पहिल्यांदा जीममध्ये गेल्यावर जरा गोंधळायलाच होतं. सगळं काही नवीन असतं. बेसिक एक्सरसाइझ करतानाही चुकण्याची भीती वाटते. तसंच जीममध्ये असलेली साधने, मशिन्स कशी वापरायची हे तर मोठे दिव्यच वाटते. सुरुवातीला व्यायामामुळे स्नायू दुखू लागतात. पण काळजी करू नका. सुरुवातीच्या काळात अधिक व्यायाम करणे शक्य होणार नाही. असा अनुभव सगळ्यांनाच येतो. गोल्ड जिमचे मार्केटिंग आणि फिटनेस एक्स्पर्ट, व्हाईस प्रेसिडेंट Althea Shah यांनी काही फायदेशीर टीप्स दिल्या आहेत. नियमित जिमला जाण्यासाठी आणि फिटनेस सुधारण्यासाठी या टीप्स उपयुक्त ठरतील.
- पार्टनर शोधा: सगळ्यात पहिले म्हणजे जिमला एकटे जाऊ नका. जिमला जाण्यासाठी एखादा पार्टनर शोधा. तो पार्टनर तुमचा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकारी कोणीही असू शकतं. कोणीतरी ओळखीचे असल्याने संकोच कमी होईल.तसंच तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकता. पार्टनर वाट बघत असणार हे माहित असल्याने तुम्ही नियमित जिमला जाल. नक्की वाचा: टीनएजर्सनी जीममध्ये घाम गाळणे योग्य आहे का ?
- प्राथमिक धडे घ्या: जिममध्ये बिगिनर्स क्लाससाठी अडमिशन घ्या. त्या कलासमध्ये प्राथमिक गोष्टी शिकल्याने पुढचं वर्कआऊट कसं करायचं हे समजेल. बऱ्याच जिममध्ये योगा, ऍरोबिक्स, स्टेप ऍरोबिक्स, झुंबा सारखे डान्स प्रकार एकत्रिक शिकवले जातात. त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात. लक्षात ठेवा तुम्ही एकटेच जिममध्ये नवीन नसता. जसजसं तुम्ही जिमला जाऊ लागाल, तुमचा व्यायामाचा अनुभव वाढू लागेल तसं तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला एखादा पार्टनर देखील मिळेल.
- तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या: फिटनेस अॅडव्हायजर कडून तुमची फिटनेस लेवल आणि गोल्स जाणून त्यासाठी एक्ससरसाईझ प्रोग्रॅम ठरवून घ्या. त्यासाठी तुमच्या काही फिटनेस अस्सीसमेन्ट टेस्ट घेतल्या जातील. तसंच बॉडी मेजरमेंट्स घेऊन शारीरिक क्षमता जाणून घेण्यासाठी काही सोप्या टेस्ट घेतल्या जातील. तसंच तुमच्या काही शंका, प्रश्न असतील तर ट्रेनरला जरूर विचारा. मशिन्स कशाप्रकारे वापरायचे ते जाणून घ्या. यात तुमचे अज्ञान दिसेल म्हणून घाबरू नका. कारण त्या टेक्निक्स जाणून घेतल्याने तुम्ही मशिन्स योग्य रीतीने वापराल आणि गंभीर दुखापत टळू शकेल.
- Workout gear: कंम्फरटेबल ड्रेस घाला ज्यामुळे तुम्हाला हालचाल करणे सोपे होईल. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, चांगले सँपोर्टर आणि चांगल्या प्रतीचे नीट फिट होणारे शूज वापरा. तसंच जिमला जाताना पाण्याची बाटली आणि नॅपकिन अवश्य घ्या. जर व्यायामानंतर अंघोळ करणार असाल तर साबण आणि शाम्पू न विसरता न्या. काही जिममध्ये बेसिक toiletries मोफत उपलब्ध असतात.
- वॉर्म अप नीट करा: व्यायामाला सुरवात करण्यापूर्वी योग्य वॉर्म अप करा. कारण शरीराला व्यायामाची सवय नसल्याने स्नायू दुखावू शकतो. तसंच वॉर्म अपमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर व्यायामासाठी तयार होते. त्याचबरोबर स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषणतत्वांचा योग्य पुरवठा होतो.
- हळूहळू सुरुवात करा: सुरुवातीलाच खूप कठीण व्यायाम करण्याचा प्रयन्त करू नका. त्यामुळे दुखापत होऊ शकते. हळूहळू सुरुवात करून सावकाश कठीण व्यायामप्रकारांकडे वळा. घाईघाईने कठीण व्यायाम केल्याने लगेच परिणाम दिसणार नाहीत. gym exercise करताना केलेल्या या ५ चुकांमुळे वाढतात केसांच्या व त्वचेच्या समस्या
- ध्येय ठरवा: साध्या सोप्या ध्येयापासून सुरुवात करून मोठ्या ध्येयापर्यंत मजल मारा. तुमचे ध्येय खरेखुरे आणि साध्य करण्यासारखे असावेत. कारण अवास्तव उद्दिष्टांमुळे नैराश्य येईल आणि तुम्ही प्रयन्त करणे सोडून द्याल.
- तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवा: तुम्ही करत असलेले व्यायामप्रकार, त्याचा कालावधी, व्यायामानंतर कसे वाटते या सगळ्याची नोंद करा. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येईल.
- योग्य आहार घ्या: व्यायामाआधी प्रोटिन्स आणि कार्ब्स युक्त अन्न घ्या. व्यायामापूर्वी ६०-९० मिनिटे आधी जेवण घ्या. त्यामुळे पचन व्यवस्थित होईल आणि व्यायाम करताना शरीराला योग्य पोषकतत्त्वे मिळतील. एखादे फळ खा किंवा फळांचा रस घ्या. व्यायामानंतर स्पोर्ट्स ड्रिंक घेणे उत्तम. त्यामुळे वापरलेली ऊर्जा आणि पोषकतत्त्वे शरीराला परत मिळतील. व्यायामानंतर ही प्रोटिन्स आणि कार्ब्स युक्त अन्न घ्या. शरीरावर प्रोटीन पावडरचा परिणाम लवकर होत असल्याने प्रोटीन पावडर घेणे योग्य ठरेल. प्रोटीन्स आणि बॉडीबिल्डिंंग बाबत हे ’5′ गैरसमज आजच दूर करा
- स्वतःचे कौतुक करा: व्यायामाच्या एका सेशननंतर काही मिनिटे शांत बसून रिलॅक्स व्हा. व्यायामानंतर मनाला शांत, प्रसन्न वाटते. आणि हीच प्रसन्नता आपल्याला दीर्घ काळ व्यायामाशी बांधून ठेवते. त्याचबरोबर एका ध्येयपूर्तीनंतर स्वतःचे कौतुक करा. स्वतःला एखादे बक्षीस द्या. त्यामुळे तुमचा व्यायामाचा उत्साह वाढतो आणि प्रोत्साहन मिळते.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock