्न शिजवा. वजन घटवण्याचा अस्सल भारतीय ‘डाएट प्लान’

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>