पहिल्यांदा आई होेणे ही प्रत्येक स्त्रीसाठी एक खास गोष्ट असते.या बातमीचा तिला जितका आनंद होतो तितकीच तिला काळजी देखील वाटत असते.त्यामुळे अशा वेळी योग्य गायनेकालॉजिस्ट निवडणे हा तुमच्यासाठी एक खुप महत्वाचा निर्णय असू शकतो.तुम्हाला संपुर्ण गरोदरपणात या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यायचे असते.गायनेकालॉजिस्ट निवड करण्याबाबत आम्ही काही गरोदर महीलांशी चर्चा केली व त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या
गरोदरपणी गायनेकालॉजीस्टची निवड करण्यापुर्वी करा या गोष्टींचा विचार-
स्पेशलायझेशन-
गरोदरपणात डॉक्टरची निवड करण्यापुर्वी त्यांच्याविषयी संपुर्ण माहीती मिळवा.या विषयी कोचीन मधील निधी सांगतात की त्यांच्या पतीने यासाठी प्रतिष्ठीत डॉक्टर व नामांकीत हॉस्पिटलची निवड करण्याचा आग्रह धरला होता.
अनुभव-
तुम्ही निवड केलेले गायनेकालॉजीस्ट अनुभवी असणे खुप गरजेचे आहे.अनेक महीला यासाठी घराजवळ असलेल्या नामांकीत हॉस्पिटल मधील अनुभवी डॉक्टरांची निवड करतात.काही महीला यासाठी दहा वर्षांपासून अधिक अनुभव असलेल्या सिनीयर डॉक्टरांची निवड करतात.
जवळ असणे-
हॉस्पिटल अथवा डॉक्टरांकडे जाणे तुमच्या सोयीचे देखील असणे गरजेचे आहे.हॉस्पिटल घराजवळ असल्यास तुम्ही तुमचे पती जवळ नसताना देखील निश्चिंतपणे स्वत:च महिन्याच्या तपासणीसाठी एकटया जाऊ शकता.तसेच हॉस्पिटल जवळ असेल तर तुम्हाला कोणत्याही इमरजंन्सी मध्ये त्वरीत हॉस्पिटल मध्ये जाणे शक्य असते.
उपलब्धता-
इंदौरच्या अर्चना यांनी त्यांच्या गरोदरपणात अनेक डॉक्टरांकडे अशी विचारणा केली होती की तुम्ही संपुर्ण गरोदर पणात हॉस्पिटल मध्ये उपलब्ध राहणार का? कारण त्यांना प्रत्येक महिन्यात करण्यात येणा-या तपासणीसाठी एकच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा होता.प्रत्येकवेळी डॉक्टर बदलले तर तुमच्या समस्या त्यांना सांगणे कठीण जाते त्यामुळे तुमच्यासाठी गायनेक निवडण्यापुर्वी त्यांची उपलब्धता जरुर तपासा.
संदर्भ-
डॉक्टरांची निवड करताना ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट असू शकते.९० टक्के महीला त्यांच्या मैत्रीणी अथवा नातेवाईकांनी सांगितलेल्या अनुभवी डॉक्टरांची निवड करतात.ब-याचदा नॉर्मल डिलीव्हरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नामांकीत हॉस्पिटलमधील प्रसुतीतज्ञाची निवड यासाठी करण्यात येते.
महिला की पुरुष गायनेकॉलॉजिस्ट-
पहिल्यांदा आई होणा-या महीलासांठी पुरुष गायनेकालॉजीस्ट कडून चेक-अप करुन घेणे अस्वस्थ करणारे असते.त्यामुळे यासाठी ब-याच महीला स्त्री गायनेकालॉजीस्टकडून तपासणी करुन घेणेच पसंद करतात.पुण्याच्या श्रुती यांच्या मते गरोदरपणात अनेक खाजगी शंका असतात ज्या पुरुष डॉक्टरांना विचारताना लाज वाटू शकते.
विश्वास-
विश्वास हा संवादातून निर्माण होतो.डॉक्टर व रुग्ण यांचे नाते देखील या विश्वासावर अवलंबून असते.जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांबद्दल विश्वास वाटत असेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच योग्य आहेत.त्यामुळे महीलांना असेच डॉक्टर निवडणे योग्य वाटते जे डॉक्टर तुमच्या छोट्या छोट्या शंकाचे निरसन करतात व तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमचा आदर करतात. तुम्ही तुमच्या गायनेकालॉजीस्टची निवड करण्यासाठी यापैकी कोणत्या गोष्टीबाबत विचार कराल ते आम्हाला प्रतिक्रीया स्वरुपात आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock