त्वचेची काळजी घेण्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्वचेची स्वच्छता राखणे. त्यासाठी आपण क्लीन्जर वापरतो. ते वापरताना त्यातील लहान सहन गोष्टी आपल्याला माहित नसतात. म्हणजेच क्लिन्जर मध्ये नक्की कोणते घटक आहेत, आपल्या त्वचेला कोणत्या प्रकारचा क्लिन्जर सूट करेल. तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बाबी.
1. त्वचेच्या प्रकारानुसार क्लिन्जर: त्वचा स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेला वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते. नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा! त्वचा तज्ज्ञ डॉ. शेफाली त्रासी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार लाल माती, मध, दही, ऑलिव्ह ऑइल, रोज ऑइल हे कोरड्या त्वचेसाठी उत्तम ठरतं. तर काकडीचा रस, लिंबाचा रस, जोजोबा ऑइल, द्राक्षांच्या बियांपासून बनवलेले तेल (grapeseed oil) हे तेलकट त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. जाणून घ्या: तेलकट त्वचेच्या लोकांनी ‘नाईट क्रिम’ लावावी का?
2. मीठ असलेले क्लिन्जर: तुम्हाला माहित आहे का? सामान्यपणे क्लिन्जर्स मध्ये मीठ वापरले जाते. कारण त्यामुळे क्लिन्जरला घट्टपणा येतो. जरूर वाचा: झटपट टीप्स – कसा कराल घरच्या घरी चेहरा स्वच्छ ?
3. डेड अल्गीचा वापर: डेड अल्गी म्हणजेच डायटोमेसियस एअर्थ फेशिअल क्लिन्जरमध्ये वापरले जाते. डेड अल्गी म्हणजे पाण्याच्याखाली आढळणारी हिरव्या रंगाची वनस्पती होय. म्हणजेच शेवाळं ज्यावरून पाय सरकू शकतो.
4. त्याचा थर त्वचेवर राहतो: क्लिंजर वापरल्यानंतर त्याचा एक थर आपल्या त्वचेवर राहतो. त्यामुळे मॉइश्चरायझर त्वचेत शोषले जात नाही. म्हणून क्लिंजरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर कोमट पाण्याने धुवा व टिशूने पुसून घ्या. नक्की वाचा: त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय
5. क्लिंजरच्या अति वापराने पिंपल्स येतात: त्वचेच्या समस्या, पिंपल्स दूर करण्यासाठी क्लिंजरचा अधिक वापर केला जातो. परंतु, यामुळे पिंपल्सची समस्या वाढते. त्वचेवरील धूळ, घाम, तेल स्वच्छ करण्यासाठी क्लिन्जरची अगदी थोड्या प्रमाणात आवश्यकता असते. या उपायांंनी अॅक्नेच्या समस्येपासून मिळवा कायमची सुटका
6. मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापर: मेकअप ब्रशवर harbour बॅक्टरीया असतात. त्यामुळे ते नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही फेशिअल क्लिंजरचा वापर करू शकता. त्यामुळे मेकअप ब्रश स्वच्छ व चांगले राहतील. व्हिडीओ: मेकअप करताना कोणती काळजी घ्याल ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock