Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ कोणती ?

$
0
0

आजकाल कामाच्या उलटसुलट वेळा, रात्रीचे जागरण यामुळे सकाळी उठून प्रत्येकालाच व्यायाम करणं शक्य होते असे नाही. काही जण वेळेनुसार, दिवसभराची सारी कामं आटपून संध्याकाळी किंवा रात्री व्यायाम करतात, जीमला जातात. परंतू स्वास्थ्य सुधारण्यासाठी जी लोकं घरच्या घरी योगा करतात किंवा किमान सूर्यनमस्कार करतात अशा लोकांनाही असे स्वतःच्या वेळेनुसार व्यायाम करणे योग्य आहे का ?

सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. त्याच्या 10 विविध स्थितींमध्ये विविध आसनं आहेत. मग सूर्यनमस्कार संध्याकाळी करणं तितकेच फायदेशीर आहे का ? या तुमच्या मनातील प्रश्नाला Holistic Fitness Expert and Author of the book Fitness On The Go. चे अभिषेक शर्मा यांनी खास सल्ला दिला आहे.

अभिषेक शर्मा यांच्या सल्ल्यानुसार, सूर्यनमस्कार केवळ सकाळी करावा असा काही नियम नाही. कामाच्या घाईत असणारे सूर्यनमस्कार संध्याकाळीदेखील करू शकतात. घरात कामांची, डब्बा तयार करण्याची घाई असल्याने अनेक स्त्रियांनादेखील सकाळी वेळ मिळत नाही. तसेच जी लोकं संध्याकाळी योगावर्गाला जातात ते सूर्यनमस्कार संध्याकाळी करतात.

सकाळच्या वेळेस सूर्यदर्शन करून सूर्यनमस्कार करणं अधिक योग्य आहे. अशावेळेस सूर्याच्या किरणातून आपल्याला प्रसन्नता, उर्जा, चैतन्य मिळते. सकाळी ध्यानसाधना करताना सूर्यनमस्कार करत असाल तर सकाळची वेळ अधिक योग्य आहे. या वेळेस वातावरणात शांतता असते. मात्र केवळ स्वास्थ्यासाठी व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार करणार असाल तर ते संध्याकाळीदेखील करता येऊ शकते.

सूर्यनमस्कार एक परिपूर्ण व्यायाम  असल्याने ते सकाळी किंवा संध्याकाळी केले तरीही त्याचा आरोग्यावर चांगलाच परिणाम होणार आहे. पण सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. पचनक्रियेला चालना मिळते, वजन घटवण्यास मदत होते. केवळ सूर्यनमस्काराच्या मदतीने रियाने घटवले 31किलो वजन !

तुम्ही व्यायामाला, सूर्यनमस्काराला नुकतीच सुरवात केली असेल तर अशावेळी सूर्यनमस्कार संध्याकाळच्या वेळेत करा. दिवसभर काम केल्यानंतर तुमचे शरीर अ‍ॅक्टीव्ह झालेले असते. सकाळच्या वेळेस शरीर त्या तुलनेत अधिक स्टीफ / कडक असते. नवशिख्यांनी सूर्यनमस्कार शिकताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. हळूहळू सरावाने वेग आणि अचूकता देखील वाढायलाही मदत होईल. सूर्यनमस्कार अधिक चांगल्याप्रकारे करणे शक्य झाल्यानंतर आणि सवयीचे झाल्यानंतर सकाळी सूर्यनमस्कार करायला सुरवात करा. तसेच त्यापूर्वी वॉर्म अप नक्की करा. यामुळे इजा होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. सूर्यनमस्कार करण्याआधी आणि केल्यानंतर या गोष्टी टाळू नका!

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>