Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दुस-या बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी लक्षात ठेवा या ६ गोष्टी

$
0
0

आपलं बाळ एकलकोंडे होऊ नये यासाठी अनेक जोडपी दुस-या अपत्याचे प्लॅनींग करतात.कारण दुसरे भावंडे आल्याने अनेक मुले अधिक समजुतदार होतात.अर्थात पालकांसाठी देखील ही  बाब आनंद  द्विगुणित करणारी गोष्ट असते.पण दोन मुलांना सांभाळणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.तुम्हाला तुमचा पुर्ण वेळ मुलांना सांभाळण्यासाठी द्यावा लागू शकतो.कधीकधी सतत मुलांचे डायपर बदलत राहिल्याने तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यास वेळ कमी मिळू शकतो.पण जर काही गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केले तर हा तुमच्या आयुष्यातला सुखद असा काळ ठरु शकतो.

१.तुमच्या पहिल्या अपत्याला स्वावलंबी बनवा-

तुमच्या पहिल्या व दुस-या अपत्यामध्ये कमीतकमी तीन ते चार वर्षाचे अंतर ठेवा.त्यामुळे जेव्हा तुम्ही दुस-या बाळाचा विचार कराल तेव्हा तुमचे पहिले बाळ तुमच्यावर अधिक अवलबूंन राहणार नाही.तुमच्या दुस-या गरोदरपणाआधी तुमच्या बाळाला स्वत:च्या हाताने जेवणे,टॉयलेटला जाणे,स्वत:चा ड्रेस घालणे,खेळणी जागेवर ठेवणे या सवयी त्याला त्याच्या वयाच्या दुस-या वर्षापासूनच लावा.त्यामुळे जेव्हा तुम्ही दुस-यांदा आई व्हाल तेव्हा तुम्हाला नवीन बाळाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल. जाणून घ्या Morning Sickness तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरु शकते का ?

२.सेकेन्ड हनीमुन प्लॅन करा-

जर तुम्ही दुस-या बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या जोडीदारासोबत एक रोमॅन्टीक हनीमुन प्लॅन करा.कारण अशा गोष्टींसाठी पुरेसा एकांत गरजेचा असतो.हनीमुनला जाताना तुमच्या पहिल्या बाळाला आई,बहीण अथवा सासरच्या मंडळींकडे ठेवा.असे करताना अपराधी वाटून घेऊ नका कारण तुम्ही तुमच्या बाळाला भावंडं मिळावं यासाठीच हे प्रयत्न करत आहात. नक्की वाचा गरोदरपणात आढळणारी ही ’20 लक्षणं अगदी सामान्य आहेत

३.बचत करणे सुरु करा-

तुमचे क्रेडीट कार्ड बंद करा.खरेतर तुम्ही हे पहिल्या बाळाच्या जन्मानंतरच करायला हवे होते.पण काही हरकत नाही आता जर तुम्ही दुस-या बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही हे आवर्जुन करणे गरजेचे आहे.कारण दोन मुलांच्या संगोपनासाठी तुम्हाला आता अधिक बचत करण्याची आवश्यक्ता आहे.त्यामुळे अनावश्यक खर्च आतापासून कमी करा.

४.एकांतामध्ये थोडा वेळ घालवा-

दुस-या प्रेगन्सीनंतर तुम्हाला स्वत:साठी वेळ देणे अजिबात शक्य होणार नाही.यासाठी आता एक दिवस फक्त स्वत:साठी घालवा.कोणालाही बरोबर न घेता तुमच्या आवडत्या ठिकाणी जा व फक्त तुम्हाला आवडणा-या गोष्टी करा. नक्की वाचा  गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

५.घर सजवा-

तुमचे दुसरे बाळ येण्यापुर्वी तुमचे घर छान सजवा.तुमच्या दोन्ही मुलासांठी नवीन बेड व वॉर्डरोब खरेदी करा.कारण एकदा तुमची दुसरी डिलिव्हरी झाली की तुम्हाला दोन मुले सांभाळताना या गोष्टी करण्यासाठी वेळच मिळणार नाही.

६.निरोगी राहण्याचा प्रयत्न करा-

तुम्ही दुस-यांदा प्रेगन्ट असाल तर आता तुम्हाला स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.यासाठी चालणे,धावणे व योगासने या गोष्टी तुम्ही नक्कीच करु शकता.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>