चष्माऐवजी कॉन्टेक्ट लेंस वापरणे नेहमीच सोयीचे असते.कॉन्टेक्ट लेंसमुळे तुमचा लूक देखील बदलतो.पण जर तुम्ही कॉन्टेक्ट लेंस नीट हाताळल्या नाहीत तर कॉन्टेक्ट लेंस वापरणे तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकते.त्यामुळे तुम्ही कॉन्टेक्ट लेन्सेस वापरत असाल तर ही माहीती जरुर वाचा.
बेंगलोरच्या शंकरा आय हॉस्पिटल मधील कॉर्नीया अॅन्ड रिफ्रॅक्टीव्ह सर्व्हीसच्या कन्सल्टंट डॉ.पल्लवी जोशी यांच्या मते जाणून घेऊयात कॉन्टेक्ट लेंस हाताळताना घ्यायची काळजी व काही टीप्स. हे नक्कीवाचा डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजकअन महत्त्व पूर्ण गोष्टी !
१.झोपण्याआधी अथवा बराच वेळ कॉन्टेक्ट लेंस न काढल्यास काय होते?
कॉर्नीया म्हणजेच डोळ्यांमधील पारदर्शक पडद्याला पारदर्शकता राखण्यासाठी अश्रू पटलाला ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक असते.झोपताना अथवा बराच वेळ कॉन्टेक्ट न काढल्याने तुम्हाला कॉर्नीयल हायपोक्सीया होऊ शकतो.यामुळे कॉर्नीयाला सूज येते व दृष्टी दोष निर्माण होतो.खुप वेळ लेंस न काढल्यास Keratitis हे कॉर्नीयाचे इनफेक्शन देखील होऊ शकते. कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
२.रात्री गाडी चालवताना सात तासांच्या वर कॉन्टेक्ट लेंस वापरल्यास काय होते?
खुप वेळ कॉन्टेक्ट लेंस वापरल्यामुळे कॉर्नीयाला ऑक्सिजन मिळत नाही व त्याला सूज येऊन दृष्टी अंधूक होऊ शकते.
३.सतत एकच कॉन्टेक्ट लेंस वापरल्याचा काय परिणाम होतो?
ठराविक काळानंतर कॉन्टेक्ट लेंस बदलणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे वेळेवर कॉन्टेक्ट लेंस न बदलल्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका असू शकतो.तसेच त्यामुळे डोळे लाल होणे व दृष्टी अंधूक होण्याची शक्यता असते. (नक्की वाचा : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ’7′ सवयी दूर ठेवा)
४.डोळे लालसर व क्रंची होण्याचे काय कारण असू शकते?
डोळे लालसर व क्रंची होण्याची कारणे इनफेक्शन,हवामानातील कमी आद्रता,जुनी लेंस न बदलणे,अॅलर्जी किंवा अयोग्य लेंस ही असू शकतात.यामागे हवामानातील धूळ अथवा धुळीकण किंवा डोळ्याच्या कॉर्नीयाला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोक्सिया होणे हे कारण देखील असू शकते.याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही आय स्पेशलीस्टचा सल्ला घेणे हेच योग्य आहे. जाणून घ्या डोळ्यांवरीलताण हलका करणारे घरगुती उपाय
५.कॉन्टेक्ट लेंस लावण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यास काय फरक पडू शकतो ?
उत्तम दृष्टीसाठी योग्य पद्धतीने कॉन्टेक्ट लेंस लावणे गरजेचे असते.सॉफ्ट कॉन्टेक्ट लेंस ला पुढची व मागची बाजू असते.त्यामुळे आतील बाजू बाहेरच्या दिशेने लावल्यास लेंसचा आकार बदलतो.तसेच ती उलटया बाजूने लावल्यामुळे तुमच्या बुब्बुळावर नीट बसत देखील नाही व तुम्हाला डोळ्यात खाज येणे,अंधूक दिसणे यासारख्या समस्या निर्माण होतात. नक्की वाचा: दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतातही ’14′ कारणंं !
६.दीर्घ काळ कॉन्टेक्ट लेंस वापरल्यामुळे कॉर्नीयावर काही दुष्परिणाम होतो का?
दीर्घ काळ कॉन्टेक्ट लेंसचा वापर केल्यामुळे कॉर्नीयामधील थरांवर त्याचा परिणाम होतो.त्यामुळे कॉर्नीयल स्वेलींग,कॉर्नीयल वॅस्क्युर्लसेक्शन,कॉर्नीयल इनफेक्शन ,डोळे कोरडे होणे हा विकार आणि Gaintpapillary conjunctivitis या समस्या निर्माण होतात.
७.लेंस वापरल्यानंतर कशा स्वच्छ कराव्यात?
कॉन्टेक्ट लेंस प्रत्येक वेळी वापरल्यानंतर कॉन्टेक्ट लेंस सोल्यूशन मध्ये बुडवून ठेवाव्यात.ज्यामुळे त्यावर धुळ व कचरा बसणार नाही.त्याच प्रमाणे इनफेक्शन व प्रदुषणाचा संबध कॉन्टेक्ट लेंस ला होणार नाही याची देखील विषेश काळजी घ्यावी. जाणून घ्या डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6 सुपरफुड्स !
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock