आजकाल ऑनलाईन ट्युटोरिअल्समुळे बरेचजण घरच्या घरी योगा करू लागले आहेत. पण सगळ्यांसोबत योगा क्लासमध्ये योगसाधना करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो आणि ते अधिक परिणामकारक असते. मी अलीकडेच मुंबईच्या द योगा हाऊसमध्ये योगा क्लास लावला आणि माझ्या मते योगा क्लास ही योगसाधना करण्यासाठी उत्तम जागा आहे. जाणून घेऊया या मागची कारणे.
1. योग्य लक्ष: आसनाच्या अंतिम टप्प्यात आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे असते. त्यामुळे आसनाचा परिणाम उत्तम होतो. परंतू घरी योगसाधना करताना हे साध्य करता येत नाही. कारण कोणी लक्ष देणारे नसल्यामुळे आपले चित्त विचलित होते. तसेच अनेक गोष्टींमुळे आसनावरून लक्ष उडू शकते. परंतू योगा क्लास मध्ये सगळ्यांच्या सोबत अधिक चांगली आणि लक्षपूर्वक साधना होते.
2. प्रेरणा: सगळ्यांसोबत योगसाधना केल्याने तुम्हाला अधिक प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ, समजा वृक्षासन करताना तुमचा तोल गेला आणि तुमच्या शेजारची व्यक्ती त्या आसनात अजूनही उभी असेल तर तुम्हीही आपोआप त्या आसनात स्थिर राहण्याचा प्रयन्त कराल.
3. शिक्षण: आसन करताना किंवा एकंदर योगसाधनेबद्दल तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही ते योगशिक्षकांना विचारू शकता. तसंच एखाद्या विशिष्ट ठिकाणचे दुखणे, त्रास याबद्दल योगशिक्षकांना सांगितल्याने ते त्यावर उपयुक्त आसनांचा सराव अधिक घेतील किंवा त्यानुसार साधनेत बदल करतील. ऑनलाईन व्हिडीओचे अंधानुकरण केल्याने तुम्हाला साधनेची योग्य पद्धत समजणार नाही. वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना
4. आसनाची योग्य स्तिथी: खोलीत सगळीकडे आरसे असल्याशिवाय तुम्हाला तुमच्या आसनाची योग्य स्थिती कळणार नाही. योगा क्लासमध्ये योगशिक्षक तुमच्या हालचाली, आसनाची स्थिती यावर लक्ष देतात. चुकीच्या क्रियांबद्दल जागरूक करतात. समजत नसल्यास परत करून दाखवतात. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !
5. मार्गदर्शन: तुम्ही जेव्हा घरी आसन करत असता तेव्हा एक आसन सोडून दुसरं आसन करताना त्याची योग्य स्तिथी घेणे कठीण होते. तसंच त्या आसनात तुम्ही अधिक काळ राहू शकत नाही. परंतु योगा क्लास मध्ये एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याचे योग्य मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळते. आसनाचे योग्य टेक्निक समजल्याने आसनं करणे सोपे होते. उदारणार्थ, शीर्षासन करण्याआधी काही स्ट्रेचेस केल्याने आसन करणे सुलभ होते. जाणून घ्या शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातील ‘योगा’चे महत्त्व !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock