खरेतर योग्य वयात गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.कारण वयाच्या तीस वर्षांनतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडू लागतात ज्यामुळे ३५ वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.पण जर या वयात देखील तुम्ही निरोगी आहार व व्यवस्थित नियोजन केलंत तर तुम्हाला आई होण्यात यश मिळू शकते.जाणून घ्या आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे?
पस्तीशी नंतर आई होण्यासाठी हे उपाय जरुर करा-
१.गर्भधारणेपुर्वी योग्य समुदेशन घ्या-
तुमच्या स्त्रीबीजाची व तुमच्या जोडीदाराच्या शुक्राणुंची गुणवत्ता कमी झाल्यास तुम्हाला गर्भधारणेमध्ये अपयश येऊ शकते.यासाठी तुमचे गर्भाशयाचे आरोग्य,हॉर्मोन्सची पातळी,शरीरातील इतर अवयवांचे कार्य यांची वेळीच तपासणी करुन घ्या. (नक्की वाचा: करियर आणि आरोग्य सांभाळू शकता मग आई’ होण्याचा निर्णय 30 शी च्या पार कशाला ?)
२.धुम्रपान सोडा-
काही संशोधनात असे आढळले आहे की धुम्रपानाचा स्त्रीयांच्या फर्टिलीटी वर दुष्परिणाम होतो.धुम्रपानातील निकोटीन व इतर घातक घटकांमुळे गर्भाशय,फेलोपाईन ट्युब,अंडाशय या अवयवांना गर्भधारणा करण्यात अपयश येते.
३.मद्यपान सोडा-
मद्यपानामुळे गर्भधारणेमध्ये अडचण का येते याचे कारण अजून समजू शकलेले नाही.मात्र संशोधनात मद्यपानाचा स्रीच्या प्रजनन शक्तीवर परिणाम होत असल्याचे नक्कीच आढळले आहे.
४. कॅफेनचे सेवन कमी प्रमाणात करा-
कॅफेनचा तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होतो व तुम्हाला गर्भधारणा उशीरा होते.त्याचप्रमाणे गरोदर महिलेने अती प्रमाणात कॅफेन घेतल्यास तीचा गर्भपात होण्याची शक्यता असते.त्यामुळे या पदार्थांपासून दूर रहाणे हेच योग्य आहे.
५.तुमचे वजन तपासा-
ब-याचदा अतिवजन किंवा कमी वजन असल्यास गर्भधारणेवर त्याचा परिणाम होतो.जर तुम्ही लठ्ठ असाल व तुमची जीवनशैली अयोग्य असेल तर तुमच्या ओव्हूलेशन मध्ये समस्या निर्माण होतात.त्याचप्रमाणे खुप कमी वजन असलेल्या महीलांना देखील ओव्हूलेशन मध्ये समस्या निर्माण होतात.नियमित योग्य वेळी ओव्हूलेशन होऊन मासिक पाळी येण्यासाठी तुमच्या शरीरात २२ टक्के बॉडी फॅट्स असणे आवश्यक आहे.
६.संतुलित आहार घ्या-
योग्य व सतुंलित आहार घेतल्याने तुम्हाला नैसर्गिक रित्या गर्भधारणा होणे शक्य असते.यासाठी फळे,भाज्या व तृणधान्यामधून योग्य प्रमाणात प्रोटीन व विटामिन्स घ्या.ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेसे हॉर्मोन्स निर्माण होतील.यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिड,विटामिन बी ६,सी,ई आणि बेटा केरोटीन असलेले पदार्थ खा.
७.सेक्ससाठी पुरेसा वेळ द्या-
वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरातील लिबीडो कमी होत जाते त्यामुळे जाणिवपूर्वक सेक्स करा.बाळासाठी प्रयत्न करताना सेक्स नियमित करणे गरजेचे आहे.
८.तुमच्या गर्भधारणेच्या दिवसांचे योग्य नियोजन करा-
गर्भधारणेसाठी तुमच्या फर्टायल दिवसांमध्येच सेक्स करणे आवश्यक असते.या साठी तुमची मासिक पाळी आल्याच्या ८ व्या दिवसापासून १९ व्या दिवसापर्यंत सेक्स करा.त्यामुळे तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढेल.
९.अंगावरुन जाणा-या स्त्रावाचे निरिक्षण करा-
ओव्हूलेशन होण्यापुर्वी पाच दिवस आधी तुमच्या अंगावरुन जाणारा स्त्रावामध्ये बदल होतो.त्यामुळे या दिवसामध्ये सेक्स केल्यास शुक्राणूंना अंडाशयापर्यंत पोहचणे सुलभ होते.
१०.ओव्हूलेशन कीट वापरा-
घरी प्रेगन्सी चेक करण्यासाठी वापरण्यात येणा-या कीट प्रमाणे बाजारात ओव्हूलेशन कीट उपलब्ध असते.त्यामुळे ओव्हूलेशन कीटमुळे तुम्हाला तुमचा गर्भधारणेसाठी योग्य काळ समजणे सोपे होते.
११.तुमच्या शरीराचे तापमान तपासा-
ओव्हूलेशनच्या आधी शरीरात होणा-या हॉर्मोनल बदलामुळे तुमच्या BBT मध्ये बदल होतो.हा तापमानातील बदल तुमच्या लक्षात आल्यास तुम्हाला गर्भधारणेचा योग्य काळ ओळखता येतो.
१२.वेगवेगळ्या सेक्स पोजीशनचा वापर करा-
सेक्स करताना वेगवेगळ्या पोजीशन्सचा वापर केल्यामुळे तुमचा मूड बदलण्यास मदत होते.काही पोजीशन गर्भधारणेसाठी अतिशय उपयोगी असतात. नक्की वाचा यशस्वी गर्भधारणेसाठी ‘8′हॉट सेक्स पोजिशन्स !!
१३.आवश्यक चाचण्या करा-
तुमच्या शरीराचे आरोग्य व स्त्रीबीजाची गुणवत्ता तपासण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही चाचण्या करण्यास सांगतात.या चाचण्यामुळे आरोग्य समस्या समजण्यास तुम्हाला उपचार करताना त्याचा फायदा होऊ शकतो.
१४.ताणावर नियंत्रण ठेवा-
ताणामुळे तुमच्या झोप,खाणे-पिणे,वजन यावर विपरित परिणाम होतो.सहाजिकच या समस्यांमुळे तुमच्या ओव्हूलेशनमध्ये बदल होतो.यासाठी तुमच्या ताणावर नियंत्रण ठेवा.
१५.नियमित व्यायाम करा-
जर तुम्ही प्रेगन्सीसाठी प्रयत्न करीत असाल तर नियमित व्यायाम करण्यास सुरुवात करा.व्यायामामुळे तुमच्या शरीरातील अवयवांना पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होईल व त्यामुळे तुमची प्रजनन क्षमता सुधारेल व गर्भधारणा होण्यास मदत होईल.
१६.प्रसुतीपुर्व योग्य विटामिन घेण्यास सुरुवात करा-
गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना योग्य विटामिन घेण्यास सुरुवात केल्याने बाळात व्यंग येत नाही.
१७.नियमित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा-
प्रेगन्सीसाठी प्रयत्न करताना नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या.ज्यामुळे गर्भधारणेमधील समस्या कमी करता येतील.
१८.स्पेशल स्क्रीनींग टेस्ट करुन घ्या-
गर्भधारणेत अपयश येत असल्यास डॉक्टरांच्या सल्लानूसार स्पेशल स्क्रिनींग करुन घ्या.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्त्रीबीजाची व तुमच्या जोडीदाराच्या शुक्राणूंची गुणवत्ता समजेल.डॉक्टर तुम्हाला समस्या असल्यास त्यावर आयव्हीएफ सारखे आधुनिक उपाय करण्याचा सल्ला देऊ शकतात. जाणून घ्या IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 70 रीच्या वयात दलजिंदर कौर यांनी कसा दिला बाळाला जन्म?
१९.तुमच्या आरोग्य समस्या नियंत्रणात आणा-
जर तुम्हाला मधूमेह,रक्तदाब,पीसीओ़डी या समस्या असतील तर त्या नियंत्रणात आणल्यास तुम्हाला गर्भधारणा करणे सोपे जाईल.
२०.पर्यावरणातील धोके टाळा-
निरोगी रहाण्यासाठी पर्यावरणातील धोक्यांपासून दूर रहा.यासाठी केमिकल व रेडीएशन असलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चा कमी वापर करा.
२१.जोडीदाराच्या आरोग्याची तपासणी करा-
गर्भधारणे मध्ये अपयश स्त्री अथवा पुरुष या दोघांमधील समस्येमुळे येऊ शकते.त्यामुळे गर्भधारणेतील समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्या जोडीदाराची देखील आरोग्य तपासणी करुन घ्या.
२२.ऑरगॅनिक फूड खा-
गर्भधारणेतील अपयश टाळण्यासाठी केमिकल व किटकनाशकांचा वापर केलेली फळे व भाज्या खाणे टाळा.यासाठी ऑरगॅनिक फूडचा आहारात समावेश वाढवा.
२३.आहारात नैसर्गिक व्हिटामिन येतील याची दक्षता घ्या-
गोळ्या औषधांमधून व्हिटामिन घेणे गरजेचे आहे.पण त्यासोबत आहारातून नैसर्गिक विटामिन देखील पोटात जातील याची काळजी घ्या.यामुळे तुमचे हॉर्मोन संतुलित राहतील व ओव्हूलेशन योग्य होईल.
२४. मासे खा-
मासांमधील फॅटी अॅसिडमुळे गर्भधारणेमध्ये तुम्हाला मदत होऊ शकते.त्यामुळे वय वाढत असल्यास गर्भधारणेसाठी मासे खाण्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
२५.तुमचे थायरॉइड चेक-अप करा-
थायरॉइडच्या कार्याचा तुमच्या फर्टीलिटीवर परिणाम होतो.थायरॉइडचे कार्य बिघडल्यास वंधत्व येणे व ओव्हूलेशन योग्य न होणे या समस्या निर्माण होतात.त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापुर्वी तुमची थायरॉइड चेक-अप जरुर करुन घ्या. Hypothyroidism चा त्रास फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करतो ?
२६.जास्त प्रमाणात ओटीसी औषधे घेणे टाळा-
काही हर्बल सप्लीमेंटमुळे तुमच्या जोडीदाराच्या शरीरातील लिबीडो वाढू शकते ज्याचा परिणाम त्यांच्या शुक्राणुंच्या गुणवत्ता व संख्येवर होतो.यामुळे गर्भधारणेत समस्या निर्माण होतात.त्यामुळे अशी औषधे घेणे टाळा.
२७.साखरेचे व प्रक्रीया केलेेले पदार्थ खाणे टाळा-
जास्त प्रमाणात साखर व प्रक्रीया केलेले पदार्थ खाल्यामुळे तुम्हाला गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
२८.जास्त प्रमाणात वेट ट्रेनींग करणे टाळा-
अति प्रमाणात वेट ट्रेनींग अथवा खेळ खेळल्याने तुमच्या हॉर्मोन व ओव्हूलेशनवर दुष्परिणाम होतो.त्यामुळे असे व्यायाम करण्यापेक्षा अॅरोबिक्स करा.
२९.दातांची काळजी घ्या-
दातांमध्ये समस्या असल्यास त्याचा परिणाम तुमच्या गर्भधारणेवर देखील होऊ शकतो.त्यामुळे दातांची योग्य स्वच्छता राखा.
३०.गर्भधारणेसाठी मार्गदर्शन करणा-या क्लासला जा-
काही वर्ग खास गर्भधारणेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात येतात.त्यामुळे या मार्गदर्शनात सांगितलेल्या टीप्सचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
३१.नियोजन करा-
जरी तुम्ही गर्भधारणेसाठी उशीरा प्रयत्न करीत असला तरी देखील तुम्ही तुमच्या बाळासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
३२-एखाद्या समस्येवर स्वत:च उपचार करु नका-
जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर तुम्ही कोणतेही ओवर-दी-काउंटर औषध स्वत:च्याच मर्जीने घेणे योग्य नाही.कारण त्यामुळे तुमच्या पोटी व्यंग असलेले बाळ जन्माला येऊ शकते.त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर रहा.
३३-तुम्ही घेत असलेल्या औषधांबाबत डॉक्टरांना कल्पना द्या-
जर तुम्ही अथवा तुमचा जोडीदार कोणती औषधे घेत असाल तर प्रेगन्सीसाठी प्रयत्न कऱण्यापुर्वी तुमच्या डॉक्टरांना याची कल्पना द्या.
३४.आशा सोडू नका-
जर तुम्ही पुर्वी गर्भनिरोधके वापरली असतील तर आता तुमच्या प्रजननशक्तीला पुर्ववत होण्यास वेळ लागेल.त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या थांबवून सहा महिन्यांनी देखील जर तुम्हाला गर्भधारणेत यश आले नाही तर निराश होऊ नका.कधीकधी या गोष्टी होण्यास थोडा वेळ लागू शकतो.
३५.सकारात्मक दृष्टीकोन ठेवा-
नकारात्मक विचारांचा गर्भधारणेवर अधिक परिणाम होतो.यासाठी आशा न सोडता सकारत्मक दृष्टीकोणाने या गोष्टीकडे पहाण्याचा प्रयत्न करा. जाणूनघ्याIVF पद्धतीनेयशस्वीगर्भधारणेसाठीकायकराल?
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock