Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जाणून घ्या दात सेन्सिटिव्ह का आणि कशामुळे होतात?

$
0
0

सुंदर हास्य आपले सौंदर्य खुलवते. आणि सुंदर हास्यासाठी दात शुभ्र, स्वच्छ आणि सुंदर असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी दातांची काळजी घेणे, त्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. दात किडण्याबरोबर दातांच्या इतर समस्या ही असतात. दात पिवळे होण्याची कारणं जाणा, भविष्यातील धोका टाळा  शुभ्र दात मिळवण्यासाठी जरूर वाचा: एका मिनिटात हटवा दातांचा पिवळेपणा !

जसं आईस्क्रीम खाताना पटकन एखादा दात ठणकतो आणि आपला हात गालाकडे जातो. हे अनेकांनी अनुभवले असेल. असाच अनुभव इतर थंड, गोड, गरम पदार्थ खाताना तुम्हाला नक्कीच आला असेल. दात सेन्सिटिव्ह झाल्यामुळे आपल्याला ही समस्या जाणवते. तर मग जाणून घेऊया दातात सेन्सिटिव्हिटी कशी निर्माण होते. नक्की वाचा: दात काढण्याचा निर्णय या ’5′ कारणांमुळे घ्यावा लागतो !

दातात सेन्सिटिव्हीटी कशामुळे जाणवते?

डेंटिनल ट्युबुल्स मध्ये डेंटिनल फ्लुइड असते. डेंटिनच्या सहवासात एखादे उत्तेजक आल्यास डेंटिनल फ्लुइड बाजूला सारून ते नसेच्या आत जातं आणि त्यामुळे सेन्सिटिव्हिटीची जाणीव होते. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !

  1. थंड आणि गरम पदार्थ: थंड किंवा गरम पदार्थ खाल्यास किंवा पेय प्यायल्यास दातात सेन्सिटिव्हिटी जाणवते. पण सगळ्यांत जास्त सेन्सिटिव्हिटी थंड पदार्थ खाल्याने जाणवते. थंड हवेत श्वास घेताना, दातांची ट्रीटमेंट घेताना वापरल्या जाणाऱ्या यंत्रातून निघणारी हवा यामुळे सारखीच सेन्सिटिव्हिटी जाणवते.
  2. दातांची ट्रीटमेंट करताना वापरली जाणारी साधने किंवा यंत्र: दातांची ट्रीटमेंट करताना वापरली जाणारी साधने किंवा यंत्र यामुळे देखील सेन्सिटिव्हिटी जाणवते. scaling आणि root planing इत्यादी करताना वापरल्या जाणाऱ्या यंत्र डेंटिनल च्या सहवासात आल्यास दातात सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. ब्रश करताना किंवा टूथपीक वापरताना देखील सारखाच अनुभव येतो. रूट कॅनलबद्दल तुमच्या मनातील हे ’10′ गैरसमज दूर करा !
  3. साखरेचे पदार्थ: साखरेचे पदार्थ खाल्याने साखरेतील ऑस्मॉटिक ग्रेडीयंट (osmotic gradients) चा दातावर परिणाम होतो आणि दातातील नस उत्तेजित होऊन सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. दातदुखीची 10 कारणं !!
  4. असिड: असिडिक पदार्थ खाल्याने व पेय घेतल्याने सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. दात कोरण्यासाठी काही प्रक्रियांसाठी असिड वापरले जाते. त्यामुळे
    देखील सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. एका मिनिटात दातदुखी दुर करणारे घरगुती उपाय !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>