Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लाल तांदूळ की ब्राउन राईस कोणता अधिक पौष्टिक आहे?

$
0
0

सफेद तांदूळ आणि ब्राउन राईस मध्ये निवड करायला सांगितली तर आरोग्याच्याबाबतीत जागरूक असलेली लोक ब्राउन राईसची निवड करतील. कारण त्यात अधिक पोषकतत्त्वे आणि फायबर्स असतात. त्यामुळे ब्राउन राईसची निवड योग्य आहे. पण लाल तांदूळ आणि ब्राउन राईस मध्ये काय अधिक चांगले आहे, तुम्हाला माहित आहे? लाल तांदूळ बाजारात सहज मिळतात. त्याची पौष्टिकता जाणून अधिकतर दक्षिण भारतीय लोक किंवा कोकणातही लाल तांदूळ खाल्ला जातो. पण नक्की कोणता तांदूळ अधिक आरोग्यदायी आहे हे जाणून घेण्यासाठी फिटनेस फर्स्ट इंडियाच्या डायटिशन Ms Rina Baliga यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी.

लाल तांदूळ व ब्राउन राईस काय अधिक पौष्टिक आहे ?

तांदळाची पौष्टिकता ही विविध घटकांवर अवलंबून असते. म्हणजे तांदळाचा प्रकार, ते पॉलिश केलेले आहेत किंवा नाही, जर पॉलिश केलेले असतील तर किती प्रमाणात केलेले आहेत, इत्यादी. त्याचबरोबर शिजवताना त्यात काय घातलय आणि कशाप्रकारे बनवलंय यावरही त्याची पौष्टिकता अवलंबून असते. परंतु, लाल तांदूळ आणि ब्राउन राईस यांच्या पौष्टिकतेबद्दल बोलायचे तर हे दोन्ही तांदूळ सारख्याच प्रमाणात पौष्टिक आहेत. या आरोग्यदायी कारणांसाठी जरूर कराच आहारात भाताचा समावेश !

तांदळावरच्या सालींमधे व्हिटॅमिन बी १, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, प्रोटिन्स, फायबर्स सारखे भरपूर पोषक घटक असतात. परंतु त्यात असलेले anthocyanin नावाच्या अँटिऑक्सिडेन्ट चे प्रमाण वेगळे असते. Anthocyanins मुळे तांदळाला लाल रंग येतो. तसंच ब्राउन राईसच्या तुलनेत लाल तांदळात अँटिऑक्सिडेन्ट आक्टिविटी दहा पट अधिक असते. भातातून केवळ कॅलरीज नाही, तर हे आरोग्यदायी फायदेदेखील मिळतात !

लाल तांदूळ आणि ब्राउन राईसचे आरोग्यदायी फायदे:

  • टाईप २ मधुमेह नियंत्रित राहण्यास आणि त्याला प्रतिबंध होण्यास मदत होते.
  • यात असलेल्या अँटिऑक्सिडेन्ट गुणधर्मांमुळे cardiovascular diseases चा धोका कमी होतो.
  • पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
  • serotonin आणि लाल रक्त पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी ६ यात असते. DNA च्या निर्मितीसाठी serotonin आणि लाल रक्त पेशींची मदत होते.
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. १९७० मध्ये human studies च्या अहवालानुसार लाल तांदळाचा रक्तवाहिन्यांतील कोलेस्ट्रॉलवर होतो. लाल तांदळात monacolin K हे कम्पाऊंड सक्रिय असते.
  • फायबर अधिक प्रमाणात असल्याने स्थूलपणाचा धोका कमी होतो. त्यामुळे भात खाल्याचे समाधान मिळते आणि स्थूलपणाला प्रतिबंध होतो.
  • अस्थमावर मात करण्यासाठी दोन्ही प्रकारचे तांदूळ उपयुक्त आहेत. दोन्ही तांदळात मॅग्नेशिअम असल्याने श्वसन व्यवस्थित होण्यास मदत होते.
  • फायबर दोन्ही तांदळात मुबलक असल्याने bowel movement सुरळीत होते. bowel संबंधीत आजारांना प्रतिबंध होतो. तसेच बद्धकोष्ठतेवर देखील परिणामकारक आहेत. मऊ खिचडीभाताचा आस्वाद घ्या या ’5′ आरोग्यदायी कारणांसाठी !

हे खाण्याचे योग्य प्रमाण कोणते?

रिना यांच्या सल्ल्यानुसार दिवसातून १-२ वेळा भात खाल्याने तुम्हाला त्यातील पौष्टिक घटकांचा लाभ मिळेल. या दोन्ही प्रकारात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने डायरिया मध्ये हा भात खाणे टाळावे. तसंच IBS (Irritable Bowel Syndrome) च्या रुग्णांनी देखील हा भात खाऊ नये. bowel सर्जरी झालेल्यानी तसंच फायबरच्या अति प्रमाणामुळे पचन मार्गात जळजळ होते किंवा तो भाग दुखावला जातो त्यावेळी रेडिएशन सारखी ट्रीटमेंट करावी लागते. अशावेळी देखील या तांदळाचा वापर टाळावा. भाताची पेज रोज पिण्याची ’5′ हेल्दी कारणं

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>